Tuesday, April 7, 2020

कुठे आहे गर्दी?

                                                     कुठे आहे गर्दी?



काय ती तोबा गर्दी. कोठेही पहा उत्साहाने सळसळणारी गर्दी. कोठेही जा गर्दीच गर्दी. घड्याळाच्या कट्यावर धावणारी व कधी न थांबणारी गर्दी.रस्त्यावर,बाजारात,बागेत, नाक्यावर,मॉलमध्ये,बॅकेत,पोस्टात,दुकानात,शाळा कॉलेजात,सभेत,देवळात,दवाखान्यात,दारुच्या दुकानात,हॉटेलात गर्दीच गर्दी असते.ही गर्दीच मोठ्या शहरांची शान ठरली आहे.उत्सवात तर गर्दी ओसंडून वाहत असते. गर्दी नेहमीच प्रवाहासारखी वाटते.ही गर्दी जात धर्म, तरुण वयस्कर,गरीब श्रींमत,पुरुष महिला या सर्व पळणा-यांना सामाहून घेत असते. शहरातील माणसांना गर्दीची एवढी सवय झाली आहे की गर्दी नसेल तर चुकल्यासारखं वाटतं. गर्दीतून वाढ काढणे सोपे नसते.गर्दीत कोण हरवत नाही पण अफाट गर्दीतील चेंगराचेंगरीत चिरडू शकतो.अशी ही मुंबईतली गर्दी.  


गर्दीचं वैशिष्ट्य म्हणजे या गर्दीला रंग नाही,अनेक रंग आहेत.पण गर्दीला वेग व दिशा असते.गर्दीच्या वेगाबरोबर आपला चालण्याचा वेग सांभाळावा लागतो.गर्दी तुम्हाला ओढत असते.

घरातून बाहेर पड्लो कि बसस्थानकावर गर्दी,बसमध्ये गर्दी,तिकिट खिडकीवर गर्दी,रेल्वेस्टेशनवर गर्दी,पुलावर गर्दी, प्लॅटफॉर्मवर गर्दी,गाडीत चढताना गर्दी,गाडीत गर्दी,गाडीतून उतरताना गर्दी,स्टेशनमधून बाहेर पडताना गर्दी,पुन्हा बसमध्ये गर्दी,ऑफिसच्या लिफ्ट्मध्ये गर्दी, या गर्दीतून मार्ग काढीत ऑफिसमध्ये पोहचल्यावर हुशश होते.घरी परताना पुन्हा त्याच गर्दीतून प्रवास करावा लागतो. या गर्दीतून रोज प्रवास करीत कित्येक महिने व वर्षे जात आहेत पण तो कंटाळत नाही.ज्याचं गर्दीशी  जमलं नाही त्याला शहर सोडावं लागलं.गर्दीची सवय होणे गरजेचे असतं

गर्दीचा धसका घेतलेल्या वयस्कर मंडळींना गर्दीची कायम भिती राहते.ती मंडळी नेहमीच गर्दी टाळून प्रवास करीत असतात.  

वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन स्थानक परिसरात तसेच बस किंवा रेल्वे प्रवासात प्रवाशांकडील दागिने, रोख रक्कम चोरण्याच्या ना घडतात.आहे.गर्दीचा फायदा घेऊन महिलेची पर्स व मोबाईल ची चोरी होते. गर्दीचा फायदा घेऊन महिला आणि मुलींची छेड काढण्याचा प्रकार नवीन नाही.वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या फुकट्या प्रवाशांचे प्रमाणही वाढत आहे. 

संचारबंदीनंतर रस्ते ओस पडले.रस्त्यावर गाड्या दिसत नाहीत.नाके रिकामे झाले.बाजारात कोणी येत नाही.रेल्वे स्थानकावर शुकशुकाट,ऑफिस बंद पडलेत,शाळा व कॉलेज कोणीच फिरकत नाहीत.बगीचात कोणीच बसत नाहीत.फक्त दवाखान्यातून गर्दी दिसत आहे.कोठे गेली गर्दी?


कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू आहे. मात्र, नागरिकाकडून गांभीर्याने घेणे गरजेचे असताना एकत्र येऊन गर्दी केली जात आहे.सर्वांनी गर्दीत जाणे टाळावे त्याचप्रमाणे स्वत:ची काळजी घेत घराबाहेर न पडता करोनाच्या लढाईत नागरिकांनी सरकारला संपूर्ण साथ द्यायला हवी आहे.पण याच गर्दीने घात केला आहे.कोरोना आजाराचा वाढता प्रार्दुभाव याच गर्दीमुळे वाढला आहे. संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे  टाळावे.तरीही गर्दीही   होतेच आहे. मुंबईकराची सवय सुटणार कधी?  मुंबईला गर्दीने ग्रासलेले असल्याने ’रस्त्यावर दिसेल त्याला गोळी  घाला’ असे आदेश  दिले तरी रस्त्यावर माणसं दिसली तर आश्चर्य वाटणार नाही?


तुम्ही हरवून जाता,गर्दीत कधी स्वत:ला हरवण्यासाठी,तर कधी स्वत:ला शोधण्यासाठी   


No comments: