जीवनशैलीतला बदल
संचारबंदीने प्रत्येकाच्या जीवनशैलीत बदल आणला आहे.जगण्याची एक शैली ( Life Style ) होती.काय मजेचे दिवस होते आणि आता काय आहेत.वाटलं नव्हतं एवढा मोठा बदल घडेल.
उशिरा उठून मोबाईल चार्जिंगला लावून पटापटा नाष्टा करुन, इस्त्रीचे कपडे चढवून, मस्तपैकी सेंट मारुन ,पॉलिशचे बूट घालून, बॅग घेऊन, खिशात पैसे नाहीतर कार्डस आहेत का ते तपासायचे व डबा न घेता मोबाईल घेवून टकाटक बनून आपल्या गाडीने किंवा पहिल्या दर्जाच्या रेल्वेने प्रवास करीत ऑफिसला पोहचायचो.लाबंचा व गर्दीचा प्रवास करुन आल्याने ऑफिसमध्ये पुन्हा फ्रेश होऊन नाष्ट्यांची वाट पाहत फाईल चाळत इतराशी गप्पा छेडीत बसायचे.आवडत्या व्यक्ती आल्यात की नाहीत ते पाहयचे. कॅटींनचा नाष्टा करुन मग कामाला सुरुवात करायची. दुपारचे जेवण कॅटींनमध्ये आपल्या लंचग्रुप बरोबर घेण्यात वेगळीच मजा असते.जेवणानंतर सिगरेट व आईस्क्रिम खाण्यासाठी बाहेर रस्त्यावर फेरी मारुन पुन्हा डेस्कवर बस्थान मांडायचे.कामाच प्रेशर असल्याने सिगरेटची पाकिटे व चहाचे कप रिकामे होत असत.मोबाईल डोळ्यासमोरुन दूर करणे शक्य नव्हते.संध्याकाळी उशिरापर्यत ऑफिसमध्ये थांबल्याने घरी जाताना मित्रांना भेटून बारमध्ये टेंशन रीलीज करुन मग उशिरा घरी पोहचयाचे.व्यसनाधीन झाल्याने घरात शांतता नव्हती आणि वाद वाढले होते.
शनिवार व रविवार सुट्टी असल्याने शुक्रवारी दोन पेग जास्त व्हायचे. शनिवारची पहाट उशिरा व्हायची नंतर सर्व कामे फुसरत मध्ये करीत घरातले नाष्टा व जेवण आवडत नसल्याने पण घरच्यांना तुम्हाच्या किचनला आज आराम असे सांगत हॉटेलमध्ये जायचे. सगळेच खुष.संध्याकाळी मित्रांकडे किंवा एकाद्या कार्यक्रमाला किंवा चित्रपट्ला जाऊन रात्री बाहेर जेवून घरी परतायचे.रविवार मित्रांसह मुंबईच्या जवळ असलेल्या रिसॉर्टवर जमून धमाल करायची व रात्री दमून घरी पोहचायचे.असे दिवस व आठवडे जात होते.
या जीवनशैलीने चिंता वाढवली आणी मधुमेह, अस्थमा, हृदयविकार व उच्च रक्तदाब आजाराने बेजार केले आहे.डॉक्टरकडच्या फे-या व गोळ्या वाढल्या आहेत.याने नव्या पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे.
संचारबंदी सुरु झाली आणि मोठा बदल अनुभवला.ऑफिसला जायचं नसल्याने कधीही उठतो.बाहेर पडायचं नसल्याने लोळत पडतो. व्यायाम केला तर ठिक आहे नाहीतर घरातल्या कामात चांगलाच व्यायाम होतो.बातम्या पाहत घरातला बनलेला नाष्टा करतो. वर्क फॉर्म होम असल्याने तयार होत नाही.प्रवासही नसतो. कपडे,सेंट,बुट व बॅग या गोष्टींची किती दिवसात गरज लागली नाही. सर्वांना ऑनलाईन भेटून गप्पा करतो.बॉस मेल किंवा फोनवरोन कामे देत राहतो.दिलेली कामे तातडीने पूर्ण होतात.भूक लागली की लॅपटॉप बाजुला ठेवून घरात शिजलेले अन्न कुंटुबासह जेवतो.जेव्हा घरात चहा होईल तेव्हाच चहा मिळतो.नतंर दिलेले काम संपत नाही तोपर्यत काम करत बसतो.संध्याकाळी लॅपटॉप बंद करुन कुंटुबात सामिल होऊन त्यांच्यासह वेळ घालावतो.टि.व्हीवरील चित्रपट किंवा जून्या मालिका पाहतो. मुलांशी खेळत रात्रीचे जेवण करुन संगीत ऐकत किंवा पुस्तक वाचत झोपतो.
जीवनशैलीत मोठा बदल जाणवला आहे.घरात शिजलेले अन्न खाल्याने चरबी कमी होऊन पोटाचा घेर कमी झाला आहे. कपडे सैल झाले आहेत.पैशाची मोठी बचत झाली आहे.ऑफिसला जायचे नसल्याने प्रवास होत नाही. घरात भरपूर वेळ मिळत आहे. घरातील जेष्ठांची सेवा करता येत आहे.सिगा रेट,दारु व गुटखा खाणे बंद झाल्याने आजारपण कमी झाले आहे. कुंटुबाला वेळ दिल्याने कुंटुबीय खुष आहेत. कामाचा प्रेशर कमी असल्याने दारु प्यावीशी वाटत नाही.सगळी व्यसने दूर पळाली.सर्व गोष्टी ऑनलाईन मागवता येत असल्याने सगळ्या सुखसोयींचा आंनद घेत जगत आहे.नवा बदल हवा हवासा वाटत आहे.
नको ती स्टाईल अंगाशी लावून घेत शरीराची वाट लावली होती पण या संचारबंदीने चांगलीच कान उघडणी केली व शिकवण दिली. संचारबंदी लाभदायक ठरली आहे.सुधारण्याची संधी मिळाली आहे. पण संचारबंदी संपल्यानंतर काय? पुन्हा जुनीच जीवनशैली स्विकारची का? की झालेला नवा बदल स्विकारायचा? व्यसनाधीन कि व्यसनमुक्त ? निर्णय हा त्यानेच घ्यायचा आहे.
No comments:
Post a Comment