Friday, August 30, 2013

लघुशंका




    लघुशंका करणे ही नैसर्गिक विघी आहे पण स्वच्छतेचा व सभ्यतेचा विचार करता ही विधी कोठेही करण्यास परवानगी नसते.
 


    लघुशंका करणे हि एक सर्वसाधारण क्रिया आहे. ह्या क्रियेला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.

    "इंग्लंडला विजयासाठी अवघ्या 21 धावा हव्या होत्या आणि काही षटकांचा खेळ बाकी असताना खराब प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला.त्यामुळे पाचवा कसोटी सामना अनिर्णीत राहिला.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिका 3-0 अशी जिंकणा-या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी विजयाचा जल्लोष चक्क ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीजवळ लघुशंका करून साजरा केल्याचे वृत्त वाचण्य़ात आहे.ही सर्व कृत्य अशोभनीय  आहेत."

    "मालिका विजय मिळल्याने इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर जाम खूश होता.त्याने सोमवारी एका बारमध्ये मद्य प्राशन करून धिंगाणा घातला.अखेर बाउन्सरना पोलिसांना बोलवावे लागले.पोलिसांनी त्याला सार्वजनिक ठिकाणी लघूशंका केल्याने ९० पौंड दंड केला. नंतर पानेसरने या सर्व प्रकरणाबाबत माफी मागितली."

    विजयोत्सव साजरा करण्याची नवीन व निराळी पध्दत पाहण्यात आली.खेळपट्टी,मैदाने म्हणजे क्रिकेटपटूंची कर्मभूमी. तरीही खेळाडूंनी मैदानाच्या खेळपट्टीवरच लघुशंका करून लाज आणत संघाला शरमेने मान खाली घालायला लावली.

    "लोट्यात लघुशंका करणा-या ठाण्यातील पाणीपुरीवाल्याचे शुटिंग करून खळबळ उडवून देणा-या अंकिता राणे या जिगरबाज मुलीचे कौतुक झाले."

      घाणेरडा प्रकार उघडकीस आणला.
 


     "पाण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण करणा-या एका शेतक-याची अजित पवारांनी जाहीर सभेत अश्लील शब्दांत टर उडवली होती. 'पाणीच नाही तर मुतता का तिथे', हे त्यांचे उद्गार अत्यंत खळबळजनक होते."

    
  या  लोकांनी याच लघुशंकेचा आपल्याला पाहिजे तसा  उपयोग केला आहे.


     मुंबईत रस्त्याच्या कडेला लघुशंका करणा-यांकडून वसूल केलेल्या दंडाच्या ६५ टक्के दंड वसूल होत आहे.
दंड भरावा लागणाऱ्यांमध्ये सुशिक्षित नागरिकही असतात.


    लहान मूल शू करतं तेव्हा त्याचं कौतुक असतं पण प्रौढ बाप्या पुरुष त्याच जागी मुतायची भाषा करत असेल तर त्याच्यासाठी योग्य ती विशेषणंही मराठी भाषेत आहेत.
 

    करगळी दाखवणे म्हणजे लघुशंका करण्यास परवानगी मागणे अशी पध्दत रुढ झाली आहे.पुरुषच या पध्दतीचा वापर करु शक्यतो.
   
     काही लोक या लघुशंकेचा उपयोग एखाद्याला खिजवण्यासाठी व विरोध दर्शविण्यासाठी केला जातो. 



     पुरुषांना निदान रस्त्यावर लघुशंका करण्यापुरते कोपरे असतात.पण काम करणाऱ्या बायकांची खूपच कुचंबणा होत होती.सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्याची गरज आहे.पण आजही या चित्रात फारसा फरक पडलेला दिसत नाही.


      काहीना अंथरुणात लघुशंका करण्याच्या अयोग्य सवयी लागतात.त्यातून लवकर सुटका होत नाही.


     लघुशंका करणे प्रत्येकाच्या गरजेचे आहे.ते त्याने केलेचे पाहिजे.पण समाजव्यवस्थेने पाडलेले नियम पाळले पाहिजेत.त्याच्या दुरोपयोग करु नये. 

No comments: