Friday, July 26, 2013

ब्रेकअप आणि पँचअप

        
   जुळलेले अनुबंध तोडणे ....ब्रेकअप      तुटलेले अनुबंध पुन्हा जुळवणे  ....पँचअप

  हे दोन्ही शब्द हल्ली वांरवार ऐकण्यात व वाचण्यात  येत आहेत.तरुणाच्या बोलण्यात या शब्दांचा जास्त वापर होत आहे. चारचौधात खुलेआम या शब्दांचा उच्चार होत आहे.  एका शब्दाने संबध तुटतात तर दुस-या शब्दाने ते जुळतात.सबंध कोणाचेही असोत किंवा कोणत्याही नात्याचे असोत.

   एकदम विरुध्द शब्द आहेत.पहिले ब्रेकअप आणि नतंर पँचअप असा या शब्दांचा प्रवास असतो. पण काही वेळेला फक्त ब्रेकअपच होतो.नतंरचा पँचअप होत नाही.दोघांनी मिळून घेतलेल्या निर्णयाचे हे दोन शब्द आहेत.

    ब्रेकअपनतंर दु:ख भोगावे लागते पण पँचअपनतंर सुख अनुभवावे लागते.ब्रेकअप दोघांमधल्या एकामुळेही होतो तर पँचअप दोघांमुळे होतो. नाते नाही ठेवायचे व रेटायचे नसल्याने ब्रेकअप करायचे  नाते परत जमवायचे असल्यास पँचअप करायचे.प्रेमापासून दुरावलेल्या प्रेमाची व्यथा हे ब्रेकअप तर प्रेमाची आस हे पँचअप. 

   एकदा एका मित्राचं त्याच्या गर्लफ्रेंडशी भांडण झालं. ते इतकं टोकाला गेलं की तिने ब्रेकअप करायच ठरवलं. त्याचा फोन पण ती घेत नव्हती ना कॉलेजला येत होती. हा बिचारा देवदास झाला. म्हणे, मला तीच हवी आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही आणि बरंच काही. शेवटी मित्रांनी त्यांच्यात मध्यस्थी करावी लागली.त्या मुलीचं मन वळवायल्यानतंर त्यांच्यात पँचअप झाले.


  वयातल्या मुला-मुलींना स्वातंत्र्य हवं असतं हे खरं, पण वयात येतानाचे सर्व निर्णय घ्यायला उत्सुक असलेल्या या मुलांना जगण्यातले/नात्यातले स्वाभाविक चढउतार सहन करण्याची, त्यातल्या निर्णयांची जबाबदारी पेलण्याची मॅच्युरिटी अनेकदा नसते.

  वयात येणारी आपली मुलं प्रेमात पडतात, त्यांना मित्र/मैत्रिणी असतात, त्यांचे क्षुल्लक कारणावरून ब्रेकअप होतात आणि त्याचं त्यांना फार काही वाटत नाही किंवा वाटलं तरी प्रेमभंगाचं दु:ख फार काळ टिकत नाही हे काही ‘सुजाण’ पालकांनी आता आधुनिक जीवनशैली म्हणून मान्य करून टाकलं आहे. मुलांना कितीही धारेवर धरलं तरी अखेरीस ते त्यांना हवं तेच करतात, असंही पालकांना वाटतं. त्यामुळे ‘करा काय करायचं ते, घरापर्यंत काही आणू नका’ अशी सोयीस्कर पळवाट शोधून काही पालक डोळ्यावर कातडं ओढणं स्वीकारतात.


काहींचं म्हणणं, प्रेमात दोघं पडलो, नातं शारीर पातळीवरपण दोघांच्या मर्जीनं पुढं सरकलं आणि आता नाही जमत, ब्रेकअप झालं तर ‘मला फसवलं-वापरून घेतलं’ असा आरोप करून रडारड करणार्‍या मुलींनाच सगळी सहानुभूती कशी देता.? नाही जमलं तरी रेटतच रहायचं का नातं.?


ब्रेकअप झाल्यानंतरचे सुरुवातीचे काही दिवस सोडले तर त्यावेळी घडणाऱ्या घटना, माहौल सगळंच कसं वेगळं आणि बदलून गेलेलं असतं, सैरभैर झालेलं असतं. समोर येईल तो माणूस आपल्याला त्रास द्यायलाच जन्माला आलाय असं वाटतं.आपलं कुणीच नाही या केविलवाण्या, दर्दभऱ्या, उदास आणि अशाच काहीबाही, जाम रोमॅण्टिक फीलिंगमध्ये हरवून जाणं. आपण फक्त आपल्या माणसाच्या विचारात हरवून गेलेलो असतो. मग त्यापुढे हे नको, ते नको.. बाकी काही नको.तुमचं पहिलं प्रेम तुटलंय हे माहिती असणं हे किती अपमानास्पद असू शकतं हे कुणीही समजू शकेल.

ब्रेकअपच्या मूडमधून बाहेर आल्यावर जरी त्याचा थोडा सिरियसली किंवा सेन्सिटिव्हली विचार केला तरी आपलेच आपल्याला काही छान पॉईंट सापडू शकतात. स्वतचीच नव्याने ओळख होते. आपल्याला नेमकं काय हवंय, काय नकोय, हे सुद्धा कळून चुकतं. त्याक्षणी नाइलाजाने का होईना आपण नेमकं काय चुकलंय याचा विचार करायला लागतो. स्वतशीच रडत झगडत का होईना आपण आपली चूक कबूल करायला शिकतो. आपण आपली हार, नकार, आपल्याला एखादी गोष्ट मिळणार नाहीच हे अ‍ॅक्सेप्ट करायला लागतो.


काही वर्षांनंतर त्या पहिल्या प्रेमाला एक दिवस फोन करून चक्क सांगून टाकलं.. आजपर्यंत तुझ्याबद्दल मनात खूप राग वगैरे बरंच काय काय होतं. पण आता तसा काही राग वगैरे नाहीये. आता खरं म्हणजे तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. त्यावेळी तुझा निर्णय बदलावा म्हणून जे काही धिंगाणे घातले, जी कटकट केली, त्याबद्दल सॉरी वगैरे नाही म्हणायचंय. तेव्हाच्या परिस्थितीत ते बरोबरच होतं. पण आता त्याचं थोडंसं हसायला येतं. तुझ्यामाझ्यातले छान क्षण नक्कीच लक्षात ठेवायचेत. पण कटू आठवणींचं ओझं मात्र नकोय. कारण ते ठेवणं कोणासाठीच चांगलं नाहीये. आयुष्यातला ‘पहिलं प्रेम’ नावाचा चॅप्टर आता संपलाय.




आजच्या तरूणाईला प्रेम निभावण्यासारखाच, ब्रेकअपही कुठलेही नकारात्मक परिणाम करून न घेता निभावायचाय. जे झालं, जे संपलं ते तिथेच सोडून नव्याने सुरूवात करताना जुन्या आठवणीत अडकून पडायचं नाहीये. किंवा उगाचच त्याचा आधारही घ्यायचा नाहीये. ब्रेकअपला एकदमच दुखी किंवा दर्दभरा लुक देण्यापेक्षा कॅज्युअली घेतलं तर? लग्न पहावं करून असं म्हणतात ना. मग शहाणपण शिकवणारा एखादा ब्रेकअपही पहावा करून.





ब्रेकअप ... नंतर पहिल्यांदाच त्यांची भेट झाली,
ती पण अचानक घडून आली....
त्याला पाहून तिचे डोळे पाणावले,
पण ते अश्रू डोळ्यातून खाली नाही ओघळले.
बर झाल तू भेटलीस खूप दिवसापासून काही सांगायचे होते,
त्याच्या या बोलण्याने तिला आपले पणा वाटला होता.




 प्यचअप नतंर आनंदीआनंद असतो. आपापल्या चुका दोघांना समजतात.आपण असे का वागलो यावर चर्चेत किस पडतो.  दोघांची कलुषित मने हलकी होतात. ब्रेकअप काळात मैत्री ही एखाद्या ताणलेल्या रबराप्रमाणं असते. फरक एवढाच, की दोघांपैकी कोणी तरी एक ते "रबर' तुटू देत नाही! हा काळ संपला की मैत्री घट्ट होते. मित्र म्हणून आपण एकमेकांना जवळ करतो. आपल्या आवडीनिवडी, राग, लोभ सर्व पुन्हा जुळतात. एकमेकाला कळतात. मित्राच्या चांगल्या गोष्टीकडं बघून इतर गोष्टींकडं दुर्लक्षतो. सुख-दुःख, गुपीतं, छंद सर्व काही मित्राच्या संगतीत सुरु होतात.

मनाच्या तारा जुळतात असं काहीसा होत,स्वराच्या त्या स्वरामध्ये पुन्हा स्वर जुळतात.ते पुन्हा बेसुर न होण्याच्या शपथेवर . अलगद जुळता जुळता जुळली पुन्हा जुनी नाती.


मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात.....
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे......



मैत्री असते भावनांचा सुखद ठेवा, आयुष्याच्या पदों-पदी जपायला हवा.. 
मैत्री असते मनांची नाजुक गाठ, मानाने मनाला दिलेली सुखद साथ ..

No comments: