Sunday, May 17, 2020

लागलेल्या सवयीचं काय?

                                              लागलेल्या सवयीचं काय?


पन्नास दिवसाच्या कालावधीत आपल्यात बरेच मोठे बदल घडले आहेत.घरात बंदीस्त झाल्याने काही सवयी दूर झाल्या तर काही सवयी नव्याने लागल्या आहेत.एखादी गोष्ट आपण सारखी करत राहिलो की आपल्याला त्या गोष्टीची सवय होत जाते.कोणताच कामधंदा नसल्याने व धावपळीचे जीवन थांबल्याने काही नवीन सवयी लागल्या आहेत.तर मागील काळातील बदललेल्या दिनक्रमाने काही सवयी दूर झाल्या आहेत.काही सवयी आपण लावून घेतो तर काही सवयी आपल्याला आपोपाप चिकटल्या जातात.आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर आपल्या शरीराला आणि मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. चांगल्या सवयी अंगी बाणवा आणि बघा तुमचे आयुष्य बदलेले असेल, असे म्हणतात.चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्या.प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सवयीप्रमाणे काहीं वाईट सवयी असू शकतात.पण त्या दुस-यांनी सांगितल्या शिवाय आपल्या लक्षात येत नाहीत.सगळ्यांना कसली ना कसलीतरी सवय हि असतेच.सवय हि चांगलीही असू शकते.तशी वाईटही असू शकते.

चांगल्या सवयी :
घरातून कामे करु लागलो.शरीराला योगासने व व्यायामाची शिस्त लावली.ध्यान व चितंन करु लागलो.सात्विक व शाकाहारी अन्न खाण्य़ास शिकलो.खाण्याच्या वेळांच्या बाबतीत वक्तशीर झालो.मुलांना जास्त वेळ देऊ लागलो आणि विविध प्रकारचे खेळ खेळू लागलो. याने आमची बॉंडिंग खूप जास्त वाढली.गृहीणीना मदत करु लागलो.ज्येष्ठांची काळजी घेऊ लागलो.कुटुंबाला वेळ देवू लागलो.खर्च कमी करण्यास शिकलो.घरातल्या वस्तू आणू लागलो,नातेवाईकांनाशी संपर्क करु लागलो.वृतपत्र नसले तरीही बातम्यांचा आढावा घेऊ लागलो.व्यसने कमी झाली.घरातच ऐकट्याने व्यसन करु लागलो.घरातच चित्रपट व नाटक पाहू लागलो.संगीत,वाचण व लेखन सारखे वेगवेगळे छंद जोपासू लागलो.स्वभावात बरेच बदल झाले आहेत. शांतपणे रागावर नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे.साफ स्वच्छ राहण्याची जास्त प्रमाणात सवय लागली आहे.सोशल डिस्टन्सिंगची सवय लागली.पैसा नाही वेळ आणि नाती जपायला शिकलो.अशाच आणखी काही.

वाईट सवयी :
रात्री उशिरा झोपणे व उशिरा उठणे,अंगात आळस भराला आहे.डाएट वाढलंय. व्यसने वाढली आहेत.व्यायाम बंद केला.शाकाहारी अन्न खावून कंटाळा आला.महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.कौटुंबिक हिंसाचार वाढत आहे. एकटेपण व कैदी असल्याची भावना निर्माण झाली आहे.मोबाईल व  टीव्हीला नरजेआड करु शकत नाही.मंदिरात जाणे बंद झाले.रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.या सवयी वरकरणी अपायकारक वाटत नसल्या,तरी प्रत्यक्षात मात्र या सवयींचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात.वजन वाढले आहे.पासवर्ड विसरणे.अशाच आणखी काही. 

सवयीमुळे पडलेले प्रश्न :
धावत्या जीवनाला अचानक लागलेल्या ब्रेकमुळे व विषाणूच्या दहशतीमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. यात चिंता, भीती, एकटेपणा आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.पन्नास दिवसानंतर लागलेल्या सवयींचे काय होणार?ऑफिसला व शाळेला जाण्याची मानसिकता येईल का? रांगेने गाडीत चढता येईल का? प्रवासाचा त्रास झेपेल का?ऑफिसचे काम  पहिल्यासारखे जमेल का? ससंर्गाची भीतीने पहिल्यासारखे जीवन जगता येणार नाही.अशा परिस्थितीत नव्याने आपली दिनचर्या आखता येईल का?लागलेल्या सवयींमध्ये बदल करणे कठीण जाणार आहे.दिनचर्येत बदल झाल्याने समस्या उद्भवल्या आहेत.संसर्गाचा धोका, नोकरी आणि व्यवसायातील अनिश्चितता व आलेला एकटेपणा.  

शक्यतो सतत सकारात्मक निर्णयावर येण्याचा विचार करा.वाईट व त्रासदायक सवयी बदलण्याचा निर्धार करावा.धूम्रपानाची सवय जितकी वाईट तितकीच ती सोडण्यास कठीण आहे. धूम्रपानाचा परिणाम फक्त आपल्या शरीरावरच होत नाही तर मनावर आणि आपल्यासोबत राहणाऱ्या लोकांवरही होतो.धूम्रपान सोडण्याचा संकल्प करावा.मोबाइलचे व्यसन लावून घेऊ नका.निरोगी राहण्यासाठी  चांगले डाएट सुरू करावेत.जंक फूडपासून दूर रहा.सवयीचे गुलाम होऊ नका.जो मनाला जिंकतो तो सर्व काही जिंकू शकतो असे म्हणतात. म्हणूनच आपल्या सवयी आपल्या मानवर ताबा मिळवून द्यायला मदत करतील आणि आपले आयुष्य बदलतील.मानसिक
द्दष्ट्या कणखर बना.

चांगल्या सवयी लावणं कठीण असतं, असं म्हणतात. पण खरंतर हे सगळे केवळ मनाचे खेळ आहेत. एकदा आपण आपलं मन तयार केलं की सगळे प्रश्न दूर होतात. नकारात्मकता लवकर अंगी जडते पण सकारात्मकता जडायला थोडा वेळ जावा लागतो.


No comments: