Tuesday, March 31, 2020

अनाठायी भीती

                                                      अनाठायी भीती

काय राव, किती दिवस झाले घरात आहात ते?घरात कोणाला प्रवेश नाही आणि घरातून कोणाला बाहेर जाण्याची परवानगी नाही.   संचाररबंदीपासून आठ दिवस झाले घरात बसलात.आतापर्यतच्या आयुष्यात एवढे दिवस आजाराशिवाय कधी घरात राहीलात होतात का? आठवा. नाही ना आठवतं. तरमग आश्चर्य वाटयला हवं. का बरं झालं असेल असं? घाबरुन नाही तर विषाणूच्या भितीने  घरातून बाहेर पडण्याचं  कोणीच  धाडस करत नाही. भीतीने सर्व धर्माचे,श्रीमंत गरीब,ताकदवान दुबळे,राजकारणी सामान्य सर्वांनी घरात कोंडून घेतले आहे.मनात भरलेली  भीती असतेच अशी. भीती ही नैसर्गिक आहे व भिती वाटण्यात गैर काही नाही. स्वसंरक्षणासाठी भीती ही आवश्यक आहे.एखाद्या गोष्टीबद्द्ल भीती वाटू लागली की आपण त्या गोष्टीला आपण धाबरायला लागतो. भीती ही मानवाचा मोठा शत्रु आहे. नेहमी अज्ञात संकटाची भीती वाटत असते. भीती  हा प्राणिमात्राचा स्थायीभाव आहे.प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती वाटत राहते.

विषाणूच्या भीतीने संपूर्ण देश घरात बंदीस्त झाला आहे.अशाप्रकारे देशातील नागरिकांना घरात बंदीस्त करण्याची कोणात ताकद होती का? पण ते विषाणूच्या भीतीने ते शक्य झालं. परदेशात या विषाणूने केलेली वाताहात पाहून आपल्या देशात अशी परिस्थिती       उदभवली तर काय होईल? या भीतीने  देशात दक्षता घेतली गेली.याच भीतीपोटी देशाचे राज्यकर्त्ये सर्तक झाले  आणि लोकांच्या सुरक्षेसाठी योजना आखू लागले.


विषाणूशी लढण्यासाठी रुग्णालयातून डॉक्टर व नर्सेस   काम करीत आहेत.  त्यांना भीती वाटत नसेल का? वाटते ना. तरीही डॉक्टर व नर्सेस संसर्गाची भिती न बाळगता सुरक्षित साधन वापरुन विषाणूशी लढत आहेत. 


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणून २१ दिवसांच्या देशव्यापी टाळेबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी, रोजगार गमावलेल्या हजारो कामगारांनी आपल्या मूळ गावांकडे परतण्याची धडपड सुरू केली आहे. त्यामुळे करोना विषाणूपेक्षाही ही भीती आणि धास्ती हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

भीती..पाण्याची, आगीची, उंचीची..कसलीही! भीती ही मनाची एक अवस्था आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते ती प्रत्येक वेळी भीतीदायक असतेच असं नाही. मात्र कोणतीही भीती काढून टाकण्यासाठी स्वत:च्या मनाला स्वत: समजवावं लागतं. सामान्यत: सर्वानाच भेडसावणारी ‘लोक काय म्हणतील’ या मुख्य भीती असते. 

तर जेव्हा  व ज्याची भीती वाटते,त्या गोष्टीविषयी माहीती मिळवून त्याचा संपूर्ण विचार करुन  एक तर ती भीती मनातून काढून  टाकावी किंवा ती परिथिती आलीच तर तिचा मुकाबळा कसा करायचा याचा आराखडा तयार करुन त्यावर कृती करायची.अतिविचार आज तरी करु नका. नाही तर भित्यापोटी ब्रम्हराक्षस अशी आपली अवस्था होईल.भित्यापोटी ब्रम्हराक्षस असतो हे ध्यानात ठेवा. मनातली अनाठायी भीती घालवा.बिनधास्त रहा पण घरातच रहा. हेही संकट लवकर दूर होईल.

भीतीनेच विषाणूशी लढण्याचे सामर्थ्य मिळाले.

No comments: