Sunday, September 7, 2014

सुशिक्षितानो, शाळेसाठी एक तास द्या.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील लक्षावधी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी ते संवाद साधत होते. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे ते भाषण दूरदर्शन, आकाशवाणीसह विविध वृत्तवाहिन्यांवर लाइव्ह दाखवण्यात आले. या भाषणाबद्द्ल राजकारणीनी राजकारण केले आहे.मिडियाने या भाषणाला मोठी प्रसिध्दी दिली.मुख्यत: विद्यार्थाना या संवादाबद्द्ल चागंली मते मांडली आहेत.समाजात परिवर्नत घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकामध्ये असते. चांगले शिक्षक देश घडवतात. असे शिक्षक घडवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.ह्या मतासह शातील प्रत्येक सुशिक्षिताने आठवड्याचा एक तास शाळेसाठी द्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.


किती महत्वाचे आवाहन आहे.आपण शाळा सोडल्यानंत‍र पुन्हा त्या शाळेत क्वचीतच जातो.आपला शाळेशी संबध संपतो.आपल्याला वेळ असेल तरी शाळेत जात नाही.आपल्या शाळेसाठी वेळ देत नाही.

शाळेत आपण शिक्षण घेतले ती शाळा सोडल्यावर आपल्याला विसर शाळेचा विसर पडतो. शाळेचे आभार मानायलाही परत शाळेत नाही.त्या वेळेला शालॆयजीवनात असतो.पण मोठे झाल्यावरही जात नाही.आपल्याला शिक्षक ओळखणार नाहीत यामुळे आपण शाळेत जाण्याचे  टाळतो.मित्रानी जर एकत्र शाळेत जाण्याचे ठरविले तरच काहींचे शाळेत जाणे होते. 


पूर्वी गावात शिक्षक हा सर्वात आदरणीय व्यक्ती असायचे. मास्तर म्हणतील ते सर्वजण ऐकायचे. पण आता स्थिती बिघडली आहे. शिक्षकांबदलचा आदर कमी होतोय. पण पूर्वीची ती स्थिती आपल्याला पुन्हा आणयची आहे.

आता शाळेला जशी गरज आहे तशीच विद्यार्थ्यानाही माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.आपण जीवनात कसे जगलो कसे शिकलो हे विद्यार्थाना सांगितले पाहिजे.त्याच्या प्रश्नाना उत्तरे दिली पाहिजेत.पण त्यासाठी शालेत जाणे गरजेचे झाले आहे.आपल्या गतिमान काळात प्रत्येकाला वेळ कमी पडतो.तरीपण आपण वेळ काढून शाळेसाठी थोडा दिला पाहिजे. असे प्रत्येकाने ठरविले तर विद्यार्थ्यांचा त्याचा फ़ायदा होईल.पंतप्रधानानी सांगितले म्हणुन नाही तरी प्रत्येकाने विचार केला पाहिजे पुढच्या पीढीचा आणि शाळेला भेट दिली पाहिजे. तर मग चला.

No comments: