Friday, June 20, 2014

नतमस्तक



            संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रथमच प्रवेश करत असलेले पंतप्रधान संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन सभागृहात तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या मनाची तार छेडून गेले होते.प्रवेश व्दाराच्या पहिल्या पायरीवर पाय न ठेवता मोदी या पायरीवरच नतमस्तक झाले. गुडघ्यांवर वाकून त्यांनी या पायरीला दोन्ही हातांनी वंदन केले.संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारा भारताचा पहिला पंतप्रधान  सर्व जगाला बघण्यास मिळाला. तसेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असताना सचिन तेंडुलकर खेळपट्टीसमोर  नतमस्तक होणे हे स्वाभाविकच होते.एखाद्या कार्यक्रमाच्या स्टेजवर कलाकार नतमस्तक होताना आपण अनेकवेळा पाहिले आहे. मास्टर ब्लास्टर याला वानखेडे मैदानाच्या खेळपट्टीवर नतमस्तक होतानाचा क्षण कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना पहायले होते.सचिनचे हे कृत्य पाहून त्याच्याविषयी क्रिकेटप्रेमींच्या मनात असलेला आदर आणखी द्विगुणीत झाला आहे..ज्यांच्या अफाट कर्तृत्वापुढे आतापर्यंत भले भले नतमस्तक होवून गेले.तो खेळपट्टीपुढे नतमस्तक झाला.


         नतमस्तक होणे हे विनभ्रता दाखवते.शालिनता दिसते.मानवता धर्मामध्ये एवढी ताकद असते की कधीकधी तिच्या ताकदीपुढे नियतीलाही नतमस्तक व्हावे लागते.




                 आई,गुरु व आपल्या कार्यापुढे नत्मस्तक गरजेचे आहे.यानी आपल्यात वेगळीच उर्जा येते.



          ईश्वारासमोर आपण नेहमीच नतमस्तक होत असतो.कित्येक जण देवासमोर सुखशांती करिता श्रद्धेने भाविक नतमस्तक होतात. साष्टांग नमस्कारामुळे आपण देवापुढे पूर्णपणे नतमस्तक होतो. आपल्या मनातील अहंकार दूर होतो. 

           देशाच्या ध्वजाला मान दिला जातो,देशभक्तीने त्याच्या पुढे सारे भारतीय नतमस्तक होतात. 


          सर्वच पक्षांचे नेते अशा गणंग 'संतां'पुढे नतमस्तक होतात. नेत्यांची ही कृती भोळ्या जनतेवर प्रभाव टाकते, ही वस्तुस्थिती आहे. एखादा धर्म अथवा धर्मगुरूविषयी श्रद्धा ठेवणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.असे नतमस्तक होण्यामागे ह्या नेत्यांचा स्वार्थ दिसतो.


            कोणत्याही शक्तीपुढे आपण नतमस्तक होतोच.कोणत्याही महान शक्तीसमोर तुमचे नतमस्तक, अभिवादन, हे तुमच्या अभिमानी, अहंकारी, मनावर सतत पांघरुण घालेल.

              नतमस्तक होणे म्हणजे कमी पणा नाही.पण काहीवेळेला अशा गोष्टी घडतात की त्या परिस्थितीपुढे नतमस्तक होण्याखेरीज पर्यायच उरत नाही. महान व्यक्तीना देखील कोठेतरी नतमस्तक व्हावे लागतेच.



                                    हमें ऐसी अजेय शक्ति दीजिये कि 
                                           सारे विश्व मे हमे कोई न जीत सकें और ऐसी नम्रता दें कि 
                                                      पूरा विश्व हमारी विनयशीलता के सामने नतमस्तक हो। .

No comments: