Thursday, August 8, 2013

मंत्र्यांनी उधळलेली मुक्ताफळे



'सैन्यातील जवान हे शहीद होण्यासाठीच असतात. पोलीस आणि सैन्यातील नोकरी असते कशासाठी? भावनेच्या भरात कोणी पोलीस अन् सैन्यात जातो का?'हे वादग्रस्त 'मुक्तचिंतन' आहे बिहारच्या नितीशकुमार सरकारमधील ग्रामविकासमंत्री भीम सिंह यांचे! पाकिस्तानी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांसाठी अवघा देश हळहळत असतानाच मंत्री महोदयांनी हे तारे तोडले आहेत.


शहिदांना श्रद्धांजली वहायाचे सोडुन लोकशाहिने निवडून  आलेल्या मंत्रीमहाशयानी बेताल वक्तव्ये करीत शहीदांचा अपमान केला. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या  वीरजवानांच्या  बलिदानाची किंमत यांना काय कळणार?वीर मरण आलेल्या जवानांचे देशात लोकप्रतिधीअसे हसे करणार असतील तर देशाचे भवितव्य धोक्यात आहे.देशाच्या जवानांबद्दल सन्मानाची भावना राखता येत नसेल तर त्यांनी मंत्रीमंडळात राहू नये.घर  दार सोडूनदेशाच्या सीमेचे रक्षण करणा-या जवानांचा त्याग यांनीपाहिला आहे का?निर्लज्यपणाचा  कळसच  गाठणारा हा मंत्री शहिदांची माफी मागायला देखील लायक नसल्याने यांना  मंत्रीमंडळात   ठेवण्यास   जनतेनी  विरोध   करावा   .'ज्या  दिवशी   विश्वासघातकी  आणि  भ्याड पाकिस्तान
विरोधात आपला  देश  कठोर कारवाई करेल,त्याचवेळी मदत स्वीकारेन'अशी भूमिका शहिदाच्या पत्नीने घेतलीआहे. मंत्र्यानी यांच्याकडून शिकावे देशभक्ती काय असते?

भ्रष्टाचारातून मिळवलेली अमाप संपत्ती, आपले कुणीही वाकडे करू शकणार नाही याचा गर्व आणि या सगळ्यातून आलेली मानसिक बधिरता याचे हे मंत्री महाशय उत्तम उदाहरण आहेत. दुखः एवढेच कि भारतीय सैन्य दल हे सर्व सहन कसे करते. एखाद्या कर्तव्यदक्ष सैन्य अधिकार्याने उठाव करावा आणि भारतमातेला वाचवण्यासाठी सर्व जनतेने या गोष्टीला साथ द्यावी.  
ज्या वीर मातेचा सपुत भारतमातेसाठी शहीद झालाय तीचे दु:ख स्वत:ची पोर महाराष्ट्रात फक्त पोसण्यासाठी आणि गुंडागीरी करण्यासाठी पाठवणा-यांना काय कळणार?लोकशाहिने निवडून आलेले हे महाशय किती पात्र आहेत याचा विचार सामान्यांनी करायला हवा. असे भाष्य केल्याने  सैन्याचे मनोधैर्यचे खच्चीकरण होत आहे.



लोकलज्जा असेल तर माफीनामा नाही यानी राजीनामा देऊन सन्मानाने चलते व्हावे. आपल्या मंत्र्यांना देशाबद्दल,जनतेबद्दल,आपल्या जवानांबद्दल,शेतकरी,कष्टकरी,जनता ह्यांच्या बद्दल किती आदर आहे हे
हे वेळोवेळी,भीम सिंह व अजित पवार वगैरे मंत्र्याच्या बेताल वक्तव्या वरून नेहमीच दिसून आले आहे.

No comments: