Thursday, March 8, 2012

असे मतदार असावेत.


   रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवडीत केवळ रशियातीलच नाही तर नाशकासह महाराष्ट्रातील रशियन नागरिकांच्याही मताचे मोल आहे.नाशिकपासून जवळ असलेल्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड  ( एचएएल ) मध्ये काम करणा-या ५० हून अधिक रशियन नागरिकांनी मुंबईत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला . मुंबईत सध्या जवळपास हजार रशियन नागरिक राहत आहेत . पुण्यात काही रशियन विद्यार्थी आहेत . तर नाशिकजवळील एचएएलमध्ये जवळपास शंभरच्या आसपास रशियन नागरिक कार्यरत आहेत . या नागरिकांनी विशेष बस मधून येत रशियन वकिलातीत मतदान केल्याचे नोविकोव यांनी सांगितले मुंबई , नाशिक , पणजी आणि पुणे येथील हजारो रशियन नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला .

पहा मतदानाचे महत्व काय आहे हे यांच्या कडुन आपण शिकले पाहिजे.त्यांच्या नको त्या गोष्टीचे  आपण नेहमीच अनुकरण करीत आलो आहोत.मग या त्यांच्या चागंल्या गोष्टीचे अनुकरण कधी करणार?

पण आपल्या कडे जेमतेम ५० टक्केच मतदान होत आहे.घराजवळ मतदान केंद्र असतानाही आपले मतदान मतदानाचा हक्क का बजावत नाहित?आपले मतदार मतदान न करता मतदानाच्या सुट्टीचा उपभोग घेण्यासाठी व मौजमजा करण्य़ासाठी फिरण्यास बाहेर पडतात. यामुळे योग्यरीत्या आपले लोकप्रतिनोधी निवडले जात नाहीत.मतदान केल्यामुळे चांगले उमेदवार निवडून येतील,नागरी सेवा आणि इतर कामकाज सुधारेल.निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने प्रामाणिकपणे चांगले काम करावे अशी मतदारांची अपेक्षा असेल व लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी नसला पाहिजेच, परंतु तो भ्रष्टाचाराला विरोध करणाराही असला पाहिजे असे वाटत असेल तर त्यानी मतदान करणे गरजेचे आहे.


निवडणूक आयोग मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी खर्च करीत असतो. मतदार नोंदणी करणे, ओळखपत्रे तयार करणे, यासाठी नेहमीच काम सुरू असते. अनेक आत्मकेंदित आणि उपभोगवादी मतदार, एक तर घरी झोपणे पसंत करतात, नाही तर पिकनिकला पळतात. मतदान न करणाऱ्या मतदारांचा हा भ्रष्टाचार आहे. मतदारांना याची जाणीव करून देणे समाजहितासाठी आवश्यक आहे. हे काम मतदारांनीच केले पाहिजे.

शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मतदारांना जागृत करण्याच्या अभियानांत भाग घेतला तर परिणाम उत्तमच होणार आहे. अशा कामांत विद्यार्थ्यांना उत्साह असतो व मतदारही विद्यार्थ्यांचे कौतुकाने ऐकत असतात. शाळा-कॉलेजांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मतदार याद्या देऊन मतदार-विद्याथीर् भेटीचा कार्यक्रम राबविल्यास, मतदारांचा हट्टी-पणा, आत्मकेंदित वृत्ती यामध्ये परिवर्तन होऊन मतदानयंत्रापर्यंत ते जातील. 'लोकशाही आणि निवडणुका यांच्या शिक्षणाची सुरुवात' असा या अभियानाचा उद्देश ठेवला पाहिजे.

मतदान करून आपण भारताचा जागरूक नागरिक आहोत हे प्रत्येकाने सिद्ध करायला पाहिजे. मतदान केले नाही तर तुम्ही कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल व राजकारणाबद्दल बोलायचा तुम्हाला कोणताच नैतिक अधिकार नाही .

मतदानाच्या कामात गुंतलेले सरकारी कर्मचारी,सैनिक,अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी,पोलीस अशा खुप जाणाना मतदान करता येत नाही.

फेसबुक वर कमी बसलो तरी चालेल.... मित्राना उशिरा भेटलो तरी चालेल.... एखादा लेक्चर बंक झले तरी चालेल.... कितीही महत्वाचा क्रिकेट सामना उशिरा पहिला तरी चालेल....पण आपला मतदानाचा हक्क बजावला नाही तर चालणार नाही.......... शेवटी विचार तुमचा...........पण नेहमीच मतदान करा.

No comments: