हल्ली 'कात्रजचा घाट' हा शब्द खुप गाजत आहे.
कात्रज घाट पुणे शहराच्या दक्षिणेच्या डोंगररांगेतून आहे. मुम्बई-पुणे-सातारा महामार्ग (NH 4) याच घाटातून जातो.कात्रज घाट हे नाव या घाटास पायथ्याशी वसलेल्या आणि सद्ध्या पुण्याचे एक उपनगर मानण्यात येणा-या कात्रज गावामुळे मिळाले आहे.
राज्यात वरंधघाट,मढेघाट,माळशेज,खंडाळा,कसारा असताना कात्रजचा घाट का वापरला गेला असेल? पुण्याशेजारी आहे म्हणुन तर नाही ना?
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना लढाईत 'कात्रजचा घाट' दाखवल्याचं इतिहासात प्रसिद्ध आहे. शिवाजीमहाराजांच्या काळात कात्रजचा घाट गाजला. आताही गाजतोय, पण वेगळय़ा पराक्रमासाठी. येथेही ‘खिंडी’ आहेत. खिंडीत गाठायचे प्रकार आहेत. हल्ली राजकारणात 'कात्रजचा घाट' दाखवल्याचे प्रकार घडले आहेत.नेहमीच घडत आहेत. कोणता पक्ष कोणाशी युती करतो आहे आणि कोण कुणाला कात्रजचा घाट दाखवतो आहे, याची खमंग आणि चुरचुरीत चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
दुस-याला गाफिल ठेवून त्याची मस्ती उतरावयाची म्हणजेच कात्रजचा घाट.
विशेषत: निवडणुकीत कात्रजचा घाट दाखावला जातो.पण काही वेलेला योजनांना वा मागण्यांनाही कात्रजचा घाट दाखवला जातो.पण या 'कात्रजचा घाट' या शब्दाला राजकारणात मोठा मान असुन महत्व आले आहे.राज्यातील प्रत्येक पक्ष दुस-या मित्र पक्षाला व विरोधी पक्षाला कात्रजचा घाट दाखवित आहेत.
शिवसेनेने दाखवला राज यांना कात्रजचा घाट! ठाण्यात मनसेचा पाठिंबा घेऊन महापालिकेची सत्ता ताब्यात
घेणा-या शिवसेनेने नाशिकमध्ये मात्र मनसेला कात्रजचा घाट दाखवला आहे. नाशिकच्या महापौरपदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कात्रजचा घाट दाखविला आहे.
मनसेचा बागुलबुवा दाखवून वेळोवेळी शिवसेनेवर दबाव आणणाऱ्या भाजपबरोबर राहण्याऐवजी शिवसेनाप्रमुखांना दैवत मानणाऱ्या राज यांच्या मनसेशी साथ करून भाजपला कात्रजचा घाट दाखविण्याचा विचारही सेनेच्या वरिष्ठ वर्तुळात आहे.
राज्यात सुरू असलेल्या मनसे-भाजप नेत्यांचे गुफ्तगू स्थानिक पातळीवर शिवसेनेला जागोजागी कात्रजचा घाट दाखविणारे ठरणार आहे
दोन्ही महापालिकांबाबत काँग्रेसला कात्रजचा घाट दाखविण्यात राष्ट्रवादी सफल झाली, अशी चर्चाही राष्ट्रवादीच्या गोटात दबक्या आवाजात सुरू आहे.
नगर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवत अध्यक्ष व उपअध्यक्ष पदे खिशात घातली.
राजकीय पक्षांचे नेते प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाला नामोहरम करण्यासाठी डावपेच लढवितात. पण त्याचवेळी त्यांना आपल्याच कार्यकर्त्यांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी खटपटी करतात.
कात्रजचा घाट दाखविण्यात माहिर असलेले शरद पवार
कात्रजचा घाट दाखविणे ही पवारांची आवडती खेळी आहे.
पवारांच्या राजकारणाचा रस्ता दिल्लीहून बारामतीला सरळ जात नाही तो व्हाया कात्रज घाट जातो. कधी गुदगुल्या करीत, कधी गुगली टाकून विकेट घेत, कधी नमते धोरण स्वीकारू न तर विशिष्ट प्रसंगी थेट कात्रजचा घाट दाखवून पवारांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लक्ष्य केल्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेना वा भाजपची मदत घेत सहा जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का देत काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला.शरद पवार तसे आक्रमक नाहीत.ते फक्त कधीकधी हितशत्रूंना कात्रजचा घाट दाखवण्यात तरबेज आहेत.कात्रजचा घाट आणि गनिमी काव्याचे डाव टाकले जातात.नमते धोरण स्वीकारू न तर विशिष्ट प्रसंगी थेट कात्रजचा घाट दाखवून पवारांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत.
No comments:
Post a Comment