Saturday, October 22, 2011

चायना वस्तूंचा वापर नको.

  चायनीज खाद्यपदार्थ विकण-या गाड्यानी देशातील मुख्य शहरात शिरकाव करुन त्या गाड्यावरील चायनीज आयटम कधी आपले आवडीचे पदार्थ झाले ते कळलेच नाही.त्यानतंर ग्लोबलायझेशनमुळे मार्केटमघ्ये चायना वस्तू शिरल्या आणि त्यानी आपले मार्केट कधी काबीज केले तेही कळले नाही.त्याच प्रमाणे चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य घुसवले आहे.तोही प्रदेश ते कधी ताबा मिळवतील तेही कळणार नाही.

   दिवाळीसाठी स्वस्त आणि मस्त तोरणं-कंदील बाजारात लखलखाट केला आहे.चायनीज पदार्थ खाण्यासाठी तरुणांची तसेच कुंटुबांचीही येथे गर्दी होते.एक ना अनेक राइस, चिकन, नुडल्स, सूपमधील चायनीज डिशेसनी खवय्याच्या चिभेचे चोचले पुरवले आहेत.चायनीज खेळण्य़ानी तर लहान मुलाच्या खेळ्ण्याची पद्धतच व खेळही बदलले आहेत.

चायनीज मोबाईलचा दणदणीत आवाज आणि क्लिअर पिक्चर मुळे मोबाईल मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये असेम्बल केलेले चकचकीत हँडसेटही आपलं लक्ष वेधून घेतात.वर्धा पॉवर प्रोजेक्टमध्ये शेकडो चायनीज कामगारांना घेण्यात आले आहेत.कमी किंमत,आकर्षक पॅकिंग आणि मिळणारी गॅरेण्टी यामुळे ग्राहकांची दिवाळीही या चायनीज कंपन्यांनी हॅपी केली आहे.चायनीज वस्तूंच्या या लाटेमुळे भारतीय बनावटीच्या वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.कॅमेरा , टिव्ही , म्युझिक सिस्टिम आदी इलेक्ट्रॉनिक्स गुड्स,मनगटी घड्याळं , सौंदर्य प्रसाधनं,घरगुती वापराच्या विविध प्लॅस्टिकच्या वस्तू,आकर्षक गिफ्ट्स इतकेच काय फटाक्यांचा बाजार त्यानी  खाल्ला आहे.आकाशात नारळाच्या झाडाचा आकार तयार करणारे कोकोनट ट्री , सप्तरंगाची उधळण करणारे रेनबो रिंग असे अनेक चिनी फटाके होलसेल माकेर्टमध्ये उपलब्ध असून शिवकाशीहून येणाऱ्या फटाक्यांपेक्षा या फटाक्यांची किंमत निम्मी असल्याने ग्राहकांकडूनही याच फटाक्यांना प्रचंड मागणी आहे.कमी किंमतीची जादूची कांडी फिरवत विविध उत्सवांवर चिनी वस्तूंनी आपली छाप पाडण्यास सुरुवात केल्याने मुंबईतील लघुउद्योजक आणि किरकोळ विक्रेते चांगलेच संकटात आले आहेत. मुंबईत दाखल होणाऱ्या चिनी वस्तूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यानं येत्या काळात मुंबईसह भारतातील लघुउद्योग नष्ट होईल अशी भीतीही किरकोळ विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.भारतीय उत्सवांसाठी आपली नवनवीन उत्पादने बाजारपेठेत उतरवणा-या चिनी उत्पादकांनी यंदा थेट गणपतीबाप्पासाठी फिरते छत्र व चक्र आले होते.चायना आयटम म्हणजे काय तर दहा रुपयांत सबकुछ. लोकलमध्ये ' चायना आयटम ' विकले जातात.

युध्दभूमीला वळसा घालून आता चिनी कंपन्यांनी मुंबईतील मार्केटवर हल्लाबोल केला असून या बाजारयुध्दात कुणाची सरशी होणार हे सांगायला कोणाची गरज नाही.

या संक़टातून बाहेर पडण्यासाठी आपण भारतीयानी कितीही आकर्षक वस्तू असल्यातरी त्यापासून दुर राहीले पाहिजे.  कितीही स्वत असल्या आणि भुरळ पडणा-या वस्तू असल्यातरी आपण सावध राहुन खरेदी न केल्यास आपल्या बाजारावर जो चायनाने हल्ला केला त्या युद्धात आपली सरशी होऊ शकतो. आपणही अशा वस्तू मोठ्या प्रमाणात निर्माण करून किमती कमी ठेवून त्याची विक्री केली पाहिजे तरच 'मेड इन चायना' प्रकाराला थोडासा आळा बसू शकतो. तसंच सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू शक्यतो 'मेड इन इंडिया'च्याच घ्याव्यात.

No comments: