Showing posts with label तुमच्यासाठी.. Show all posts
Showing posts with label तुमच्यासाठी.. Show all posts

Sunday, June 5, 2016

कौमार्य परीक्षा कुणासाठी? कशासाठी?

नाशिकमधल्या एका गंभीर घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. कंजारभाट जातपंचायतीने नुकतंच लग्न झालेल्या तरुणीची कौमार्याची परीक्षा घेतल्याची धक्कादायक घटना घडलीये. शिर्डीमधल्या एका मुलीचा नाशिकमधल्या मुलाशी विवाह झाला. मात्र, लग्नानंतर लगेचच नवरीच्या कौमार्याची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये ही मुलगी नापास झाल्याचा दावा जातपंचायतीनं केला.त्यानंतर नवरीला लग्नघरीच सोडून वर्‍हाडी निघून गेले. नवर्‍या मुलानेही जातपंचायतीच्या सांगण्यावरून लग्नही मोडलं. विशेष म्हणजे या मुलीनं पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती ट्रेनिंगही घेत होती. मुलीनं स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला. पण कोणीही तिचं ऐकलं नाही.कौमार्य परीक्षा प्रकरणी संबंधित नवर्‍यामुलाने पीडित मुलीची माफी मागितल्यानंतर वधू-वराने पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कौमार्य परीक्षेवरून मोडलेला संसार आता पुन्हा सावरला आहे.

कौमार्य परीक्षेत विवाहित महिला उत्तीर्ण न झाल्याने तिला दोषी ठरवत पतीने तिला लग्नानंतर दोनच दिवसांत माहेरी पाठवून नांदवण्यास नकार दिला. ही घटना घडली आहे, नासिक जिल्ह्यातील संगमनेर येथे. भारत विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करत आहे. जगाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठीचे जे काही प्रयत्न करता येईल ते भारताकडून करण्यात येत आहे. अशावेळी अजूनही मंदिरात महिलांना प्रवेशासाठी संघर्ष करावा लागत आहे. पंचायतींकडून सहजच विवाह मोडले जातात. त्याला कारण तसे क्षुल्लकच असते. संगमनेर येथील घटनेतील कारणही याच प्रकारात मोडणारे आहे. पण एका छोटय़ाशा कारणामुळे एका मुलीला पुन्हा माहेरी पाठवण्यात आले. तिचा दोष हाच होता की ती लग्नानंतरच्या कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण झाली नाही.

लग्न हा भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. विशिष्ट वय झाल्यानंतर उपवरांचे लग्न लावून देण्यात येते. मुलगी सुस्वरूप हवी, ती कामसू असावी, अशी अनेक मुलांची अपेक्षा असते. त्यातच ती ‘व्हर्जिन’ असावी ही मुख्य अट असते. त्यातूनच मग अशा घटना घडत असतात. मुळात वयात आल्यानंतर कौमार्य परीक्षा वगैरे फॅडचा उदय होत असतो. स्त्रीमधील स्त्री सुलभ अवयव विकसीत झाल्यानंतर ती विवाहयोग्य होते, असे आपल्याकडे मानले जाते. त्यानंतर यथाशक्ती तिचा विवाह योग्य वर पाहून लावून दिला जातो. अनेकदा स्पर्धेच्या युगात स्त्रीयाही पुरूषांसारखेच अंगमेहनतीचे, कसरतीचे कामे करतात. यात त्यांच्यात काही बदल झाल्यास त्यामुळे ती चारित्र्यहीन कशी ठरू शकते? हाच नियम पुरुषांना का लावला जात नाही, याचे कोडे अद्यापही सुटलेले नाही. रूपवान, चारित्र्यसंपन्न स्त्री आपली पत्नी म्हणून पाहिजे, असे म्हणणारे अनेक पुरूष विवाहापूर्वी व्हर्जिन असतात का? हा खरेतर संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण त्याकडे दुर्लक्ष करीत विशिष्ट भागांभोवतीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांमध्ये आपली मानसिकता अडकली जाते. ही मानसिकता आता बदलायला पाहिजे.

योनीसुचिता या मानसिकतेभोवती समाजमन अजूनही रूंजी घालत असल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असतात. ग्रीक लोककथांमध्ये तरुणीचे कौमार्य भंग पावू नये म्हणून त्या विशिष्ट भागाभोवती संरक्षण जाळी लावली जायची. ही प्रथा तर रानटी स्वरूपाचीच होती. काही समाजात या विशिष्ट अवयवांवर ब्लेड फिरवण्याची अधोरी प्रथा सुरू होती. मध्यंतरी काही महिलांनी त्याविरोधात आवाजही उठवलेला होता. अशा पध्दतीने या रानटी प्रथा, परंपराविरोधात लढण्याची गरज आहे.

जातपंचायत हा प्रत्येक धर्मातील तमोध्याय आहे. या जात पंचायतींच्या साक्षीने हा कौमार्य परीक्षेचा घाट घालण्यात आला होता. एकेकाळी भारतात घटना अस्तित्वात नव्हती तेव्हा समाजात अनाचार माजू नये, यासाठी जात पंचायतीचे नियोजन करण्यात आले होते. पण काळानुरूप या जात पंचायती स्वत:ला श्रेष्ठ मानू लागल्या. त्यांच्याकडून येणारे निर्णयच ग्राह्य धरावे लागतील, अशी मानसिकता बळावू लागली. त्यातूनच मग दुस-या जातीत लग्न करणा-या मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकणे असो, कौमार्य परीक्षा असे प्रकार वाढीस लागलेले आहेत. कुठेतरी हे प्रकार थांबणे गरजेचे आहे. जात पंचायती विरोधातील कायदा राज्य सरकारने केला. पण त्यावर अद्याप राष्ट्रपतींची सही झालेली नाही. ही सही झाल्यानंतर या कायद्याला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.

काळ ज्या पध्दतीने बदलतो त्याप्रमाणे त्या त्या काळातील रूढी-परंपरा कालबाह्य होत जातात. पण त्याच रुढी,परंपरा यांना कुरवाळत राहिलो तर हाती काहीच येणार नाही. येईल तो मनस्ताप, दु:ख. कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण न झालेली ही महिला शिक्षित आहे. तिने नव-या मुलाचे अगोदर लग्न झालेले असतानाही त्याला स्वीकारले. हा तिचा त्याग बाजूला ठेवत थेट कौमार्य परीक्षेत अनुतीर्ण झाल्यानंतर घरची वाट धरावी लागत असेल तर त्यासारखे दुर्दैव्य ते कोणते? महिला अंतराळाची प्रदक्षिणा करीत आहेत. पुरूषांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या कामे करीत आहेत. गुणवत्ता किंवा कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. अशावेळी योनीसुचितेच्या नावाखाली त्यांना कमी लेखणे हा प्रकारच विकृत मानसिकतेचा आहे. तो थांबलाच पाहिजे. इंदिरा संत यांच्या एका कवितेत ‘शिजणारीही तिच अन् शिजवणारीही तिच’ असं स्त्रीचं वर्णन करण्यात आले आहे. खरोखरच शिजत, शिजवणा-या या ‘बाईमाणसाची’ जाचक अटींतून केव्हा मुक्तता होणार?

Friday, July 17, 2015

पंढरीची वारी.

पायी चालतोया पंढरीची वारी.
मुखी बोलतोया पांडूरंग हरी पांडूरंग हरी हरी.


    संत सज्जन सगळे, नाचती गाती
     मेळा भरवीती सारखे चालती
      कुणी छेडूनी विणा, टाळ हाती धरी
       पायी चालतोया पंढरीची वारी ||१|| 

            तुळशीचे घेतले रोप डोई माऊलीने
             अनवाणी पायात केले घर काट्याने
               व्यर्थ नाही चिंता मन नाही संसारी
                 पायी चालतोया पंढरीची वारी ||२||

                     टाळ मृदूंगाचा मेळ साधूनीया
                        पावलांचा त्याला ठेका मिळोनीया
                          विसरले जगा सारे नरनारी
                           पायी चालतोया पंढरीची वारी ||३||




















































































































































































                      माउली माउली     माउली माउली     माउली माउली

Thursday, December 13, 2012

रंगीत पत्रिका


  विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी लग्नाची पत्रिका छापून दिले जाते.लग्नसमारंभाची माहीती या पत्रिकेला असल्याने तिला महत्व असते.लग्नसराई सुरु झाल्यापासून या पत्रिका घरी येऊ लागल्या आहेत.  

    पण हल्ली नागपूरात राज्याचे अधिवेशन सुरु आहे.मोर्चे व पत्रिकांचे युध्द सुरु आहे.सिंचन घोटाळा हा चर्चेचा     मुख्य विषय असल्याने काँग्रेसने 'श्वेतपत्रिका' काढून आपली बाजु मांडली.श्वेत पत्रिकेचा पंचनामा करीत व  सिंचन घोटाळ्यावरून चहुबाजूंनी सरकारला घेरताना भाजपने श्वेत पत्रिकेच्या विरोधात 'काळी पत्रिका' जाहीर केली . सिंचन घोटाळयावर विरोधकांनी काढलेल्या काळ्या पत्रिकेला उत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने 'सत्य पत्रिका'काढली आहे.शेवटी सिंचन घोटाळ्यावरून भाजपच्या काळ्या पत्रिकेनंतर सरकारच्या श्वेत पत्रिकेची विदर्भावर काय दुष्परिणाम होतील,अशी वस्तुस्थिती मांडणारी 'पिवळी पत्रिका' विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य माजी मंत्री अॅड.मधुकरराव किंमतकर यांनी जारी केली आहे. आजूनही काही रंगाच्या पत्रिका प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

   काय म्हणतात या रंगीत पत्रिका? पत्रिका काढण्याची फँशन येऊन त्याची  स्पर्धा लागली आहे.कोणत्या रंगाची पत्रिका सत्य गोष्टी दाखवते?पत्रिकेचे रंग मात्र पक्के व जुळ्वून आणलेले आहेत.सगळ्या पत्रिका आपली बाजू सत्य दाखवायचे आणि दुस-याचे मते खोडण्य़ाचा प्रयत्न दिसत आहे.सर्व पक्षानी आपापल्यापरीने सिंचन घोटाळ्याचे स्वरुप समोर आणले आहे.या विषयावर चर्चा न करता आपली मते त्यानी या पत्रिकेतून मांडली जात आहेत.पत्रिका छापून ही राजकिय मडंळी हा घोटाळा दाबून टाकतील असा अंदाज आहे.सामान्य जनतेला या पत्रिकेने काय मिळणार आहे?

     जनतेला या रंगीत पत्रिकेचे काही सोयरेसुतक नाही.या पत्रिकेचे महत्व फक्त राजकारण्यांसाठी.या पत्रिका जनतेपर्यत पोहचतच नाहीत.पत्रिकेत नोंदी खोट्या व चुकीच्या असतील याची कल्पना सर्वाना असल्याने त्या वाचतोय कोण? प्रलंबित प्रकल्प कितीतरी आहेत.ते कधी पुर्ण करणार आहेत? राज्यातील भीषण पाणीटंचाईला कसे तोंड देणार याची प्रथम चर्चा होण्याची गरज आहे.यंदा पाण्य़ाच्या समश्येवर राज्यभर उग्र रुप धारण केले आहे.बंधा-यांसारख्या लोकोपयोगी कामांकडे लक्ष द्यायाला प्रशासनाला वेळ नाही.बंधारे बांधताना घोटाळे आता टँकरवर कोट्यावधी रुपये खर्च करीत राज्याला कर्जात लोटण्याचे काम सुरु आहे.या गोष्टीना रंगीत पत्रिकेत जागा नसेल. 

    घोटाळे करीत राजकारण्यानी राज्याची परीस्थिती हालाकीची केली आहे.ती कशी सुधारायची यावर चर्चा न करता पत्रिका काढ्णे सुरु आहे. 




या पत्रिकेचे पुढे काय होते? याबद्द्ल 'महाराष्ट्र टाईम्स' मघ्ये प्रसिध्द झालेला लेख

नामदेवची भेळेची गाडी होती . ओली भेळ , सुकी भेळ . त्याच्या हाताला चव होती . गर्दीच्या वेळी तर त्याचा हातएखाद्या कलावंताने एकाच वेळी चार - सहा वाद्ये वाजवावीत तसा चालत असे . जणू तो स्वतःच रविशंकर आणितो स्वतःच झाकीर हुसेनही . कागदाचा चौकोर तुकडा डाव्या तळहातावर तोलत उजव्या हाताने त्या कागदावर तोभराभरा चुरमुरे , शेव , डाळ , कांदा , कोथिंबिर , चिंच - गुळाची चटणी , पुदिना - मिरचीचे वाटण घेत असे ,त्यात चमचा खूपसून ते कालवले की भेळ तयार . खाणारा फिदा . एक दिवस नामदेव असाच गर्दीच्या वेळीहातावर भेळीचा कागद तोलत असतानाच त्याच्या गाडीच्या पुढ्यात एक शानदार कार थांबली . पाठोपाठ आणखीचार - सहा गाड्या . पहिल्या गाडीतून अजितदादा उतरले . पाठोपाठ इतर गाड्यांमधले श्रीमंत भालदार -चोपदारही उतरले . तडकाफडकी राजीनामा फेकून बाहेर पडलेल्या दादांना रस्त्यातच भूक लागली . नेमकी तेव्हाचसमोर नामदेवची गाडी दिसली म्हणून दादांनी गाडी थांबवली होती . दादांना पाहून इतर सामान्य ग्राहकांनी मगकाढता पाय घेतला आणि नामदेव दादांच्या ऑर्डरमध्ये गुंतला . ' तिखट बनव मस्तपैकी , आपल्याला काहीचअळणी चालत नाही ', म्हणत दादांनी नामदेवने फडकं मारून स्वच्छ केलेल्या बाकड्यावर बैठक जमवली .नामदेवचा सराईत हात चालू लागला . तयार झालेल्या भेळेच्या कागदाच्या खाली नामदेवनं खास पाहुण्यांसाठीराखून ठेवलेली प्लास्टिकची प्लेट धरली . ती परत देत दादा म्हणाले , ' भेळ खाण्याची मजा कागदावरच , ही प्लेटठेवून दे आत .' दर्दी खाणारा भेटला म्हणून नामदेवही खूश झाला . सगळ्यांनीच भुकेल्यापोटी भेळ हाणली . हातपुसायला दादांनी नामदेवच्या गाडीवरला एक कागद घेतला . जाता जाता दादांनी विचारलं , ' नाव काय रे तुझं ?'खूश होत नामदेव म्हणाला , ' जी , नामदेव .' दादांनी एक पॉझ घेतला आणि म्हणाले , ' तुला एक खास बक्षीसदेणार आहे मी . तू एक काम कर , आठवड्यातून एकदा बंगल्यावर चक्कर टाकत जा , तुझं बक्षीस तयार झालं कीदेतो तुला .' 

आठवडा गेला . नामदेवनं विचार केला , आपण क्षुल्लक भेळवाले . दादा अनेकांचे पोशिंदे . ते सवयीने बोलून गेलेअसतील बक्षीस देतो म्हणून . ते राजे असते आणि त्यांच्या गळ्यात कंठा वगैरे असता तर गोष्ट वेगळी . पणनामदेवच्या बायकोनं हट्ट धरला . दादा एवढे सांगून गेले , तर जा की बंगल्यावर . काय बिघडतंय तुमचं ? 

नामदेव दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून दादांच्या बंगल्यावर गेला . आत जायची त्याची काही हिंमत होईना . कोणीविचारलं , काय काम आहे तर काय सांगणार ? म्हणून तो तसाच फाटकाबाहेर उभा होता . तेवढ्यात दादांची गाडीबाहेर पडली . दादांचं नामदेवकडे लक्ष गेलं . त्यांनी गाडी थांबवली . खिडकीची काच खाली केली आणि म्हणाले , 'पुढच्या आठवड्यात ये .' 

नामदेव निराश झाला . दादांसारखा माणूस आपल्याला बोलावतो , ओळखतो याचं त्याला अप्रूप वाटलं ; परंतुत्यांना काय बक्षीस द्यायचं असेल ते त्यांनी देऊन टाकावं आणि मोकळं करावं , असं त्याला वाटत होतं . आता परतबंगल्यावर येण्याच्या भानगडीत पडू नये , असं त्याला वाटलं . परंतु त्याची बायको त्याला प्रत्येकवेळी उमेद देतराहिली आणि तो दर आठवड्याला जात राहिला . त्यानं जायचं , बंगल्याच्या फाटकाबाहेर उभं राहायचं , दादांनीबाहेर पडता पडता गाडी थांबवायची , काच खाली करायची , त्याला ' पुढच्या आठवड्यात ये ,' म्हणून सांगायचं हेदर आठवड्याला घडू लागलं . 

नामदेव त्याचा भेळेचा धंदा नेहमीच्याच उत्साहाने करत होता . दरम्यान , अजितदादांनी फेकलेला राजीनामामुख्यमंत्र्यांनी हवेतल्या हवेतच झेलला . आणि असेच ७२ दिवस गेले ... दादांनी आपला राजीनामा विस्मरणाच्यातिजोरीत टाकून देऊन पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या . रात्री नामदेवबायकोला म्हणाला , ' आता दादा पुन्हा बिझी होणार . आता कसले बक्षीस अन् कसले काय . मी उगाच आपलाजात राहिलो बंगल्यावर .' बायको म्हणाली , ' आता एवढे दिवस माझं ऐकलं ; आता आणखी एकदा ऐका . यावेळीही त्यांनी नुसतीच काच खाली करून परत पाठवलं तर मग पुन्हा कधी बंगल्यावर नका जाऊ .' 

आता हे शेवटचंच , असं म्हणत नामदेव दादांच्या बंगल्यावर गेला . यावेळी मात्र दादा त्याची वाटच पाहत होते .नामदेवला बंगल्यात बोलावलं गेलं . त्याचा नीट आदर - सत्कार केला गेला . अजितदादांच्या बायकोनं नामदेवच्याबायकोसाठी साडी - चोळी दिली . अखेर दादांनी आपल्या बंगल्याच्या आवारात एक टेम्पो उभा होता , त्याकडे बोटदाखवलं व म्हणाले , ' तुला भेळेसाठी कागद लागतात ना , मी हा टेम्पो भरून कागद देतो आहे तुला .' 

आणि नामदेवचं घर सिंचनाच्या श्वेतपत्रिकेच्या गठ्ठ्यांनी भरून गेलं . आता त्याला किती तरी दिवस भेळेच्याकागदासाठी रद्दीच्या दुकानात जायची गरज नव्हती . कागदाचे ते गठ्ठे बघून नामदेव निराश झाला ; परंतु त्याचीबायको हुशार होती . ती म्हणाली , ' असे निराश होऊ नका , सिंचनाचा फायदा सर्वांना . उद्यापासून भेळेचा दरदुप्पट करा . श्वेतपत्रिकेच्या कागदांवर भेळ खाण्याची संधी . त्वरा करा चुकवू नका . कागदांचा साठा मर्यादित .अशी जाहिरात करा .' 
नामदेवनेही मग सिंचनाचा फायदा घेतला आणि त्याच्या गाडीवर झुंबड उडाली . एक दिवस त्याच रस्त्यानेपृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा जात होता . त्यांनाही भूक लागली म्हणून ते थांबले . त्यांनी आणि त्यांच्या सोबतअसलेल्यांनी भेळ घेतली . भेळ खाता खाता चव्हाण अचानक थांबले . त्यांनी आपल्या हातातील कागदावरीलछापील मजकूर वाचला . मग आपल्या सोबतच्या सर्व लोकांजवळ जाऊन त्यांनी त्यांच्या कागदांचे निरीक्षण केलेआणि म्हणाले , ' भेळ खाऊन झाल्यावर कागद फेकू नका , माझ्याकडे द्या . ही श्वेतपत्रिका माझी वाचायची राहूनचगेली होती . त्यात काय आहे बघू तरी ...'