Showing posts with label महाराष्ट्र टाइम्स्. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र टाइम्स्. Show all posts

Monday, July 1, 2024

सुखद क्षणांसाठी ’गझिबो’

                                             

                                                                                      


                                                    



                                                  सुखद क्षणांसाठी ’गझिबो’

      

कोकणात सुंदर कौलारु घर बांधलं. छोटीशी बाग फुलवली.सारखं काहीतरी कमी वाटत होतं. मुंबईत बंगल्याच्या बाजूला एक गझिबो असतो तसा आपल्या घराच्या बाजुला एकही भिंत नसलेला गझिबो बांधला.घराची शोभा आणखी वाढली.झाडांच्या सावलीत व मोकळ्या हवेच्या ठिकाणी असलेल्या हा गझिबो सगळ्यांना तेथे रमायला खुनवत असतो.


घराएवढाच वेळ माझा गझिबोत जातो.गझिबोत सकाळच्या प्रसन्न वेळी पक्षांचे मधूर संगीत ऐकतो तर दुपारी दाट सावलीत पुस्तक वाचताना खुर्चीत कधी झोप लागते तेच कळत नाही. संध्याकाळी गप्पा मारायला गावक-यांना आमचा गझिबो खूपच आवडीचा वाटतो. 


गझिबोच्या बाजूला सुंदर फुलांची झाडे लावली आहेत. व वेली गझिबोवर सोडल्या आहेत.या फुलांवर फुलपाखरं बागडताना पाहण्याचा आंनद अवर्णनीय आहे.गझिबोच्या समोर भागात गवताचे लॉन लावणार आहे.पावसात पाण्याचे तुषार अंगावर झेलत बसून पावसात भिजत राहतो. रात्री काजव्याच्यासह आकाशातले तारेतारका पाहत जागत राहतो.दिवाळीत दिव्यांनी गझिबो सजवतो.एकूणच मनात भरभरून चैतन्य निर्माण करणारे क्षण. 


गझिबोत मी संगीत ऐकतो,शांतपणे लिखाण करतो,वाचन करतो,गप्पा मारतो, निसर्गातली फोटोग्राफी करतो व बाजूच्या झाडांची निगराणी करताना किती वेळ जातो तेच कळत नाही.

’गझिबो’, माझ्या घरातले माझ्या आवडीचे ठिकाण झाले आहे.


जिथे कोवळ्या स्वप्नांना नवं क्षितिज दिसावं,कितीही खचलो कधी तरी नवीन उमेद मिळावी,मित्रमैत्रिणींच्या गप्पांची गाठोडी बांधली जावीत,कडवट आठवणी विसरून नवीन वाट दिसावी,बाहेरच्या कोलाहलापासून दूर माझा गझिबो ही माझी एक हक्काची जागा झाली आहे.



घरातला असा एकतरी कोपरा असतो की जो नुसता घराचा कोपरा नाही तर आपल्या मनाचा कोपरा असतो.. 

Sunday, May 15, 2011

दहशतवादाने अमेरिकेची नाचक्कीच केली.

अमेरिकेने जगात आपले वर्चश्व कायम अबाधित राखण्याच्या लोभपायी केलेल्या चढाओढीच्या राजकारणात शेवटी जागत एका इस्लामिक दहशतवादाचा जन्म झाला. त्यांच्या इस्लामिक  साम्राज्य स्थापनेच्या महत्वकांक्षेचा पहिला प्रसाद अमेरिकेला मिळाला.या दहशतवादाच्या प्रहाराने जगात अमेरिकेची नाचक्कीच झाली.जागतिक दहशतवाद हा जगासाठी घातक असल्याची जाणिव झाल्यावर त्याचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तान व इराक बेचिराख केले.गेली दहा वर्षे प्रयत्न करुनही लादेन सापडत नसल्याने जागत अमेरिकेची आणखी नाचक्की होत होती.महासत्ता  असलेल्या राष्ट्राला हि नाचक्की  सारखी सलत होती.लादेन पाकिस्तानात असलेल्याचा पत्ता लागताच कोणालाच माहीती  न  देता त्याचा खात्मा करीत जगाला दहशतवाद संपविल्याचा दावा करीत व विजयी पताका   फडकवीत  आतापर्यत झालेल्या नाचक्कीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला आहे.  त्यांच्याच  देशातील वंशव्देषी अमेरिकन लोकांचा लादेनच्या हत्तेच्या कारवाईवर विश्वास नाही .हि असली  आपल्यांकडुन   होत असलेली    मोठी     नाचक्की     अमेरिकेला   सहन    करावी लागत     आहे.दहशतवादाच्या राजकारणावर  अफाट पैसा खर्च करणा-या अमेरिकेला काय मिळाले? फक्त नाचक्की?



ही प्रतिक्रिया आजच्या महाराष्ट्र टाइम्स या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

Thursday, February 24, 2011

बेघर गिरणीकामगाराना मोफत घरे द्यावीत.

   मुबंईतल्या गिरण्यांच्या ऐतिहासिक संपात सामिल झाल्याने अडीच लाख गिरणी कामगारांच्या आयुष्याची वाताहात झाली.गिरण्यांच्या जागेवर १९८२ सालाऐवजी २००० साली हजेरी पटावर  असलेल्या गिरणी कामगारांना घरे देण्याची  घोषणा राज्य सरकारने केल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे.फार पूर्वीच नोक-या गमावलेल्या व घराच्या आशेवर  असलेल्या कामगाराना या निर्णयाने मोठे नुकसान होईल.सर्वसंमतीने घेण्यात आलेल्या निर्णयानतंर हा हजेरीपटाचा  निकष मघ्येच का बदलला जात आहे.मतांसाठी २००५ सालापर्यतच्या परप्रांतीयांच्या झोपडपाट्यांना सरकार मोफत  घरे देत असताना या कामगारांच्या घरांचा प्रश्न निर्णयकरीत्या सोडविण्यात का चालढकल होत आहे?सरकार ह्या गिरण्यांच्या जागा विकासकांना देण्यास तयार असल्याने बेघर गिरणी कामगारांवर अन्याय होणार आहे. कामगारांच्या  हक्काच्या जागेवर म्हाडाने घरे बांधुन कमीत कमी किमंतीत सर्व गिरणी कामगाराना दिल्यास मराठी माणूस मुबंईत  अस्तिवात राहील.गिरणी मालकाना सवलतीत जमीन देणारे सरकार या गरीब गिरणी कामगारांकडुन बांधकाम खर्च  व्याजासह वसूल कसे करु शकते? शेतक-याना नुकसान व कर्जबाजारी झाल्यावर सरकार नुकसानभरपाई देते मग  या बेधर गिरणी कामगाराना मोफत घरे का दिली जात नाहीत?

ही माझी प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्स (२२/०२/२०११) मघ्ये प्रसिध्द झाली आहे.


Thursday, January 27, 2011

गुजरात आधाडीवर

  गुजरात राज्याने १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आश्वासने मिळवित उद्योजकांना आपल्या राज्याकडे वळविण्यात यशस्वी झालेल्याचे वाचण्यात आले.उर्जा,बंदरे,पेट्रोलियम पदार्थ व पायाभूत सोयी आदीचे उद्योगधंदे महाराष्ट्रातून गुजरातमघ्ये गेल्याने गुजरात राज्य महाराष्ट्रापेक्षा कीतीतरी पटीने पुढे गेले आहे.आधाडीच्या उद्योजकाना महाराष्ट्रात होणा-या त्रासामुळे नवीन उद्योग महाराष्ट्रात न आणता व पूर्वीचे जुने उद्योगधंदे इतर राज्यात हलविण्याने उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राच्या झालेल्या पिछेहाटीला आपले सत्ताधारीच जबाबदार आहेत.अपूरे वीज,अपूरे पाणी,असंख्य कर्, भ्रष्टाचार,असंख्य परवाने,महागडी जागा,प्रदुषणाबद्दलच्या अटी,कामगारांचे प्रश्न व पायाभुत सोय़ी सारख्या  अडचणी असल्याने उद्योजक त्रासलेले आहेत.
काही वर्षापासून महाराष्टातले राजकारणी सत्तेभोवती फिरत असल्याने,त्यानी राज्याच्या उन्नतीसाठी लागणारी
दुरदृष्टी  हरवल्याने व स्वत:च्या  उत्कर्षासाठी भ्रष्टाचारात गुंतवल्याने  गुजरातला याचा  फायदा झाला आहे .हाच
मोका साधून गुजरात सरकारने उद्योजकाना विश्वासात घेउन त्याना चांगल्या सोयी पुरवण्याची व सवलती देण्याचे सहकार्य करण्याची आश्वासने देत मोठमोठे उद्योगधंदे आपल्या राज्यात ओढुन नेण्यात यशस्वी झाले आहेत."पैसे खात नाही व पैसे खाउ देत नाही" अशा आदर्श प्रतिमेचा मुख्यमंत्री असल्याने नोकरशहांवर जरब टाकल्याने उद्योजकांची कामे गैरव्यवहाराशिवाय होत आहेत.आजच्या खालावलेल्या परीस्थितीतून राज्याला वर आणण्यास सर्व पक्षांच्या राजकारण्यांनी स्वत:मघ्ये मोठाबदल करुन व राजकारण बाजुला ठेवून कामाला लागले तरच पुन्हा पुरोगामी महाराष्ट्रात मोठे उद्योजक आकर्षित होतील.
'बिजली,पानी आणि सडक' यांच्याप्रमाणेच गुजरातची प्रशासकीय यंत्रणाही फटाफट हलते. सर्व कार्यालये संगणकांनी जोडलेली असून लोक  त्यांच्या तक्रारी ऑनलाईन  करतात. राज्यातील बंदर  प्रकल्पांमध्ये खाजगी
गुंतवणुकीला मान्यता देणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य आहे.
अत्यंत रोखठोक,पारदर्शक,तत्पर आणि 'पब्लिक सेंट्रिक'कारभारामुळे आज गुजरात देशातील नंबर एक राज्य आहे.एकाच राज्यात जर इतक्या सोयी-सुविधा मिळत असतील.'प्रकल्प हटाव'च्या घोषणा दिल्या जात नसतील,तर मग उद्योजक, गुंतवणूकदार दुस-या  राज्यांमध्ये जातीलच कशाला?

 ही प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्स दिनांक २६ जानेवारी,२०१० रोजी प्रसिध्द झाली आहे.

Monday, September 13, 2010

विमानतळात राजकिय नेते व बिल्डरांचे हितसंबध.

नवी मुबंईत दुसरे विमानतळ न होण्यामागे पर्यावरण हे कारण नसून राजकारण हे मुख्य कारण असल्याने निर्दशनात आले आहे. विमानतळाला विरोध करणे व तो आपल्या पदरात पाडण्यासाठी नेत्यांमघ्ये स्पर्घा असून या स्पर्घेत बिल्डर लाँबी सहाय्य करीत आहे.विमानतळ होणार याचा फायदा घेण्यासाठी जागेत पैसा गुंतवणा-या बिल्डर लाँबीला दुखविणे राजकिय पक्षाना परवडणारे नाही म्हणुन हा वाद पतंप्रघानांपर्यत नेला आहे.नवीन विमानतळाच्या बाजुच्या जागा राजकिय नेत्यांनी खरेदी केल्याने नवी मुबंईतच विमानतळ व्हावा असा त्यांनी आग्रह घरला आहे.नेत्यांना विकासाऐवजी स्वार्थ अधिक महत्वाचा वाटतो. विमानतळाच्या वादामागे शहराचा विकास नसून अर्थकारणासह सत्ताकारण दडलेले दिसते.
विमानतळासाठी सर्वाना योग्य जागा निवडताना ती पर्यावरणाची हानी न करणारी,सोप्यारीतीने जागा संपादीत करता येणारी,शहरातून विमानतळापर्यतचा मोठा रस्ता,विकासासाठी लागणारा निधि अशा गोष्टीचा विचार व्हावा. पर्यावरणाचा समतोल राखत दुसरा विमानतळ बाधंला नाहीतर या वादात आणखी कीती वर्ष वाया जातील.सर्व पक्षानी आपले हितसबंध बाजुला सारुन सर्वाना अनुकुल ठरेल अशी योग्य जागा निश्चीत करुन केंद्रांकडुन समंती मिळवावी. प्रगती ही माणसाची गरज पण निर्सगाच्या मदतीने करायला पाहीजे.


ही माझी प्रतिक्रिया आजच्या 'महाराष्ट्र टाईम्स'या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

Monday, August 10, 2009

गडप्रेमीनी गडाचे सौदर्य झाकाळु नये.



कालच कुटुबांतील छोट्या मोठ्या सह कर्नाळा या गडावर जाण्याचा योग आला. तसे या अगोदर दोन/तीनवेळा या अभयारण्यात व गडावर फिरुन आलेलो आहे.पाऊस नव्हता व गड चढण्यास उशिरा सुरु केल्याने सुरुवातीला मोठी मडंळी दमली.अभयारण्य हिरवाईने नटलेले आहे.मघ्ये मघ्ये मोर साद घालीत होता.प्रसन्न वाटत होते.


काही मडंळी पहिल्यांदा ट्रेकला आल्याने चढण्यास उशिर होत होते.पाणी पित धापा टाकीत पहीला टप्पा चढले.खालील परीसर वरुन पाहील्यावर मडंळी खुष झाली.मग हुरुप आल्याने पुढचा ट्रेक पटापट चढत चढत गेलो.


दरवाज्याने आत शिरलो तेव्हा सर्वाना आनंद झाला.समोरच अगांवर येणारा सुळका दिसतो.काळ्या कातळाचा सुळका कपारी कपारीचा दिसतो.खालुन दिसणारा आगंठ्याच्या आकाराचा सुळका जवळुन पाहण्यास आनंद वाटला.सुळक्यावर मघ्ये मघ्ये डाग दिसले. नीट पाहील्या नतंर कळले हायर्क्स नी त्या सुळक़्यांच्या दगडांवर त्यानी त्याची नांवे सफेद रगांत लिहीलेली दिसली. सुळक़्याचे सौदर्य या क्रुत्तीने झाकळलेले दिसले. निसर्गाचे सौदर्य आपण नेहमीच खराब करीत असतो. पयर्टक प्रेक्षणीय स्थळाना भेट देतात व त्या ठीकाणी आपली नांवे कोरतात.ह्या कृत्ती गुन्हयास प्रात्र आहे. तरीही हे पयर्टक स्थळांची शोभा खराब करतात.


या सुळक्या सारख्या ठिकाणी सामान्य माणुस चढु शकत नाही.तेथे फक्त जाणकार ट्रेकर साधन सामुग्रीच्या मदतीने चढु शकतात.मग हे साहसवीर आपण केलेल्या यशस्वी चढाई ची नोंद या ठिकाणी का करतात?गडप्रेमीनी या ट्रेकरना अशा गोष्टीपासुन दुर राहण्याची विनंती करावी. ट्रेकरनीही या गोष्टी न करता इतर ट्रेकरनादेखील यापासुन लांब ठेवावे. ट्रेकरनी असे केल्यास काही दिवसानी प्रेक्षणिय स्थळे,गड किल्ले पाहण्यास कोण जाईल का?

Friday, June 5, 2009

मोबाईलची शिकवणी.

मुंबईत लोकलने प्रवास करीत होतो.मला खिडकीची जागा मिळाली होती.दादरला नवरा,बायक़ो व लहान मुलगा असे एककुटुंब समोरचा सिट वर येउन बसले.सामान रँकवर सर्वजण स्थानापन्न झाले.नवर्याने माझ्या शेजारच्या कडुन पेपरमागुन घेतला व वाचु लागला. थोडया वेळाने बायकोने नवर्याला मोबाईलवर कोणा नातेवाईकाला फोन करण्याची विनंती केली. त्याचे लक्ष पेपर वाचण्यात होते.त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. तिने पुन्हा त्याला हलहलवुन फोन लावण्याची विनंती केली. त्याला वाटते तो फोन करायचा नव्हता म्हणुन त्याने मोबाईल तिचा हातात सोपवुन तीला फोन करण्यास सांगितले व पेपर वाचू लागला. मी शांतपणे सर्व गोष्टी पाहत होतो. तीने मोबाईलवरुन फोन करण्याचा प्रयत्न केला.तो पेपर वाचता वाचता तिच्या कडे पाहत होता. त्याला तीचे प्रयत्न पाहुन न राहील्यामुळे त्याने एकदम तिच्या हातातुन मोबईल ओढुन घेतला. त्याने मोबाईल कसा वापरायचा याची शिकवणी सुरु केली.

back-मागे, search- शोधा, View- पहा, delete- रद्द करणे, edit- दुरुस्त करा. हया सर्व संज्ञा वापरुन त्याने त्याच्यापरीने तीला माहीती देण्याचे प्रयत्न सुरु होते. लहान मुलगा आईबाबांकडे शांतपणे पाहत होता. गाडीतले प्रवासी या शिकवणीची मजा घेत होते. तीला प्रयत्न करुनही काय जमत नव्हते.तो व्यतागुन रागवत होता.मघ्येच कसा काय एक फोन लागला. नतंर राँग नबंर लागलेल्याचे कळले तेव्हा तर त्याने तीच्या खाद्यावर थप्पड मारली. नवर्याकडे सर्व प्रवासी पाहु लागले.तीने खादां चोळत त्याच्या कडे रागाने पाहीले. त्याचे सार्वजनिक जागेत असे वागणे योग्य वाटले नाही. ती पुन्हा प्रयत्न करु लागली. back,delete,हिरवे,लाल बटने दाबण्यास तो तीला ओरडुन सांगत होता. तो स्वत:ला मोठा ज्ञानी समजत होता ती गरीबासारखी सर्व गोष्टी ऐकत होती.

शेवट पर्यत त्याची शिकवण काय संपली नाही पण गाडी सीएसटी ला पोहचली होती. त्याला तो फोन लावयचा नव्हता असे वाटले.


Thursday, June 4, 2009

पर्यावरणाचे महत्त्व फक्त एक दिवस.


आज जगभर 'पर्यावरण दिन' पाळला जात आहे. आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या पाण्यासकट सर्व संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं पर्यावरणविषयक जागृतीचं कार्य सर्वानी मिळुन करायला पाहीजे.सन १९७२पासून जागतिक पर्यावरण दिन पाळला जात आहे. या काळामध्ये या विषयाबाबत सजगता किती वाढली असा प्रश्न केला तर पदरी निराशा येते.वास्तविक हा दिन पाळण्यामध्ये असलेले उद्देश अगदी स्पष्ट आहेत.सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण व्हावी, पर्यावरणविषयक प्रश्नांना 'मानवी' चेहरामोहरा मिळावा,लोकांना या विषयाबाबत अधिकाधिक ज्ञान द्यावं ,समान विकासासाठी अगदी सामान्य माणसालासुद्धा सर्वदृष्टीनं तयार करावं, पर्यावरणविषयक प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक रीतीनं बदलण्यामध्ये सामान्य माणसाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.हिमालयात बर्फ वितळु लागला आहे. हिमनद्या आक्रसु लागली आहेत.समुद्राच्या सरासरी पातळीमघ्ये वाढ होत असलेली निर्दशानात येत आहे. जगंल तोड,वाढता प्लास्टिकचा वापर.केमिकल उपयोग,ओझन वायुची वातावरणात वाढ हया गोष्टीनी पार्यावरणाचा र्हास होत आहे. सामन्यांनी कमीत कमी प्लास्टिक च्या पिशव्याचा वापर कमी केला तरी या दिवसाचा फलीत होईल.

बांधकाम क्षेत्रात नियमीत वाढ होत असल्याने झांडाची सरसकट कत्तल होत आहे पण त्या ठीकाणी नविन झाडे लावली जात नाहीत. प्रत्याक्षात आपल्या पर्यावरणाच्या रक्षाणासाठी आपण काहीच भरीव कामे करीत नाहीत.हवामानातील बदलांबाबतचे अदांज लक्षात घेतले तर गेल्या काही वर्ष हा दिवस एक उपचार म्हणुनच साजरा करतो. हरीत अर्थव्यवस्थेला उत्तेजन देउन निर्सगाच्या संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करावेच लागेल.