Saturday, August 3, 2013

हक्काचा कट्टा


    सम विचा-यांनी एकत्र येण्याची जागा 'हक्काचा कट्टा'.जमणा-यांना कट्टेकरी म्हणतात.हवं ते बोलण्याची गरज इथल्या प्रत्येकाला वाटते आणि आताच्या काळात तर ती वाढतच चालली आहे.यातूनच  ' कट्टा संस्कृती ' उभी राहिली आहे.

    कट्ट्यावर जमणारे कट्टेकरी काव्य-शास्त्र-विनोदात मनसोक्त दोन-तीन तास घालवतात.स्वत:ला जे काही मांडावंसं वाटतं ते मोकळेपणे या कट्ट्यावर आपले विचार मांडतात.

    लहानग्यांसाठी बागा,तरुणांसाठी मैदानं,रस्त्यावरचे नाके,आजीआजोबांसाठी पार्क आणि आता कपल्ससाठी प्रेमबागांचाही विचार होतोय, पण आम्हा मित्रमैत्रिणींचं काय? आम्हालाही हवाय हक्काचा कट्टा. चार मित्र जमले की तिथेच त्यांच्या गप्पा सुरू होतात.मैदानात,मैदानाच्या कट्ट्यावर,नाक्यावर कुठेही उभं राहून किंवा बसून त्यांचा फड जमतो.
    पूर्वी गावात पारावर संध्याकाळी लोक एकत्र येत.नेमकी त्याच पद्धतीची व्यवस्था कट्ट्याने तयार केली.आठवड्यातून एखाद्या ठराविक वारी,ठराविक ठिकाणी हे 'कट्टेकरी' भेटले की सुरुवातीचा अर्धा तास मुक्त संवाद असतो.त्यानंतर कधी व्याख्यान होते,कधी प्रवचन,कधी चर्चा,संगीत तर कधी कवितावाचनही.नाट्य,अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र,खेळ,सिनेमा... कोणताही विषय तिथे वर्ज्य नसतो.



    अनेक आस्थापनांमध्ये स्वेच्छानिवृत्तीचं वादळ नेहमीच घोंघावते. त्यात सापडलेल्या पण सांस्कृतिक अभिरुची असणा-या नोकरदारांना अचानक रिकामपण आलं. परस्परांशी संवाद कायम ठेवत आपली अभिरुची कशी जोपासावी , असा यक्षप्रश्न त्यांना सतावू लागला. त्याच काळात मुंबई व ठाण्यात ' आचार्य अत्रे कट्टा ' ही संकल्पना मूळ धरू लागली होती. समाजात घडणा-या घडामोडींबाबत प्रत्येकाचे काही विचार असतात,ते त्यांना बोलून दाखवायचे असतात. त्याला हक्काचं व्यासपीठ अत्रे कट्ट्याने मिळवून दिलं.


      कॉलेजची शान म्हणजे आपल्या सर्वांच्या हक्काचा कॉलेज कट्टा.जसा बाजार भरतो तसा हा कट्टा पण भरतो. गोंगाट,गोंधळ,वादावादी,भांडणं,प्रेम,मदतीचा हात,इमोशनल ड्रामा याकरिता कॉलेजचा कट्टा भलताच प्रसिद्ध असतो.



       'कट्टा'ही अशी एक जागा आहे की या ठिकाणी गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, वयाची, विषयाची , वेळेची कसलीच मर्यादा नाही.येथेच जुन्या मित्रांना भेटता येते तर नवीन मित्रही बनतात.कट्टा म्हणजे नुसती चहा प्यायची जागा न राहता निरोपांची देवाण घेवाण करण्याचे ठिकाण  असते.


    लेक्चरनंतर पुन्हा कट्टा बाहेरच्या टपरीवर भरणार. ‘जिंदगी कैसे जीना है’ हा कॉलेज कट्टा शिकवतो. दोस्ती,यारी, मैत्री शिकवण्यासाठी जिवाभावाचे मित्र कट्ट्यावरच मिळतात.

 
    दुपारी संध्याकाळी महिला कट्ट्यावर जमतात.प्रार्थना,गप्पागोष्टी,गाणी,स्वपाकाच्या गोष्टी तसेच सामाजिक प्रश्नांवरविचार मांडत मनाचा कोपरा हळवा करीत त्या सर्वजणी आपल्या भावना व्यक्त करायला ह्या हक्काचा कट्ट्य़ावर येतात.

   अत्रे कट्टा केवळ उच्चभ्रू सुशिक्षित सोसायट्यांपुरता मर्यादित न राहता गिरणगाव, झोपडपट्टी, चाळी अशा ठिकाणी अत्रे कट्ट्याची चळवळ रुजावी,

   सोशल नेटवर्किंगमघ्ये कितीतरी कट्टे आहेत.ई-कट्टा"


    हल्ली काळ इतका झपाट्याने बदलत चालला आहे.समाजात अनेक स्थित्यंतरे होतात.या बदलत्या काळाबरोबर चालणे अनेकांना शक्य होत नाही. मात्र अत्रे कट्टा काळासोबत चालतो आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषयांवरील चर्चांच्या माध्यमातून समाजमन घडविण्याचे काम अत्रे कट्टा करत असून कट्टयाचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.बदलता काळ आणि बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद प्रत्येकामध्ये असतेच असे नाही.मात्र या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत अवितरपणे सुरू असलेला अत्रे कट्टा आजही आपले समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे आणि ही बाब स्वागातार्ह आहे.


   कलाकारांच्या कलागुणाला वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने अभिनय कट्टा चालविला जातो. कट्टयावर नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने शोध कलाकाराचे हे सदर चालवले जाते. 



  कॉलेज कट्टा हा शब्ध सर्वांच्या परिचयाचा असेलच,अर्थातच कॉलेजच्या मुलांच्याच.हा कट्टा कॉलेजची एका प्रकारे शानच वाढवतो हा सर्वांना हवा हवासा वाटतो.थट्टामस्करी,टिगंळ टवाली,पोरी पटवण्याची स्पर्धा,एकमेकांची टेर खेचणे वगैरे हे कॉलेज कट्ट्यावर चालते.कॉलेज लाइफ म्हणजे फुल टू धम्माल. सतत चैतन्य ओसंडून वाहणारं ठिकाण म्हणजे कॉलेज. या कॉलेजमधला कट्टा म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव की प्राण. या कट्ट्यावर काय घडत नाही? ‘जमलेली-बिघडलेली’ गुपितं शेअर करण्यापासून बेरोजगारी, आर्थिक मंदी, काश्मीर प्रश्नाचं चर्वितचर्वण करत जगाची बसल्या जागी सफर घडते ती याच कट्ट्यावर.सुख दु:ख शेअर करण्याची जागा.




  कधी लेक्चर बंक करून तर कधी कॉलेज संपल्यानंतर कित्येकदा तासन् तास कट्टयावर रेंगाळणा-यांची संख्या काही कमी नाही. मजा-मस्ती, चर्चा, राग-रुसवे-फुगवे अशा कित्येक गोष्टी या कट्टय़ाने अनुभवलेल्या असतात. मात्र महाविद्यालयांना सुट्टी पडली की हे कट्टे ओस पडत असतील असाच काहीसा आपला समज असतो. मात्र हे कट्टे कधीच ओस पडत नाहीत. ते कायमच सदाबहार असतात.





  अशीच एक वाचलेली कविता

प्रत्येक कॉलेजबाहेर
असतो एक कट्टा
सुट्टी लागताच कॉलेजला
पडतो बिचारा एकटा

                वावरत असते तरुणाइ
                हौउन तिथे दंग
                अनेक रंग मिसळुन मिळतो
                 कट्ट्याला त्याचा रंग

चहा दोघात मारायचा असतो,
सिगरेट चौघात फ़ुंकायची असते
अभ्यासाच्या विषयाला मात्र
इथे नेहेमीच बंदी असते

                  सिगरेटचा ब्रॅन्ड असतो,
                  प्रत्येकाचा आपला आपला
                 हिरवळीचा विषय मात्र
                  सगळ्यांच्या जीव्हाळ्याचा

प्रोफ़ेसर चा उल्लेख "तो" ने करायचा
इथे असतो नियम
कित्येक पिढ्या आल्या गेल्या
कट्टा मात्र कायम

              वेगळी भाषा असते इथली
              वेगळे असतात कायदे
              सिनीअर्स बरोबर चकाट्या पिटायचे
              असतात इथे फ़ायदे

नापास हौउन यायला इथे
नसते कधी बंदी
दर वर्षी येतात इथे
नवे नवे पंछी

              निवांत बसावे इथे
             मित्रांशी बोलत
             बिन्धास्त बसावे इथे
             फ़ुलपाखरे मोजत

नसतो कट्टा साधसुधा,
असते एक कॉलेज
कट्ट्याशिवाय कॉलेज आम्ही
मानत नाही कॉलेज



लेक्चर बंक केल्यानंतर विद्यार्थी सापडण्याची हमखास जागा म्हणजे कट्टा. एखाद्या गुलदस्त्यात वेगवेगळ्या रंगांची-गंधांची फुलं सजवून ठेवावी तशी मुलं कट्ट्यावर गप्पांची मैफल जमवून बसलेली असतात. कॉलेजातले सगळे ‘नमुने’ या ठिकाणी पाहायला मिळतात. कुणी धावत-पळत कॉलेज गाठणारी, कुणी परीक्षेचं टेन्शन घेऊन फिरणारी, कुणी स्वत:चा क्लास शोधत फिरणारा  ‘बावरे नैन’, कुणी स्वयंघोषित ब्यूटी क्वीन तर कुणी आय अ‍ॅम द बेस्टचा आव आणणारा.याच कट्ट्य़ावर प्रेम जुळतात.प्रेमभंगही होतो.प्रेमासाठी मरामा-याही याच कट्ट्य़ावर होतात. कॉलेज लाइफमधले सर्वात सुंदर क्षण घालवले असतील तर ते आमच्या कट्ट्यावर... कँम्पसचा कॉलेज कट्टा


असे हे आपलेस करणारे कट्टे,  हक्काचे कट्टे 
     जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे हक्काचे क़ट्टे मिळतात.

No comments: