Saturday, August 26, 2017

फुगेवाला

फुगेवाला






रस्त्यांवरुन जाताना समोर एक फुगेवाला आला.सायकलच्या मागेलाल पिवळा, हिरवा, निळा रंगीत फुगे लावले होते व हॅन्डलवर छोट्य़ाशा बास्केट मध्ये एक छोटीशी मुलगी बसलेली दिसली.तो फुगेवाला सायकलवरुन उतरुन चालत चालला होता.मुलगी सायकलवर होती.

रंगीबेरंगी फुगे बालगोपाळांना फार आवडतात. हवेत तरंगणाऱ्या फुग्यांचे त्यांना भारी कौतुक वाटते. फुग्यांमागे धावणे हा त्यांचा आवडता छंद असतो.कोणाला लाल, तर कोणाला निळा, तर कोणाला एक सोडून दोन फुगे विकत देऊन तो या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत होता.फुगेवाला दुस-यांच्या मुलांसाठी फुग्याच्या रुपात आंनद विकत होता.पण स्वत:च्या मुलीला मात्र त्या आनंदापासून  दूर ठेवत होता.हे करताना त्याला कीती दु:ख होत असेल.आपल्या फुग्यांवर दुस-याची मुलं खुश दिसतात.पण आपल्या मुलांना आपण खुश करु शकत नाही.याची त्याला खंत होत असेल.तिलाही वाटत असेल बाबांनी मलाही फुगा द्यावा.मी पण फुग्याबरोबर खेळावे.फुगे विकून मिळणा-या पैशावर त्यांचा चरितार्थ चालत असणार.

मी त्याला विचारले,आपल्या मुलीला फुगे आवडत नाही का?.त्यावर तो म्ह्णाला, कोणत्या
लहान मुलाला फुगे आवडत नाहीत? तीला पण खेळायला फुगे पाहिजे असतात.कोणते मुल आपल्या एवढ्या जवळ फुगे असूनही शांत बसेल?मला वाईट वाटले. मी त्यांच्याकडे उरलेले  
सगळे फुगे विकत घेऊन त्या मुलीला दिले.त्या मुलीला खूप आंनद झालेला दिसला.पण सगळे फुगे लगेच संपून देखील तो फुगेवाला नाराज दिसला.ती मुलगी रोज फुगे विकून देणार नाही याची त्याला भिती वाटू लागली.




आपल्या मुलीला न देता दुस-यांच्या मुलांना आंनद देणारा फुगेवाला. 

No comments: