Wednesday, April 15, 2015

मिरवणुकांचे समर्थन करता येत नाही.



 सण जल्लोषात, उत्साहात साजरा होतात.पण या सोहळ्यातून किळसवाणी व अश्‍लील गाणी वाजवण्याचा तरुणाईचा आग्रह किळसवाणा ठरतो.मिरवणूक जंगी झाली पाहिजे, मजा आली पाहिजे,नाचून-नाचून जल्लोष केला पाहिजे, पण कोणचं गाण वाजवायचं, हे आपणच ठरवलं पाहिजे. माना शरमेनं खाली जाव्यात, असं गाणं का वाजवायचं?डीजेचा दणदणाट, हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या संगीताचा दणदणाट, बेधुंद नाचण्यात मग्न तरुणाई हा हल्लीच्या मिरवणुकींचा थाट आहे.हे उत्सव नसून धांगडधिंडा असतो.त्याला आळा घालण्यास कोणीच पुढे धजावत नाही ही आपली सांस्कृतिक शोकांतिका आहे.धार्मिक सण-समारंभ आणि वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने शहरामध्ये निघणाऱ्या मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण हा गंभीर विषय बनला असून, या उपक्रमाचा नागरिकांनाही त्रास होतो आहे. या संदर्भात कायदे असून त्यांची अंमलबजावणी होत नाही,अलीकडे समारंभांना धर्म आणि आस्थेपेक्षाही सार्वजनिक प्रदर्शनाचे स्वरूप आले असून, यात सर्वसामान्य नागरिक भरडला जातो आहे.   

 गणपतीबाप्पा, देवी, छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर व साईबाबा या सगळ्यांनाच आजकाल अशी थिरकणारी गाणी ऐकावी लागत आहेत.आपला समाज नक्की चाललाय तरी कुठे तेच उमजेनासे झालेय. खरंच एकूण कठीण आहे.तो नाचगाण्याचा उत्सव बनायला लागला आहे. लेटेस्ट हिंदी- मराठी गाण्यांच्या डीजेवर बेभान होऊन नाचण्यासाठी दरवर्षी काही गाणी तरुणाईच्या दिमतीला असतातच. 

 मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदुषणाचे सारे नियम धाब्यावर बसवून ढोल ताशे आणि डिजेंचा दणदणाट सुरू होता. मुख्य शहरात तर ध्वनी प्रदुषणाची पातळी जवळपास दुप्पटीने वाढते.

गाणी वाजवा पण चांगली आणि देवा धर्माची वाजवावी कारण त्यामुळे सर्वांना आनंद व आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते, मानवाने वाईट वागणूक सोडून चांगले वर्तन करावे त्यामुळे देशाचे पर्यायाने आपल्या देशातील संस्कृतीचे दर्शन होत असते, आपल्या देशाचे नाव बदनाम होण्यापासून वाचवले पाहिजे कारण हेच आपले भूषण आहे. म्हणून कोणत्याही मिरवणुकीमध्ये चांगली सर्वांच्या मनाला भावतील अशी गाणी वाजवावी.

बॅंड, बेंजो किंवा एकूणच वाद्य ठरवले असेल तर त्यांच्याकडून सादरीकरण होणाऱ्या गाण्यांची यादी घ्या. त्यातील कोणती गाणी तुमच्या मंडळासमोर वाजवली पाहिजेत आणि कोणतीही अजिबात वाजवायची नाहीत, याची यादीच त्यांना द्या. "घेणारे‘ कितीही आग्रह करत असले तरी तुम्ही बघु नका. कारण, टप्प्याटप्प्याने गणेशोत्सव अधिक सामाजिक, अधिक निसर्गपूरक, अधिक सर्वसमावेशक करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. मिरवणुकीतील अश्‍लीलता बाजूला सारून यंदाच्या मिरवणुकांमध्ये झक्कास गाणी वाजवा. त्यावर नक्कीच ताल धरा. भरपूर नाचा, मज्जा करा. "काय रे पोरांनो, कसली घाणेरडी गाणी लावली होतीत काल?‘ असं दुसऱ्या दिवशी कुणी म्हटलं नाही तर समजा, तुमची मिरवणूक झक्कास झालीय.   

ढोल ताशांचा गजर, लेझीम पथकावर थिरकणारी छोटीशी पावले, विविध चित्ररथ असा नववर्षाच्या शोभायात्रेतूनच फक्त संस्कृतीचे दर्शन घडते.  

No comments: