सही ला माणसाच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. सही म्हणजे स्वओळख.
सही शिवाय कोणतीच कामे होत नाहीत.प्रत्येक वळणावर सही करावी लागते.शाळेपासून सुरु झालेली ही सही निवृतीवेतनापर्यत सोबत असते.सहीवरुन त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते.आजकाल सहीचा जमाना आहे.सहीशिवाय कोणतेच पान हलत नाही व काम होत नाही. छटाकभराची सही,पण केवढी महत्त्वाची!
सही नसलेला कोणताही कागद कामाचा नसतो.
ज्यांना सही करताच येत नाही,ते अंगठा लावतात.पण सहीची सर अंगठ्याला येणे शक्य नाही. ज्याने-त्याने आपली सही कशी असावी हे ठरवायचे आहे.नेहमीच पुर्ण सही वापरली.जाते पण काही ठीकाणी छोटी सहीही चालते.
व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख विविध माध्यमांतून करता येऊ शकते. व्यक्तीचा स्वभाव, त्याच्यावरील झालेले संस्कार, परिस्थिती तसेच वातावरणानुसार ठरत असतो असे मानले जाते.
कुणी नावातील आद्याक्षरे घेऊन,कुणी पूर्ण नाव लिहून तर कुणी कोंबड्याच्या तुर्र्यासारखी सही करतात. म्हणूच सहीला कावळा व कोंबडाही म्हणतात.
सही केलेला कोरा कागद किंवा चेक कोणाच्या हाती लागू नये याची दक्षता सही करणार घेत असतो.
करारावर सह्या केल्यानंतरच व्यापार सुरु होतो.
वेतनकरारावर सह्या झाल्यावर वेतनवाढ होते.
न्यायाधिशाने सह्या केल्यावर आरोपीला फाशी दिली जाते.
लग्न मोडण्यासाठी सह्या कराव्या लागतात.
मस्टरवर सह्या केल्यावर कामकाज सुरु होते.
पिटिशनसाठी सह्यांची मोहिम काढली जाते.
प्रस्ताव मंजुरीसाठी सह्यांची गरज असते.
धनादेशावरची सही बरोबर असली तरच बँकेतून पैसे मिळतात.
परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर बाबाची सही मिळवणे कठीण असते.
मंत्रालयातील सारी धावपळ फायलींवरच्या सहीसाठीच असते.मंत्र्यांच्या सहीसाठी तेथे रांगा लागलेल्या असतात. एकदा सही झाली की सारं भरून पावतं.
खोट्या सह्या करुन पाहिजे ते गिलकृत करताही येते.
मराठी वाचक पुस्तकावर लेखकाची सही घेतात.
मोठ्या व्यक्तींच्या सह्या गोळा करण्याचा काहीना छंद असतो.
पत्रांच्या लिखाणाची फोरेन्सिक तपासणी केल्यानंतर संबंधित पत्रावरील सह्या खर्या असल्याचा अहवाल दिला जातो.
आपली सही तयार करून त्याची इमेज अपलोड करावी लागेल.ऑनलाईन सही तयार करण्यासाठी ब-याच वेबसाईट आहेत.
आपल्या पैशासंबधीच्या बाबतीत तुमची सही महत्वाची भुमिका पार पाडत असते. सहसा पैशासंबधी सगळ्याच व्यवहारात प्रत्येक व्यक्ती सही अवश्य करत असते. जोतिष शास्त्रानुसार तुम्ही करत असलेले सही शुभ असल्यास पैशासंबधी कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. पण, चुकिचे अथवा दोषपुर्ण सही केल्याने तुम्हाला पैशासंबधी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आर्थिक अडचणींपासून वाचण्यासाठी जोतिष शास्त्रात सही करण्यासंबधी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या सांगण्यात आलेल्या गोष्टींचे पालन केल्यास थोड्याच दिवसात पैशासंबधीच्या अडचणी दुर होण्यास मदत होईल.
तुम्ही भरपुर धन कमवता पण बचत करू शकत नसाल तर तुमच्या सहीखाली पुर्ण रेष मारा आणि त्याखाली दोन टिंब द्या. या टिबांची संख्या जसे जसे धन वाढेल तशी तशी वाढवत जा. लक्षात ठेवा जास्तीत जास्त सहा टिंब तुम्ही तयार करू शकता.
अनेकांना आपल्या सहीचे अप्रूप असते.काही जण तर सतत आपल्या सहीचा सराव करत असतात.अशा व्यक्ती आत्मकेंद्री मानल्या जातात. अशा व्यक्तींमध्ये अहंपणा अधिक असतो.आपल्या शिवाय इतर कोणीही ज्ञानी नाही अशी त्यांची धारणा असते.
ज्या व्यक्तींची सही छोटी असते,अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो असे समजावे.अशा व्यक्तींना स्वतः:वर विश्वास नसल्याने या व्यक्ती हात आखडता घेत आपली सही करत असतात.काही प्रसंगी आळशीपणाही त्यांच्यात दिसून येतो.
नोटांवर गव्हर्नरांची सही असते.ही सही सर्वात जास्त सरकारी कागदपत्रांवर असते.
सही नसती तर ..काय झाले असते?
No comments:
Post a Comment