गेली पंधरा वर्षे काश्मिरी तरुणांना भविष्याची वाट दाखवणारे अधिक कदम 'मटा युथ आयकॉन' पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले! उद्योजक मिलिंद कांबळे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. अधिक कदम यांचे काश्मीरमधील अनुभव, त्यांचा दहशतवाद्यांशी झालेला सामना आणि त्यांच्या कार्याची माहिती ऐकून सारे सभागृह विस्मयचकीत झाले. कदम व्यासपीठावर येताच प्रेक्षकांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.
अधिक कदम या युवकाने पुरस्कार मिळाल्यावर काय बोलायचे याचा विचार केला नव्हता. १९९७ मध्ये काश्मीरला गेलो तेव्हाही पुढचा विचार केला नव्हता; पण, समोर मानवी बॉम्ब फुटून त्याचे अवशेष गाडीच्या काचेवर आदळले आणि माझी वाट पक्की झाली. आपण सर्वांनीच सीमेवर राहणा-यांची आठवण ठेवली पाहिजे. देश सीमेवरसुद्धा आहे. तिथेही लोक असतात पण, त्यांना केव्हाही बंदुकीच्या गोळीशी सामना करावा लागतो.
'युथ आयकॉन' अधिक कदम यांनी थेट शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत माहौल ताब्यात घेतला. काश्मीर म्हटले की आज, डोळ्यांपुढे येतात ते रक्तरंजीत चिनारवृक्ष आणि पेटलेला बर्फ. या संघर्षातून उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील बेघर, बेसहारा झालेल्यांचा अधिक पालक झालेला आहे. थोडाही संशय आला तरी बंदुकीची गोळी मृत्यूशी गाठ घालील अशा परिस्थितीत अधिक तिथे निरागस जीवन फुलवतो आहे. त्याच्या संघटनेचे नाव 'बॉर्डरलेस र्वल्ड फाउंडेशन' आहे, यावरूनच आपल्या कामाकडे पाहण्याच्या त्याच्या वैश्विक दृष्टिकोनाची कल्पना येते. निराधार झालेल्या लहान मुला-मुलींच्या चेहऱ्यावर जगण्याचा आधार मिळाल्यावर फुलणारा आनंद पाहून त्याने संस्थेच्या इमारतीला 'बसेरा-ए-तबस्सूम' असे नाव दिले. तिथे सीमेवरही आपलाच देश आहे, तिथले लोकही श्वास घेतात असे अधिक सांगतो तेव्हा सुरक्षित जगात, कुटुंबाच्या उबेत राहणाऱ्या आपल्यासारख्यांना क्षणभर अपराधी वाटते. दहशतवादी, लष्कर आणि स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करून करुणेचा धर्म अंमलात आणणाऱ्या अधिक कदमचा म्हणूनच 'युथ आयकॉन' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याचे काम या सन्मानातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचल्यावर अनेक हात पुढे येतील असा विश्वास मटाने केल्याबद्द्ल मटाचे अभिनदंन.
अनाथाना आसरा देण्याचे मोठे काम अधिकच्या हातुन घडत आहे.दहशतवाद्यांच्या हिसंक घटनांनी धगधगत्या काश्मीर सारख्या राज्यात अनाथ मुलींसाठी आश्रम काढण्याची कल्पनाही करता येत नाही तेथे या मराठी माणसाने माणुसकीचे नाते जपत अनाथ मुलींसाठी त्यांच्याच मातीतच अनाथाआश्रम सुरु केल्याने त्यांचे कौतुक केले गेले.कट्ट्रर मुस्लिम राज्यात मराठी माणसाकडे अनाथ मुलींचे संगोपन देण्यास मुस्लिमबाधंव तयार होतात एवढा विश्वास त्याच्यांत त्याच्या कार्याने निर्माण करण्यासाठी त्याला कितीतरी संकटाना सामोरे जाउन त्यावर मात करुन खंबीरपणे उभे रहावे लागले.इतर जातीतील अनाथ मुलींसाठी सुरक्षित पालकत्व स्विकारण्याचे आचाट साह्स करणा-या,प्रसिध्दिपासून लांब राहत सामिजिक कार्य करीत माणुसकीचा घर्म जपणा-या या युवकाचे कौतुक करीत त्याच्या कार्याला लागणारी मदतही केली गेली पाहिजे.
No comments:
Post a Comment