Tuesday, April 7, 2015

नौदलाकडून ढिसाळपणा अपेक्षित नाही.



   माझगाव गोदीमध्ये तयार होत असलेल्या स्कॉर्पिन पाणबुड्यांपैकी पहिली 'कलवरी' पाणबुडी सोमवारी जलावतरणपूर्व चाचण्यांसाठी सज्ज झाल्याने आंनद झाला. माझगाव गोदीचे मनुष्यबळ सुमारे १० हजार आहे. गोदीतील कामगारांसाठी पाणबुडी पुढच्या टप्प्यावर जाणे हा आनंदाचा दिवस होता. संरक्षणमंत्र्यांनीही त्यांना मराठीतून शुभेच्छा देऊन माझगाव गोदीचे महत्त्व अधोरेखित केल्यामुळे 'सारे जहाँसे अच्छा'च्या सुरांवर नौका तराफ्यावरून पाण्यात लोटताना कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.    

नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांना काही वर्षांत झालेल्या अपघातांना मानवी चुका कारणीभूत होत्या. प्रमाणित कार्यचलन पद्धतीचा (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर- एसओपी) अवलंब करण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेफिकिरी दाखवल्यामुळे हे अपघात झाले, असा अप्रत्यक्ष ठपका संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी ठेवला.   

निर्धारित मुदतीत पहिल्या स्कॉर्पिन पाणबुडीचे जलावतरण केल्याबद्दल माझगाव डॉकचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांना काही वर्षांत झालेल्या अपघातांना मानवी चुका कारणीभूत होत्या. प्रमाणित कार्यचलन पद्धतीचा (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर- एसओपी) अवलंब करण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेफिकिरी दाखवल्यामुळे हे अपघात झाले आहेत.  

नौदलकार्यातील  ढिलाई व सुस्तावलेपणामुळे पाणबुड्या व युद्धनौकांना अपघात  होते असल्याचे वाचून चिंता वाटू लागली.या अशा ढिलाईने  देशाचे न भरून निघणारे मोठे नुकसान    होत आहे. गेल्या वर्षापासून मुंबईच्या सागरी सुरक्षेवर   करडी नजर  ठेवणाऱ्या पाणबुडय़ांना होणाऱ्या अपघातांची   मालिका   सुरु आहे. नौदलकार्यात ठरवून दिलेल्या    प्रमाणित    पद्धती का पाळण्या जात नाहीत? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेफिकिरी  दाखवल्यामुळे हे अपघात  होते   असतील   तर ते घातक आहे.


संरक्षण दलासाठी "मेक इन इंडिया‘ धोरण  आखले जाणार आहे.पण मानवी चुकाने ते ’लुझ  फॉर्म इंडिया’ घडणार याची जबाबदरी      नौदलाने      स्विकारली    पाहिजे. यापुढे बेफिकिरीने    अपघात  होणार नाही  यासाठी नौदलाने सर्तक राहावे.  

No comments: