Tuesday, March 27, 2012

पुरुषांची ही मनोवृत्ती बदलेल का?

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात महिला पाय रोवून उभ्या ठाकल्या असताना, पुरुषांच्या 'त्या' विखारी, नजरा, स्पर्श आणि कृतीपुढे हतबल होण्याइतकी भीषण परिस्थिती आजही समाजात आहे.कित्येक   नराधमांनाकडुन  महिलांवर   अन्याय   करणारी अघोरी   कृत्ये   केली   जात आहेत. 'स्त्रीकडे आपली मालमत्ता, उपभोगाची वस्तू म्हणून बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही कायम असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.पुरुषांची ही मनोवृत्ती निश्चित बदलेल, या आशेवर महिलांची वर्षानुवर्षे लढाई सुरू आहे. पण   बदलत्या   काळाच्या गणितांमध्ये हे  बदलण्याऐवजी  अधिकच बिकट  होत असल्याने आता  महिलाही  धास्तावल्या आहेत.  समाजमन बदलले, स्त्रीकडे   उपभोगाची   वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टीकोनच बदलला, अशी समजूत करून घेणे चुकीचेच आहे. विकृत मनोवृत्तीच्या लोकांमुळे आजही महिला स्वत:च्या सुरक्षेबाबत साशंक आहेत.घराच्या उंबऱ्याबाहेर पडल्यानंतर एक अनामिक भीती बाळगून   त्या वावरत आहेत. स्वत:ला   पुढारलेले म्हणवणा-या   देशाच्या,  समाजाच्यादृष्टीने   ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे.सरकारमघ्ये निवडुन आलेल्या महिला सदश्यानी विशेषत: महिलांच्या सुरक्षेबद्द्ल उपाय योजले पाहिजेत व कडक शिक्षा केल्या पाहिजेत.महिलाच्या सुरक्षेत प्रश्न लवकरच सोडवावा.बलात्कारांचे प्रमाण रोखले पाहिजेत.

आमची   मनोवृत्ती बदलणार  नाही,  तुम्हीच  स्वत:ला  आमच्या नजरेत ‘सभ्य’ बनवा नाहीतर आमचे अत्याचार   सहन करा,  ही वृत्ती   कधी जाणार? मुली  असभ्य   कपडे घालतात म्हणून त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत असल्याचे निर्दशनात आलेआहे.



 २०१०मध्ये देशात तब्बल दोन लाख १३ हजार ५८५ महिलांविरोधी गुन्हे घडले. त्यातील २२,१७२ बलात्काराच्या घटना होत्या.किती भयानक परीस्थीती आहे ही? महिलांना माणूस म्हणून विचार करून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी हे कर्तव्य मानण्याची आता खरी गरज आहे.महिलांना अहोरात्र करिअरच्या वाटेवर वाटचाल करण्याची मुभा देणारे सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे हे सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचे कामच आहे.महिलांची सुरक्षा व काळजी घेणे हे सरकारचे काम आहे.

नाइट शिफ्टमध्ये काम करणा-या महिलांची प्रत्येक शहरामध्ये असलेली प्रचंड संख्या लक्षात घेत त्यासाठी   काम   करणा-या स्वतंत्र   यंत्रणेच्या गरजेकडे डोळेझाकच झाली आहे. सध्या देशात उपलब्ध असलेले   पोलिस   बळ,  विविध   ठिकाणच्या   बंदोबस्तात   अडकलेली   कुमक   याचे  समीकरण पाहता सामान्यांच्या सुरक्षेला उरलेल्या पोलिसांची संख्या अगदीच केविलवाणी आहे. 

स्त्रियांचे प्रश्न असे म्हणतो ते काय स्त्रियांच्या विशिष्ट वर्तनातून निर्माण झालेले प्रश्न नसतात, तर ते पुरुषी मनोवृत्तीतून निर्माण झालेले असतात. स्त्रियांवरील हिंसेचा व अन्यायाचा प्रश्न पुरुषांची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलल्याशिवाय थांबणार नाहीत.समाजात रुजलेल्या पुरुषत्वाच्या कल्पना तपासायला हव्यात. एकूणच पुरुष म्हणून झालेली जडणघडण पुन्हा तपासून पहायला हवी व त्याला सकारात्मक पुरुषत्वाचे समतेवर आधारलेले नवे पर्याय स्वत:मध्येच सामावून घ्यायला हवेत.

पुरुषांची मनोवृत्ती बदलायला सुरुवात होईल तेव्हाच स्त्रियांच्याही आयुष्यात चांगले बदल घडतील.

No comments: