Tuesday, October 18, 2011

राहुलजी असे वागणे बरे नव्हे.

   मराठीजनांचा असा अपमान करणे चागंले नाही.ह्ल्ली देशात झालेल्या दोन्ही निवडणुक़ीतून काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे.जनमत काही प्रमाणात काँग्रेसच्या विरोधात गेल्याने असे राहुलजी असे वागले नाहीत ना?

        राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी , रामदास उगले , संपतराव मापारी , सुरेश पठारे , भगवान पठारे अशा पाच जणांचे शिष्टमंडळ काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या आमंत्रणाला मान देउन त्यांच्या भेटीसाठी सोमवारी दिल्लीत दाखल झाले होते. राहुल यांच्या भेटीविनाच बहुदा त्यांना राळेगणसिद्धीला नाराजीत परतावे लागेल.गरीबांचे असे अपमान  करणे राहुलजीना शोभले का? "अशी कुठलीही भेट ठरलेलीच नव्हती" असे कारण दाखवण्यात आले.काँग्रेसने या गावक-यांची फसवणूक केली आहे.उत्साहात गेलेली मडंळी नाराज होउन आली आहेत.

       हिसार लोकसभा मतदारसंघात हरियाणा आणि महाराष्ट्रात खडकवासाला विधानसभा क्षेत्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी काँग्रेसचा झालेला दारूण पराभव राहुलजीना उर्मी लागलेला दिसतो. हा  पराभव राळेगणसिद्धीतल्या गावक-यानी केलेला नसतानाही त्यानाही वागणुक का दिली? 

दहा मिनीटांची ही चर्चा ते करु शकले असते.पण हे जाणुन बुजुन घडवून आणलेले दिसते आहे.ह्या भेटीच्या मागे कोणात्यातरी राजकारण्याचे नाटक असावे असे वाटते किंवा अण्णांच्या विरोधातले राजकारण तरी असेल.अण्णांच्या जवळच्या व अण्णाना मोठे केले त्याना त्रास देण्याचे काँग्रेसवाल्यानी ठरविलेले दिसते.तसे जर काँग्रेसवाल्यानी  ठरविरलेले असेल तर त्याचा त्रास त्याना भोगावा लागणार आहे.त्याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली आहे. 

No comments: