Sunday, October 4, 2015

नशा ढोल आणि ताशाची


                    
             ढोल-ताशा संस्कृती ही आपली संस्कृती असून,ती राष्ट्रीय वारसा जतन केल्यासारखीच आहे. ढोल-ताशाचे   लोण हळूहळू सर्व महाराष्ट्रात पसरु लागलंय.शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये        ढोल-ताशा पथकांनी लाखो भक्तांना ठेका धरायला लावला आहे.यंदा अनेक मंडळानी गणरायाचे स्वागत ढोलताशांच्या    गजरात केले गेले.   विशेष म्हणजे    या   पथकातून  युवकांबरोबर युवतीही यात सहभागी झाल्या आहेत.ढोल आणि ताशा वाजविणे ही एकेकाळी फक्त पुरुषांच्या मक्तेदारीला युवती आणि स्त्रियांनी आपल्या शिस्तबद्ध व कलात्मक ढोलवादनाने सुरुंग लावला आहे.आपली वादन कला    सादर करण्यासाठी     आपल्यातली एकता 
दिसावी या करिता ते मुलांना वा मुलींना सफेद सदरा-लेंगा व नारंगी रंगाचा पंचा देतात व खास मुलींसाठी लाल रंगाचा जॅकेट दिला जातो.या पथकात शिस्तबध्दता असल्याने त्यांचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.आपल्या संस्कृतीचे हे देखणे रुप आवडल्याने पथकातील वादकांची संख्या वाढत आहे.

पंरपारिक पेहराव करुन ढोलताशे वाजवण्या-या तरुणाईने पथक काबीज केली आहेत.ढोलताशाने तरुणाईला भूल पाडली आहे.शाळकरी मुला-मुलींपासून ते कॉलेजला जाणारे,नोकरी करणारे,महिला अशा वेगवेगळ्या वयांचे सभासद पथकात आहेत.त्यांपैकी बरेच जण चांगले शिकलेले आहेत.पेशाने इंजिनीयर, डॉक्टर,सीए असणारे. एक छंद म्हणून ढोल-ताशा वाजवायला म्हणून आपणहून पथकात सामील होतात.ढोलताशाचा आवाज तरुण-तरुणींना आकर्षित करील असा असतो.प्रत्येकात आपण ढोलताशा वाजवण्याची इच्छा निर्माण होत आहे.याना ही वाद्ये  वाजवण्यात कमीपणा वाटत नाही उलट आवडीने वेळ काढून वाजवले जात आहे.युवावर्गातील जोश, ताकद आजमावणारी,त्यांना वादनाचा मनमुराद आनंद देणारी ढोल-ताशा पथके अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली. सततचे काम, ताण,टेन्शन,करिअर यात  दबलेल्या तरुणाईला ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याचे माध्यम मिळाले.


टिव्ही,मोबाईल,सोशल मिडीयात दिशाहीन झालेल्या तरुण पिढीला या माध्यमाने एकत्र आणण्याचे काम केले आहे. यांच्यासाठी ढोलताशा एक नॉस्टॅल्जिया आहे.उच्चशिक्षित तरुणांचा वर्गही या पथकांत सामिल होण्यास उत्सुक असल्याने चित्र दिसते.पालकही मुलींना ही वाद्ये  वाजवण्यासाठी सोडतात.मोबाईलच्या संवादाच्या काळात वास्तवातील संवाद जपण्यासाठी हे पथक कार्यरत आहेत.मराठी संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न या 
तरुणाईकडून होत आहे.व्हर्च्युअल आंनद मिळविण्याच्या नादात आजची पिढी ख-या अर्थाने जगण्याचा आनंद हरवून बसली आहे.म्हणुनच एकत्र येणे,शिस्त्बध्द पध्दतीने काम करणे,सामाजिक बांधिलकी जपणे,सामाजिक समश्यांवर वास्तवात चर्चा व कृती करणे अशा अनेक गोष्टी ही ढोलपथके पंरपरा जपण्यासोबतच करत आहेत. 
   
   
   दिवसभर शिक्षण व नोकरी  करून सरावाला येणे,हीच खरी यातील पॅशन आहे.आपला वारसा नष्ट होत आहे,असे म्हणणा-यांनी या मुलांकडे बघणे जरूरीचे आहे.आपली ताकद कुठे वळवायची,हे ठाऊक असणे गरजेचे आहे. पबमध्ये दारू पिणे, फुकट वेळ वाया घालविणे, त्यापेक्षा तरुणांनी इथे येऊन वेळ घालविणे कधीही चांगले आहे. जगभरात सण-उत्सवांमध्ये वाद्ये वाजविली जातात. मग, आपल्या इथे आपली वाद्ये वाजविली तर त्यात चुकीचे काय आहे. यावर बंधने घालणे चुकीचे आहे.ढोल ताशाने तरुणाईला वेड लावले आहे.


  ही पथक हे पैसे मिळवण्यासाठी उभे केलेले नाही तर आपली संस्कृती जपण्यासाठी सुरू झालेली चळवळ आहे. त्यायोगे सत्कार्य व्हावे ही भावना पथकातील सभासदांची असते.ढोल-ताशाच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. 


  शिस्त, वादनाची विशिष्ट पद्धत आणि ताल घरीत दिवसेंदिवस या ढोल-ताशा पथकांचे स्वरूप बदलत आहे.त्याला लाभलेली परंपरा आणि त्यातून मिळणारा आनंद या सगळ्यागोष्टी लक्षात घेऊन तरुणाई कोणत्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता याकडे वळली आहेत.ढोल-ताशा पथकांमुळे संस्कृतीची जोपासना करण्याचे काम तरुण वर्गाकडूनहोते आहे.आनंदोत्सव साजरा करण्याचा चांगला पर्याय ढोल-ताशा पथकांनी निर्माण केला आहे.  

No comments: