Saturday, July 13, 2013

डायपर


बाळांचे डायपर

नवजात बालकाच्या अवयवांची काळजी घ्यावी लागते.लहान बाळाची स्वच्छता फार महत्वाची असते.त्याचे लंगोट, दुपटी वेगळी ठेवून, स्वच्छ धुऊन, वाळवून वापरावी लागतात.बाळाने चोवीस तासात पाच-सहा वेळा मुबलक प्रमाणात लघवी करणे यावरून बाळाची वाढ नॉर्मल होत आहे असे समजावे. लहान मुलांच्या सोयीसाठी डायपर वापरले जातात.लहान मुलांना रात्री शू-शी करायची झाली की, आईवडिलांची झोपमोड ठरलेलीच. या झोपमोडीतूनच चिडचिड वाढते. शिवाय मूल पुन्हा झोपेपर्यंत आई-वडिलांचेही जागरण ठरलेले. मुलाला एकटे बाथरूमकडे सोडावे, तर अंधारात पडण्याची भीती. जगभरातील बहुतेक पालकांचा हा समान अनुभव. हा त्रास मुल मोठे होईपर्यत आईवडीलाना सहन करावा लागतो.यासाठी डायपरचा वापर करावा लागतो.


 प्रौढांचे डायपर 


वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी अनेक असतात. मुत्राशयाच्या समस्या, दृष्टीमध्ये येणा-या अडचणी, अलझायमर, डिमेंशिया, ह्रदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत.मुत्राशयावर संयम न रहाणे ही फक्त वृद्ध स्त्रीयांमधील व्याधी नसून पुरुषांमधेही दिसून येते.मुत्राशयावर ताबा नसलेली अनेक माणसे ह्या व्याधीबद्दल डॉक्टरांशी बोलण्याचे टाळतात. पण खरे तर प्रथम थोडा त्रास होत असेल तरीही डॉक्टरांशी बोलणे अत्यंत जरूरीचे असते.मुत्राशयाच्या व्याधीमुळे लधवीवर नियंत्रण नसल्याने वृध्दाना  देखील डायपर वापरावे लागतात.





   मुल जन्माला आल्यानतंर थोडे दिवसातच त्याला डायपर लावला जातो.तसेच वयस्कर मडंळीना आजारात डायपर लावावे लागत आहेत.डायपरच्या आकारात बदल होतो पण उपयोग एकच असतो.जन्मानंतर डायपर व मरणाजवळ आल्यावर डायपरची गरज लागते.खरेच हे डायपर आपल्या जीवनात महत्वाचे काम करतात.लहान असताना मुलाना समजत नसते तेव्हा त्याना हे चिटकवले जातात.तसेच वृध्दाकाळात आजारात असताना हे डायपर वृध्दाना चिटकवले जातात.लहानाना व वृध्दाना साभाळना-याला त्रास होऊ नये याकरीता या डायपरचा मोठा उपयोग होतो.



  ह्या डायपरचे लहानाना कळत नसल्याने काहीच वाटत नाही.पण वृध्दाना आपल्या डायपर लावावे लागतात हे कळल्यावर त्याला खुप त्रास होतो.ते दुखावले जातात.मनाविरुध्द पण गरजेखातर ते ह्या गोष्टीना तयार होतात.या डायपरच्या कचाट्यातून ते सुटका होण्यासाठी डाँक्टरकडे विनंती करीत राहतात.काहीची सुटका त्यातून होते तर काहीना डायपर शेवटपर्यत साथ देतो.डायपर लावणे म्हणजे वृध्दांचे बालपण सुरु होते.  
   

नवजात बालकाना डायपर वापरतात त्यापेक्षा वृध्दाना त्याचा जास्त उपयोग होतो.आजारात लधवीवर नियंत्रण नसल्याने व जाग्यावरुन हलता येत नसल्याने डायपर सोयीचे ठरते.



डायपर लावले म्हणजे आपण परावलंबी झाल्याची भीती वाटते.याच करीता प्रत्येकाला वाटत असेल की आपल्याला शेवटच्या काळात डायपर लावण्याची वेळ येऊ नये.डायपर सोयीची वस्तू आहे पण त्यापासून दूर राहण्याची सर्वांची मनस्थीती असते.

No comments: