जीवनातला अज्ञानरूपी अंधार घालवून नवीन ज्ञानाचे,आशेचे दीप प्रज्वलित करणारा सण.दिवाळी म्हणजे साक्षात् प्रकाशाचा उत्सव.अशा या उत्सवाची पहिली पहाट नरक चतुर्दशीनं उगवते. दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'दिवाळी पहाट' हे दिवाळीचे आणखी एक वैशिष्ट्य! पहाटेच्या मंगल वातावरणात मित्र परिवाराच्या भेटी घेत,नव्या माणसांची ओळख करून घेत,संगीताच्या कार्यक्रमांचा आनंद लुटला जातो.दिवाळीच्या पहिल्या सकाळी अभ्यंगस्नानाबरोबरच रसिक श्रोत्यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये भक्ती,भावगीतांचा आनंद घेत येतो.
दिवाळीला सर्वत्र 'दिवाळी पहाट'च्या कार्यक्रमांची रेलचेल असते. हे कार्यक्रम ब-याचदा क्लासिकल किंवा ज्येष्ठांना आवडणारे असल्याने अशा कार्यक्रमांना मध्यमवयीन किंवा सिनियर सिटिझन्सचीच जास्त गर्दी होते.अनेक जाणते रसिक तर चातकासारखी या कार्यक्रमांची वाट पाहतात.
दीपावलीच्या काळात विविध ठिकाणी होणाऱ्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांवर यंदा पूर्णपणे छाप आहे ती तरुणाईची. तरुणांच्या परफॉर्मन्सला मिळणारा वाव, तरुण गायक-गायिका आणि टीव्ही सीरिअल जगतातल्या चमचमत्या यंग सेलिब्रिटीजची उपस्थिती यामुळे यंगिस्तानसाठी यंदाची दिवाळी पहाट जोशात आहे.
दारासमोर रांगोळीची आरास... पणत्यांचा लखलखाट... सुगंधी उटण्याचा घमघमाट... फराळाने भरलेली ताटे... फटाक्यांची आतषबाजी... दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात गुंजणारे संगीताचे सूर... अगदी मंगलमय प्रसन्न वातावरण! अशा आनंददायी वातावरणात यंदाची दिवाळी अवतरली.
!! शुभ दिपावली !!

No comments:
Post a Comment