Monday, April 28, 2014

दहशतवादाविरोधातली पहिलीच घटना



 दहशतवादाच्या छायेत असलेल्या जम्मू- काश्मीरमधील नागरिकांनी दहशतवाद्याचे किंवा त्यांच्यासाठी काम   करणाऱ्याचे   घर जाळल्याची गेल्या दोन    दशकांतील ही    पहिलीच   पण चांगलीच घटना घडली आहे. दहशतवादाविरोधात स्थानिकांकडून असा उद्रेक पाहिल्या‍दांचा पाहायाला मिळाला. असा विरोध फ़ार पूर्वी झाला  असता तर परीस्थिती आटोक्यात राहीली असती.हेच काम आधी काश्मीर पंडितांच्यावर जेव्हा अन्याय होत होता तेव्हा केले असते तर आज ही वेळ आली नसती.   


स्थानिक मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचे घर संतप्त जमावाने जाळल्याची घटना शनिवारी सोपोर जिल्ह्यातील नौपोरा येथे घडली. इम्रान अहमद दार उर्फ इम्रान जबरू असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने रात्री बंदुकीचा धाक दाखवत मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिच्या घरच्यांनी तसेच शेजाऱ्यांनी तिची सुटका केली. संतप्त जमावाने जबरूचे घर व गाड्याना आग लावली.


या जबरूला यापूर्वी लष्कर ए तोयबाचा पाकिस्तानी दहशतवादी फलादुल्लाह याच्यासह अटक करण्यात आली होती. त्याची अलीकडेच जामीनावर सुटका झाली होती.अतिरेकी म्हणून अटक झाल्यावर जमीन कसा दिला जातो हेच आश्चर्या आहेकायद्यातून यांची बरोबर सुटका होते.म्हणूनच लोकांना कायदा हातात घ्यावा लागत आहे.


स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाचे स्वागत केले पाहिजे.असे धाडस दाखवण्याची वेळ उशिरा का होईना पण आली याला महत्व आहे.ही सुरुवात असली तरी अशी आंदोलने होतील असे वाटते.दहशतवाद्याना चांगलाच धडा शिकवला पाहिजे.शूर काश्मिरी नागरिकांचे अभिनंदन केले पाहिजे. 



दहशतवादी स्थानिकाना हाती घरुन दहशतवादी कारवाया करीत असतात.स्थानिकानी त्यांना हेरुन त्यांची माहीती न धाबरता पोलिसाना दिली पाहिजे.तरच देशात ह्यांच्या कारवाया कमी होतील. अशा घटना वांरवार घडू लागल्यास दहशतवाद्यांना कारवाया करता येणार नाही.या मोठ्या बदलाचे स्वागत झाले पाहिजे.संर्घषातूनच चां‍गले दिवस येतील.  

No comments: