Sunday, April 12, 2015

निराशेच्या पोटी असू शकते आशा



मनात योजलेल्या गोष्टी घडल्या नाही तर आपली निराशा होते.तसेच अवाजवी, अतिरेकी, अवास्तव व काल्पनिक स्वप्न पाहत असू ते अपूरे राहीले की घोर निराशा होण्याची शक्यता असते.स्पर्घेत अपयश आल्यानेही निराशा होते.दुस-याबद्द्ल आपण अपेक्षा ठेवतो त्यांला त्या पूर्ण करता आल्या नाही तरीही आपण निराश होतो.कोणी फसविले की निराशा येते. जगात निराशावादी लोकांचे प्रमाण वाढलेले आहे हे नक्की. कुरकुरे लोकं हे नैराश्याने ग्रासलेले लोकं.नैराश्य येण्यास कुठलंही लहानसं कारण पुरेसे असते,आणि जर  हे कारण फार काळ टिकून राहिलं तर धोकादायक ठरु शकते.माणसाच्या आयुष्यभर हा आशा आणि निराशेचा खेळ अखंड चालू असतो.मनासारखे घडले नाही तर निराशा दाटून येणे साहजिक आहे,पण जे काही निराशाजनक घडले आहे ते कायमसाठी नसते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.यश प्रत्येकालाच हवे असते, पण ते मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणेदेखील आवश्यक असते.बरेचदा प्रयत्न करूनही यश पदरात पडत नाही. अशा वेळी पदरी निराशा येऊ शकते.आवडीचे क्षेत्र न मिळाल्याने निराशा पदरी पडते आणि ही निराशाच मानसिक आजाराचे कारण बनते.अवास्तव इच्छा मनात ठेवून ध्येय निश्चित केल्याने ते गाठण्याऐवजी निराशा पदरी येऊन पुढचे मार्ग खुटल्याने निरशेच्या पोटी जातो. निराशा माणसचा उत्साह खच्ची करते. ऊर्मी आटवून टकते.जगण्याचा कंटाळा येतो.जीवनात थोडीफार तडजोडीची भूमिका स्वीकारल्यास निराशा पदरी येत नाही,हे ही खरे आहे. निराशा म्हणजे आनंदाच्या विरोधी टोक. आनंदाच्या रसायनांच्या अगदी विरुद्ध प्रकारची ही रासायनिक अवस्था असते. निराशावादी विचार करून करून आनंददायी रसायने मारली जातात.  

संकेतस्थळावरील मैत्री जोडण्याच्या विनंतीला मिळालेला नकार प्रत्यक्ष जीवनात मिळालेल्या नकाराइतकाच, किंबहुना त्यापेक्षा अधिक डाचणारा असतो. म्हणूनच हल्ली तरुणाईचा मानसिक तणावही जास्त वाढत आहे.




जीवनाविषयी भयंकर निराशा पदरी पडलेला माणूस खिन्न मनःस्थितीमध्ये असतो.आयुष्यात जगण्यासारखे काहीच शिल्लक राहिलेले नाही अशी त्याची मनोमन खात्री पटते.जगातील शेकडो यशस्वी लोकांच्या मनात नैराश्यामुळे एका क्षणी असाच आत्महत्येचा विचार येतो.त्या क्षणावर ज्याने मात केली तो निराशेतून बाहेर पडू शकतो.

नैराश्य आलं की फक्त एकटं न रहाता, आपल्या मित्राबरोबर, जरी राहिलं तरीही त्या भावनेवर मात केली जाऊ शकते.दुस-याशी मनात काय ते बोलून संवाद साधल्यास या नैराश्यातून बाहेर पडणॆ सहज शक्य होऊ शकते.लहानपणापासून सकारात्मक विचारांची सवय लावली तर निराशारूपी अंधार आणि अविचारी वृत्ती मुलांच्या आयुष्यात डोकावणार नाही, अशी आशा वाटते. अर्थात मनाची शक्ती वाढवण्यासाठी मुलांनी देखील प्राणायाम, ध्यानधारणा, सात्विक वाचन या गोष्टी स्वतःहून केल्या पाहिजेत आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. निराश होण्यापेक्षा आपल्यातल्या उपजत शक्ती व उणीवांचा मागोवा घेणे आवश्यक आहे.नव्याने स्वत:ची ओळख करून घ्यायला हवी.सत्याचा स्वीकार करायला हवा. आपली बलस्थाने व उणीवांचा पुन्हा एकदा अभ्यास करणे आवश्यक आहे.ऊणीवा दूर करून योग्य त्या संधीसाठी नव्याने सज्ज व्हायला हवे! 



पल में आशा...पल में निराशा......जीवन बस एक तमाशा.


निराशा पदरी असली तरी,आशा सोडू नये.त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा.

No comments: