Thursday, March 29, 2012

टेक्नॉलॉजीचा असाही उपयोग


भविष्यात टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटच्या माध्यतातून शिक्षण क्षेत्र अधिक समृद्ध होणार आहे.आपल्या दैनंदिन जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यात टेक्नॉलॉजीचा मोठा वाटा आहे.जगात विविध स्तरावर होत असलेल्या संशोधनामुळे टेक्नॉलॉजीतील नवनव्या गॅजेट्सचा जन्म होऊ लागला आणि आपले आयुष्य अधिक सुकर होऊ लागले. 

मुंबई विद्यापीठाचा टी. वाय. बीकॉमचा मंगळवारी झालेला 'एमएचआरएम' या विषयाचा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.'एमएचआरएम' या विषयाच्या पेपरमध्ये येणा-या प्रश्नांचे एसएमएस विद्यार्थ्यानी सर्वत्र फिरले.या एमएमसमध्ये देण्यात आलेले ४५ मार्कांचे प्रश्न जसेच्यातसे पेपरमध्ये आले होते.

अद्ययावत टेक्नॉलॉजीचा फायदा विद्यार्थ्यानी चांगल्या कामासाठी करावा.टेक्नॉलॉजीचा असा दुरुपयोग करणे योग्य नाही.आता पेपरफुटीसाठी 'एसएमएस' मार्ग सोपा झाला आहे.विद्यार्थ्यानी असले गुन्हे करु नयेत.हे विद्यार्थी केव्हाही पकडले जाऊ शकतात.आजच्या काळात जिथे जगभरातील सर्व शास्त्रज्ञ टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रगतीचा मार्ग शोधत आहेत तेथे काही विद्यार्थी त्याचा दुरुपयोग करीत आहेत.


मोबाइल आणि कम्प्युटर या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने आता आपले आयुष्य व्यापले आहे. मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉप आदींमुळे होणारे फायदेतोटे यांची अनेकदा चर्चा होते. मात्र यामुळे चांगला बदल झाले आहेत.यात जसा युवकाचा  समावेश आहे तसा जुन्या पिढीचाही आहेच. 

मोबाईल भारतात दाखल झाला तेव्हा अतिश्रीमंतांच्या चैनीची वस्तू असे त्याचे स्वरुप होते. पण बदललेल्या परिस्थितीत आथिर्कदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही जादूची कांडी ठरली आहे. देशातल्या साडेतीन हजार  मंड्यांमधल्या तेलबिया, धान्य, कडधान्य आदी आठशे वस्तूंचे दर मोबाईलवर एका क्षणात शेतक-या मिळु लागले एवढी प्रगती मोबाईलमुळे झाली आहे.

म्हणुनच विशेषत: विद्यार्थ्यानी टेक्नॉलॉजीचा उपयोग चागंल्या कामासाठी करावा.हातात मिळालेल्या साधनाचा अजानतेही दुरुपयोग करु नये हे धोक्याचे आहे.



No comments: