Thursday, August 7, 2014

विद्यार्थ्यांच्या माथी नापासचा शिक्का



    मुंबई विद्यापीठाच्या निकालात अनेक हुशार विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का बसल्याने परीक्षा विभागाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.विद्यापीठामधील गलथान कारभाराचे द्योतक आहे. विद्यार्थ्यांनी  नापास करण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थी केल्या.  


          हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी मांडलेला खेळ विद्यापीठ कधी संपणार? विद्यार्थ्याला नापास जाहीर करणे याचा परीणाम त्या विद्यार्थ्यांच्या काय याची जाणीव करणे कठीण आहे. विद्यार्थ्याने वर्षभर कसून अभ्यास केलेला असतो. परीक्षाही चांगली दिलेली असते.चांगले गुण मिळणार याची खात्री असताना नापास होण्याची नामुष्की आल्यावर तो विद्यार्थी नक्कीच खचून जात असेल.अशा मनस्थितीत त्याने आत्महत्या करुन जिवाचे बरे वाईट करण्याचा निर्णय घेतल्यास कोण जाबबदार ठरणार? अभ्यास योग्य केला नाही म्ह्णुन विद्यार्थी कि शिक्षण संस्थांचा निष्काळजीपणा? परीक्षेतील अपयश विद्यार्थ्याच्या माथी पडलेले असते.याप्रकरांमध्ये विद्यार्थी नाहक भरडला जात आहे. नैराश्याच्या भोवर्यात अडकला जातो. कुठल्या तोंडाने आई बाबांसमोर जाऊन त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तो कशाने तोंड देऊ शकणार? पण तो सगळ करूनही आत्मविश्वासाने जगण्यास असमर्थ ठरतो. याचेच वाईट वाटते.नापास होणे त्याच्या नशिबी आलेले आहे.त्या काळात ज्या मनस्थितीतून तो विद्यर्थ्यी गेला आहे.त्याचे वर्णन करणे कठीण आहे. त्यानी जे जे  सहन केलेले असेल ते त्यालाच माहीती.  


        अशा निकालाने त्या विद्यार्थ्याचे कुटुंब अगदी खचून जाते.पुढचे आराखडे आखले  असताना असा निकाल लागल्यानतंर त्या कुटुंबावर आघात होतो.मानसिक धक्का सहन करताना पालकांची वाट लागते.समाजाला व नातेवाईकांना उत्तरे देताना नाकीनऊ होतात.अशी वेळ कोणीही विद्यार्थ्यावर येऊ नये.सगळ्यांच्या अपेक्षांचा चक्काचूर झालेला असतो.होत्याचे नव्हते होते.


       काही दिवसानी मुंबई विद्यापीठाच्या चुकीने ह्या विद्यार्थ्याला नापास केल्याचे जाहीर होते.तो विद्यार्थ्यी पास झालेला असतो.नापासाचा शिक्का मिटल्याने त्याचा आंनद गगणात मावेनासा होतो. त्यातच त्याला मुंबई विद्यापीठाच्या सर्व कर्मचारीवर्गाला चोपून काढवेसेही वाटते.नापास झालेल्या मनस्थितीत असताना जर त्या विद्यार्थ्याने वेगेळाच निर्णय घेतला असता तर मुंबई विद्यापीठाच्या चुकीने त्या कुटुंबाचे भरुन न निघणारे मोठे नुकसान झाले असते.विद्यार्थ्यांच्या नशिबाशी विद्यापीठानी खेळू नये.


          अशा गंभीर चुका करणे  मुंबई विद्यापीठाने टाळल्या पाहिजेत. तसेच अशा चुकांमुळे आशियातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या २०१४ च्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ १३१ व्या स्थानावर पोहोचले आहे.

No comments: