Friday, April 3, 2020

चोरांची उपासमार

                                              चोरांची उपासमार
                                             ---------------------


पहिला चोर : काये रे, या विषाणूच्या संकटाने आपली तर पूरती उपासमार सुरु झाली आहे.

दुसरा चोर :  बधं ना,या लॉकडाऊनमुळे सर्व मंडळी घरातच बसल्याने कोठेच हात मारता
                  येत नाही.सगळी घरं माणसाने भरलली आहेत.पूरा लोचा झाला आहे, भाय.

पहिला :     तसेच सगळीकडे दिवसरात्र जागता पाहारा आहे.तो चोरांसाठी नसून घरातून बाहेर
                 फिरण्यास पडणा-यांसाठी आहे.आपल्या सारख्या लपत लपत फिरणा-यांना पकडत 
                 नाहीत तर खुल्लेआम फिरणा-यांना पकडतात.हे तरी आपल्यासाठी बरं आहे. 

दुसरा :      सर्व सोसायटींचे गेट कायम बंद व गेटवर खडा पहारा असल्याने काहीच जमत नाही.

पहिला :    भुरट्या चो-या केल्यातरी चोरीचा माल घेण्यारी दुकाने बंद आहे.सगळीच अडचण
               निर्माण झाली आहे.जमलेला सगळा पैसा संपला आहे.

दुसरा  :    रस्त्यावरील नवीन गाड्या चोरल्या व बाहेर रस्त्यावर काढल्या तर पोलीस जप्त
               करीत आहेत.

पहिला :   सगळीच गोची झाली आहे.बाहेरही पडता येत नाही. दारु व गुटखा मिळत नाही.

दुसरा  :    टपरीपाठीमागे पत्ते खेळायला पैसाही उरला नाही.कोण उधार देत नाही.

पहिला :   एक मात्र बरं, तोडांवर मास्क लावला की कोणीच ओळखत नाही.सामान्य
               नागरिकांसारखा मान मिळतो.पोलीसांसह कोणीच आपल्याकडे संशयाने पाहत नाहीत.

दुसरा :     भाय, काही दिवसात आपल्यावर धाड देखील पडली नाही.पळायला न लागल्याने
               पाय दुखत आहेत.   

पहिला :   एक भीती देखील वाटते जर आपल्याला विषाणूनी पकडले तर आपल्याला
               कोण पाहिलं का? आपल्याला कोण वाचवेलं का रे?

दुसरा :     आपण चोर म्हणून प्रसिध्द असताना आपल्याबद्द्ल कोण बरं सहानुभूती दाखवेल?
               उपचार न मिळाल्याने मरुन जावे लागेल. 

पहिला :   काल एका सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यानी वडापाव व पाण्याची बाटली दिली.
               पण रोज असे मिळणार नाही म्हणून काळजी वाटते.
              
दुसरा :     भाय, आपण आपल्या संघटनेच्या प्रमुखाला भेटून आपल्या व्यथा सांगून सरकारकडून
               मदतीची मागणी करायला सांगू.

पहिला :    आम्हां चोरांना सरकार कायद्याने काही मदत करु शकणार नसले तर आम्हाला पोलीसांच्या
                बरोबरीने पाहारा देण्यासाठी मदतीला द्द्या.या विभागातील सर्व माहीती आम्हाला असल्याने
                पोलीसांना त्याचा उपयोग होईल व आम्हाला थोडेतरी खायाला मिळेल.

दुसरा  :    आम्ही रुग्णालयादेखील रुग्णांची सेवा करायला तयार आहोत. आता उपासमारीने 
                मरण्यापेक्षा  कोणाची सेवा करुन मेलो तर केलेल्या पापातून मुक्ती तरी मिळेल, भाय     

पहिला  :    अख्या आयुष्यात आपण फक्त चो-याच करीत जगलो.समाजाला लुटलं.पण सर्वांवर 
                 आलेल्या मोठ्या संकटात समाजासाठी कामे करण्याची संधी मिळाली तर आपल्यात 
                 सुधारणा होवून आपण एक सामान्य नागरीक बनू शकू.     

No comments: