मंदिर
कधी वाटलं नव्हतं.देशातील सर्व मंदिर भक्तांसाठी बंद होतील.कोण कोणावर रुसले आहे.देव भक्तांवर की भक्त देवावर?देव तर भक्तांचा भुकेलेला असतो.देव भक्तांची वाट पाहत बसला नसेल ना?देव आणि भक्तांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. तरीही देवाला भक्तांपासून थोडा आराम पाहिजे होता.प्रत्येक भक्त दर्शनाला येताना इच्छा घेऊन येतो व जाताना माझ्या मनोकामना पूर्ण करण्याचा आर्जव करीत जातो. देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी एकच गर्दी होत असे.मंगळवारी व संकष्टीला सिध्दिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त तासनतास रांगेत उभे राहतात.असेच सर्व देवस्थानातून भाविकांना देवाच्या दर्शनाला मोठा प्रवास करुन मग रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावे लागते.पण हल्ली प्रत्येक भक्त आपल्या घरातून देवाचे स्मरण करीत दर्शन घेत आहेत.देव देव्हाऱ्यात आहे पण भक्ताला देवाचे दर्शन होत नाही.देवाच्या दर्शनाला भक्तगण व्याकुळ झालेला आहे.
देशातील मंदिर,चर्च,मशिद,मठ,दर्गे व गुरुव्दारासह सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली आहेत.देव एकटाच मंदिरात बसला आहे.फक्त पुजारी रोज देवाची पुजा अर्चा करीत आहेत.सोशल मिडीयावर रोज देवाच्या आरत्यांचे थेट प्रक्षेपण पाहवयास मिळते व देवाचे छान दर्शन होते.या देवांच्या आरतीला मंदिरात कधीच थांबायला मिळाले नसते.पण संपूर्ण आरती लाखो भाविकांना आपल्या घरातून पहाण्याचा आंनद लुटता येतो.मन प्रसन्न होते.
इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील मंदिर बंद आहेत.दोन हजार वर्षांच्या मंदिराच्या इतिहासात कदाचित प्रथमच तिरुपती बालाजी मंदिरावर अशी वेळ आली आहे की, ब-याच दिवसांपासून भाविकांना प्रवेश निषेध केला आहे. यापूर्वी १९४१ मध्ये ब्रिटिशांनी ‘रामनवमी’ उत्सवात भाविकांसाठी शिर्डीचे साईमंदिर बंद ठेवलं होतं. कॉलरा आजाराची साथ पसरल्यामुळे त्यावेळी मंदिर पाच दिवस भक्तांसाठी बंद करण्यात आलं होतं. ७९ वर्षांपूर्वीच्या निर्णयाची पुनरावृत्ती झाली आहे.शनि शिंगणापूर येथील शनि महाराजांच्या मूर्तीचा चारशे वर्षांचा इतिहास सांगितला जातो. चारशे वर्षात कधीही मंदिर भक्तांसाठी बंद ठेवले गेलेले नाही असे येथील जाणकार सांगतात.तीनशे वर्षात पहिल्यांदाच नाशिकचे काळाराम मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात सुट्टयांमुळे सर्वच मंदिरात गर्दी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्व पर्यटनस्थळांसह तीर्थक्षेत्रे देखील ओस पडली आहेत.
शिर्डी साई बाबा संस्थानला दररोज जवळपास दीड कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान होत आहे.मंदिरांना मिळणा-या देणग्या बंद झाल्याने मंदिराचा अर्थसंकल्प बिधडणार आहे.मंदिर सुरु झाली तरीही तर भक्तगण दर्शनाला येण्यास बराच अवधी लागणार आहे.याचा परिणाम मंदिराच्या खर्चावर होणार आहे.
घर हे देखील एक मंदिरच आहे, हेसुद्धा आपण विसरतो. देव सर्वत्र भरलेला आहे असे म्हणायचे आणि पदोपदी त्याचा अपमान करायचा अशी आपली वृत्ती बनली आहे आणि ती अत्यंत दुदैर्वी आहे. देवस्थानी, देवाच्या नावाने बकालपणा होत असेल, घाण आणि कचरा होत असेल, तर इतर ठिकाणी आपण काय आणि कसा गोंधळ घालतो हे तर सतत दिसतेच आहे.देवा या भक्तांना सद्बुद्धी दे!
मंदिर बंद आहेत.पण दवाखाने व रुग्णालये ही देवस्थाने झाली आहेत. तेथील अहोरात्र उपाचार करणारी मंडळी लोकांसाठी देव झाली आहेत.
No comments:
Post a Comment