Thursday, December 26, 2019

… तिची अदभूत केशरचना!



आपल्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे असे वाटत असेल तर केशरचना नीटनेटकी असणे आवश्यक आहे. स्त्रीपुरूष या दोहोंनाही केशभूषेचे आकर्षण असते.आपल्याला सुंदर बनविण्यात अनेक गोष्टींचा सहभाग असतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपले केस. केवळ सुंदर केस असूनही चालत नाही. त्यांची रचनाही तितकीच आकर्षक असावी लागते.आपली केशरचनाच आपल्या सौंदर्यात मोलाची भर घालत असते.

आदिवासी पाड्यावर वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीला गेलो होतो.तेथील पाड्यावर फिरलो व आदिवासींना भेटलो. त्यांच्या कुटुंबातल्या सदश्यांना भेटलो.भेटी दिल्या.त्यांच्यातल्याच एका लहान मुलीच्या केशरचेने माझे लक्ष वेधून घेतले.ती लहान उघडी मुलगी तीच्या पेक्षा थोडीशी मोठी असलेल्या मुलीच्या कमरेवर बसलेली होती.तिची केशरचना एखाद्या अभिनेत्रीसारखी होती.
ऑस्कर पुरस्कारच्या वेळेत अभिनेत्री किंवा सौदर्य स्पर्धेत अशी केशरचना पाहिल्यासारख्या वाटले. केसात गवताच्या काड्या व गवताच्या बिया अडकलेल्या होत्या.रंगाने काळी सावळी होती.नाक वाहत होते.तोंड कशाने तरी काळे झालेले होते.समोरचे काही केस कापलेले होते.काही दिवस तिला आधोंळ घातली नसेल अशी दिसत होती तरीही तीला केशरचना शोभून दिसत होती. अस्वच्छ होती पण निर्सगाशी एकरुप झाली होती.मी त्या मोठ्या मुलीला विचारले,या मुलीची केशरचना कोणी केली? ती प्रथम लाजली.मग तिने मी केली असे सांगितल्यावर मला आश्चर्य वाटले.या मुलीला अशा केशरचनेबद्दल कोणी सांगितले किंवा शिकवले असेल असा प्रश्न पडला.तेथे इतर काही मुली होत्या पण त्यांची केशरचना विशेष नव्हती.आदिवासी महिलांच्या केशभुषेपेक्षा ही केशभूषा  वेगळीच दिसली.आदिवासी पाड्यावर केशभूषेला तसे महत्व नसते.महिलांना वेळ व आवडही नसते असे वाटते.मात्र सणाला याच महिला सजतात व नाचतात.साजेशी केशभूषा असली पाहिजे व जसा चेहरा तशी केशभूषा असावी एवढेच महत्व.आदिवासी महिलांच्या केशभूषा याविषयी निरनिराळ्या भागात विविध प्रथा आढळून येतात.

साजशृंगाराची आदिवासींना आवड असते.अंगावर गोंदवून घेणे, समारंभप्रसंगी शरीरास रंग लावणे, केशभूषा करणे, गळ्यात रंगीबेरंगी माळा घालणे हे प्रकार सर्व जमातींत आढळतात.भडक रंगाचे कपडे घालून सजत असतात.कपड्यांचा वापर फारच अल्प करण्यात येतो. 

काळाभोर घनदाट केशसंभार असलेल्या स्त्रीचे सौंदर्य अधिकच सुंदर दिसते यात वादच नाही.महिला फॅशन शिवाय राहू शकत नाहीत. 'फॅशन' ही आधुनिक काळातील एक महत्त्वाची प्रेरणा मानली जाते.


No comments: