Friday, October 25, 2024
Friday, December 8, 2023
Friday, November 25, 2022
नव्या दोस्तांसह सजली मैफल
नवी दोस्ती
दापोलीच्यापुढे दाभोळ रस्त्यावर २० किलोमीटरवर आगरवायंगणी या गावाजवळ ’कोकण ट्रेल’ नावाचे मोठे गॄहसंकुल विकसित होत आहे. येथील परिसर व हवामान खूपच छान असल्याने येथे मुंबई व पूण्यामधील निसर्गप्रेमींनी घरे घेतली आहे. काही घरे तयार झाल्याने त्या घराचा ताबा मालकांना दिला आहे. तर काही घरे लवकरच पूर्ण होणार आहेत.
नव्या घरात दिवाळी साजरी करण्यासाठी काही कुंटुंब येथे राहण्यास आली होती. मुंबईतले श्री.बिपीन छेडा, ठाण्य़ातून मी आणि पूण्यातून श्री.शिरीष लिमये व श्री.सचिन शेटे अशी चार कुंटुंब दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेथे गॄहसंकुलात राहणार होती. अदल्या दिवशी मी व पत्नीने आमच्या गॄहसंकुलाच्या स्वागतकक्षात ’दिवाळी पहाट’ कार्यक्रम करण्याचा बेत आखला. चार कुंटुंबात काय दिवाळी पहाट करणार? पण या वर्षी सुरुवात तर करुया असे आम्ही ठरवले. मी व पत्नीने इतर तीन कुंटुंबाना फोन वरुन दिवाळी पहाटची संकल्पना सांगितली. उद्या सकाळी आठ वाजता स्वागतकक्षात पारंपारीक गणवेषात आपल्या कुंटुंबातल्या सर्व सदस्यासह जमावयचे आहे. गाणी,विनोद, नकला, नाच जे जमेल ते करायचे आहे. शेवटी दिवाळी फराळ फस्त करायचा.असा एक दिड तासाचा कार्यक्रम ठरला. बाजुच्या गावातून स्पिकरची सोय झाली. कार्यक्रम ठरला पण उद्या मडंळी जमतील की नाही याची भिती वाटत होती.
दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. आम्ही पहिली आंधोळ करून देवाची पुजा करून फराळ घेऊन स्वागतकक्षात पोहचलो. तेथे कोणीच आले नव्हते.प्रथम श्री.बिपीन छेडा पत्नीसह आले नंतर श्री.शिरीष लिमये व श्री.सचिने शेटे कुंटुंबासह जमले. आता आपण छोटासा कार्यक्रम करु शकतो याची मला खात्री पटली. सर्वांनी एकामेकांना दिवाळीच्या शुभेछा दिल्या. श्री प्रतिभा लिमये यांनी प्रथम ’स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर’ हे गाणं गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवाळीच्या पहाटे थंड वातावरणात प्रसन्न वाटत होते. प्रत्येकाने करमणूक करायचे ठरले. नंतर पत्नीने ’अच्युतम केशवम’ हे भजन घेतले. कुमारी स्मेरा शेटे हिने छान नाच केला आणि माहोल बदलून टाकला. सर्वांना वाटू लागले आपणही काय तरी केले पाहिजे.’जगी ज्यास कोणी नाही’,’आनंदाच्या डोही आनंद तरंग’ अशी बरीच मराठी गाणी झाली. श्रीमती मिनल शेटे यांनी आपल्या मुलीसह सुंदर नाच केला. सर्वांना नाच खूप आवडला. छेडा कुंटुंबियांनी गुजरातीत एक गाणे गायले. श्री.शिरीष लिमये यांनी देखील हिंदीत गाणे गायले. सगळ्याचा उत्साह वाढला होता. आम्ही चार पुरुषांनी ’ये दोस्ती नही तोडेंगे’ हे गाणे गायले. गरबा केला. नंतर मी पत्नीसह ’महाराष्ट्र गीत’ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. गॄहसंकुलात कामाला आलेले गावकरी आमच्या कार्यक्रमाचे प्रेक्षक झाले होते. फराळ व चहापाणी करून आम्ही आंनदाने आपापल्या घरी परतलो. कार्यक्रमाचे फोटो व व्हिडियो पाठवल्यावर सगळी मंडळी खूष झाली. अगोदर काहीच तयारी नसताना कार्यक्रम छान झाला.
दिवाळीनंतर एक मोठे ’गेट टुगेदर’ ठरले होते. दिवाळी आपल्या घरी साजरी करून या कार्यक्रमाला श्री.सागर,श्री.दिक्षीत,श्री.दिवेकर व श्री.पार्ले ही कुंटुंब सामील झाली होती. गेम व हौझी झाले. पाणी पुरी,रगडा पॅटीस,शेव पुरी व भेळ असे पदार्थ ठेवले होते.सगळ्यांनी ताव मारुन मजा केली. गेममधली बक्षीस वाटली.
या दोन्ही कार्यक्रमाने आम्ही सगळे घरमालक व कुंटुंब एकत्र आले. नव्याने ओळखी झाल्या. नवे दोस्त मिळाले. नवी दोस्ती सुरु झाली. या वर्षाच्या अखेरीस परत भेटण्याची उत्सुकता सगळ्यांनी दाखवली आहे.
Tuesday, July 19, 2022
आजी आजोबांच्या सहवासातील सुंदर क्षण
जिव्हाळ्याचे गाव
मुंबई गोवा या महामार्गावर इंदापूर नंतर तीन किलोमीटर वर ’विघवली’ या गावाचा फाटा लागतो. तेथून आत दिड किलोमीटरवर ’विघवली’ हे गाव डोंगराच्या कुशीत असून गर्द वृक्षराजीत वसलेले आहे. कौलारू घरांचे सुंदर गाव आहे.निसर्गमय आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहून नक्कीच कोणीही गावाच्या प्रेमात पडेल असा आहे. गावातील निसर्ग हाच तर खरा खजिना आहे. फाट्याहून गावात जाण्याच्या रस्त्याच्या दुतर्फा भातशेती आहे.गावकरी भातशेतीवर आपला उदरनिर्वाह करीत असत. गावात शाळा, तीन देवळे व तीन विहिरी आणि एक सुंदर तळे आहे. होळी, गणपती, दहीहंडी व पालखी असे उत्सव आनंदात साजरे होतात. अशा या आजोळी मी लहानपणी सुट्टीत कायम यायचो. माझ्या बालपणाच्या इतिहासातील काही सोनेरी पाने. बालपणी आजोळाला एक अनन्यसाधारण स्थान असते. आजोळाचे गाव म्हणजे एक आठवणी देणारं रम्य ठिकाण.
आजोबाआजी,मामामामी व मावश्याकाका असे मोठे कुटुंब एका मोठ्या घरात एकत्र राहायचो. घराच्या समोर अंगण, त्यावर गवताचा मांडव, ओटी, देवघर, माजघर, स्वयंपाकघर, पडवी आणि मागे परस आहे. गावात घराला लागून घर आहेत. त्या काळात गावात वीज नव्हती. रात्रीच्या अंधारात दिवे मिनमिनत असत.
कोंबड्याच्या आरवण्याने व जात्यावर दळण्याचे आवाज आणि परसातील झाडांवरील पक्ष्यांचे किलबिलाटाने पहाटे जाग येत असे. गोठ्यातील गाई-म्हशीचे हंबरणे ऐकू येत असे. सकाळी दूध काढत असू. गुरांना चरायला सोडायचो. आजीच्या हातचा खमंग पदार्थ यामुळे न्याहारीला लज्जत येते. आजीने केलेली साधी भाजी-भाकरीही चवदार लागते. घराच्या मागील डोंगरावरील रानात स्वछंदी भटकायचो. बैलगाडीत बसून शहरात जात असू. घरातली सर्व मंडळी शेतावर काम करण्यास जात असत. शेतावरचे जेवण खूपच चविष्ट लागायचे. शेतावरील पेरणी,लावणी,कापणी व झोडपणीची कामे करताना मजा यायची. नांगर धरायचो. कालव्यात पोहून मग घरी येत असू. निरांजनातील वातीच्या उजेडात शुंभकरोती झाल्याशिवाय जेवण मिळत नसे. कंदीलाच्या प्रकाशात जेवण व्हायचे. भूक लागलेली असल्याने जेवण जास्त जात असे.वीज नव्हती तरी काहीही अडत नव्ह्ते. रात्री काही वेळ गोष्टी ऐकताना व आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण सुरु असताना कधी झोप लागायची हेच कळायचे नाही. मला माझे आजोळ अजूनही अतिशय प्रिय आहे.
गावातील कालव्यात डुंबत राहण्यात, बैलगाडी पळवण्यात, मासे मारण्यात, गुरांशी खेळण्यात, रानोमाळी आंबे,जांभळे व करवंदे गोळा करण्यात आणि स्वच्छंद भटकण्यात सुट्टी कधी संपते ते समजत नव्हते. अशा या मंतरलेल्या वातावरणातून परतण्याचा दिवस उगवायचा. गावातून आणलेल्या सामानात आजीने दिलेल्या डांग-मेतकुटाची भर असे आणि आजी-आजोबांच्या सहवासातील अमृतमधुर आठवणी मनात रुंजी घालत असायची. उन्हाळ्यातील दोन महिने व दिवाळीतील पंधरा दिवस सुट्टीत मजा करून मुंबईला परतत असू. गावातल्या आजोबाआजीला पत्र पाठवित असू. लहानपणीच्या रम्य आठवणी आाताही आजच घडल्याप्रमाणे आठवतात. कायमच्या स्मरणात राहिल्या आहेत. गाव तसाच राहिला आहे पण आवडीची माणसं राहिलेली नाहीत. आजोळाची ओढ मनात एक खास जागा घेऊन राहली आहे.
आजोळ म्हंटलं की मनात असंख्य आठवणी दाटतात, सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आठवतो. प्रत्येकाच्या मनातल्या एका कप्प्यात आजी आजोबांसोबतच्या क्षणांचा खजिना दडलेला असतो. कितीही मोठे झालो व शहरात राहिले तरी गावात येऊन तेथील निसर्गाचा अनुभव आपल्याला नेहमी चांगली ऊर्जा आणि काहीतरी नवीन शिकवण देण्याचे काम करत असतो.
Wednesday, March 30, 2022
तारुण्यातील सोबती
१५.०३.२०२२ रोजी महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रात प्रसिध्द झालेला लेख
Tuesday, May 18, 2021
निखळ तिचे हास्य
मुलीचं सहजसुंदर निखळ हास्य मी पाहताच तीचे फोटो काढत राहिलो. निखळ व निरागस हास्य किती गोड दिसतं याचा मला त्यावेळी प्रत्यय आला. तिचे मोहक, लोभस हास्य. जशी हवेची मंद झुळूकच. सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक सुंदर, निरागस व मनमोहक मुलगी आंनदात झोपाळ्यावर बसून हळुवार झोके घेत होती. चेह-यावर हलकसं स्मित उमटल्याने सुंदरता अधिक वाढली होती.चेहर्यावरील हास्य ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल व सुंदर देणगी आहे,याचा प्रत्यय आला. लहान मुलांना झोका घ्यायला खूप आवडते. तेथे आजुबाजुला दुसरी कोणी दुसरी मुलं नसल्याने ती शांतपणे झोका घेत स्व:तात रमली होती. बाकीच्या जगाचा जणू तिला विसर पडला होता. झोका घेताना ती स्वत: आंनदात दिसत होती. ती तिच्या खुशीत रमली होती. थंडगार हवेची झुळूक अंगावर घेत झोका घेण्यात सुखावली होती. तेव्हा तेथील वातावरण देखील प्रसन्न वाटले होते. बोलक्या डोळ्यांनी मोकळ्या मनाचे हितगुज साधत होती. जणुकाय स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी. तिच्यात अवखळपणा दिसत नव्हता. प्रत्येक झोक्यासह तीचे हास्य फुलत होतं. तिचे गोड स्मित बघत राहावेसे वाटत होतं. तिचे ते बोलके हास्य व चेह-यावरती कोमलता पाहून ती फुलांसारखी नित्य उमलावी व स्वच्छंदी बागेत बागडावी असे वाटलं. तीचे ते बालपणीचे सुंदर क्षण डोळ्यात साठवूनी ठेवावेत असे झालं होतं. तिला त्यावेळी पाहून कवीला नक्कीच कविता सुचली असती.
निखळ,निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. हास्य हा मनाचा आरसा आहे. चेहऱ्यावर निखळ हास्य हीच तर आहे खऱ्या माणसाची ओळख असते.हसणारे चेहरे स्वत:सह इतरांचे चेहरेदेखील हसरे करून जातात, मने हलकी करून जातात.एका हास्याने समोरच्याचे हृदय जिंकता येते, मनातील मळभ दूर करता येते, मैत्रीचा हात पुढे करता येतो, शत्रूशी वैर संपविता येते, मनावरील ताण हलका करता येतो, अनेक मानसिक आजारांना दूर पळवून लावता येते अशी हास्याची महिमा सांगणारे गुण सर्वपरिचित आहेत. कदाचित म्हणूनच सर्वांनी हसलं पाहिजे.हसल्याने आयुष्य वाढत असल्याने कायम हसत रहा.
Friday, March 5, 2021
’अतुल’ तु जाऊ नकोस.
मित्राचा सकाळीच फोन आला. आज सकाळी आपला मित्र ’अतुल’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मी ’काय’ असे मोठ्याने ओरडलो. क्षणभर काहीच कळले नाही. अत्यंत धक्कादायक बातमीने काहीच सुचत नव्हते. फोन सारखा वाजू लागला. बातमी खरी आहेत का? अशी विचारणा होत होती. कोणाला विश्वास बसत नव्हता.
अतुल हा माझा मित्र. मी वडाळ्याला कॉलनीत राहायला होतो तेव्हापासूनची आमची ओळख. मस्त देखणा व रुबाबदार व्यक्तिमत्व. अतुल, मुंबई पोर्ट ट्रस्टला माझ्या नंतर नोकरीला लागल्यावर आमची मैत्री आणखी वाढत गेली.त्यानंतर त्याचा लहान भाऊ ’अभय’शी ओळख झाली. दोघेही उंच व भारदस्त शरीरयष्टीचे मोटर सायकलने कामावर यायचे. या दोघांची आई देखील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काम करीत होत्या. त्यामुळे या दोघांची सर्वांशी लवकर ओळख झाली. कामात दोघेही हुशार होते. आई सेवानिवृत झाल्यावर कॉलनीतून अभय दादरला व अतुल ठाण्याला राहायला गेला. अतुल ठाण्याला आल्यानंतर रेल्वेत नेहमी भेट होत गेली. अतुल बरोबर काही सहली झाल्या.
लहान भाऊ अभयचे आजारात निधन झाल्यावर त्यांच्या कुंटुंबावर मोठे संकट कोसळले.अभय नंतर अतुल व त्यांचा लहान भाऊ अनिकेत यांनी कुटुंबाला सावरले. काही दिवसाने आई आजारी झाली.अतुलने आईला ठाण्याला आणले होते.अतुल ऑफिसला गेल्यावर अतुलची पत्नी व आई दोघी घरी असायच्या.
अतुल च्या निधनाची बातमी ऑफिसमध्ये गेल्यावर जवळच्या मित्रांनी ठाण्याच्या दिशेने धाव घेतली.सर्वांना दु:ख झाले होते.अंतिम दर्शनासाठी नातेवाईक जमत होते. घरी जाऊन त्याच्या भावाला व अतुलच्या पत्नीला भेटलो.त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सांत्वन करणे शक्य नव्हते. सर्व कुंटुंबीय कालच रात्रीच सहलीहून परतले होते. सहलीत मजा करून घरी परतले होते आणि लगेच दु:खात गेले.
सर्व नातेवाईक जमल्यावर अंतिम तयारीला वयस्कर मंडळी लागली. अतुल पार्थिव देहाला खाली आणण्यात आले.विधी झाल्यावर सगळ्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी अतुलची आई गॅलरीतून सर्व पाहत होती. प्रेतयात्रा सुरु झाली. त्यावेळी ती ’अतुल तु जाऊ नकोस’ अशी म्हणत होती. काय वाटले असेल त्यावेळी त्या माऊलीला? माझा अतुल मला आता परत दिसणार नव्हता. माझी दोन्ही मुलं मला सोडून गेली, हे दु:ख तिला सहन करणे कठीण होतं.
Tuesday, March 24, 2020
कसा राहू मी घरात?
Monday, March 23, 2020
रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
Monday, March 2, 2020
हत्तीचा अभिषेक
हा सर्व प्रकार पाहून मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.गावात हत्तीचा उपयोग या खेळासाठी करतात.
Thursday, February 13, 2020
महाराजांचे दर्शन झाले.
Wednesday, January 22, 2020
निखळ तिचे हास्य
निखळ तिचे हास्य
मुलीचं सहजसुंदर निखळ हास्य मी पाहताच तीचे फोटो काढत राहिलो.
निखळ व निरागस हास्य किती गोड दिसतं याचा मला त्यावेळी प्रत्यय
आला.सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक सुंदर, निरागस व मनमोहक
मुलगी आंनदात झोपाळ्यावर बसून हळुवार झोके घेत होती.
चेह-यावर हलकसं स्मित उमटल्याने सुंदरता अधिक वाढली होती.लहान
मुलांना झोका घ्यायला खूप आवडते.तेथे आजुबाजुला दुसरी कोणी मुलं
नसल्याने ती शांतपणे झोका घेत होती.झोका घेताना ती स्वत: आंनदात
दिसत होती.ती तिच्या खुशीत रमली होती.ती निखळ आनंद उपभोगत
होती.थंडगार हवेची झुळूक अंगावर घेत झोका घेण्यात सुखावली होती.
तेव्हा तेथील वातावरण देखील प्रसन्न वाटले होते.
बोलक्या डोळ्यांनी मोकळ्या मनाचे हितगुज साधत होती.जणुकाय
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी,एक सुन्दर चाफेकळी. तिथे काय घडतय़
याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नव्ह्ता. तिच्यात अवखळपणा दिसत
नव्हता. प्रत्येक झोक्यासह तीचे हास्य फुलत होतं. तिचे गोड स्मित
बघत राहावेसे वाटत होतं.निखळ तीचे बोलके हास्य व चेह-यावरती
कोमलता पाहून ती फुलांसारखी नित्य उमलावी व स्वच्छंदी बागेत
बागडावी असे वाटलं. तीचे ते बालपणीचे सुंदर क्षण डोळ्यात
साठवूनी ठेवावेत असे झालं होतं. तिला त्यावेळी पाहून कवीला
नक्कीच कविता सुचली असती.
निखळ, निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे.हास्य हा
मनाचा आरसा आहे. चेहऱ्यावर निखळ हास्य हीच तर आहे खऱ्या
माणसाची ओळख असते. हास्य जणू अमृत हे जगण्याचे निखळ
अंतःकरणाचे साधन.
Friday, January 10, 2020
शेकोटीची उब
गाणी सुरु झाली.पेटलेल्या शेकोटीच्या समोर स्वराज्याच्या गाण्यानी सुरुवात केली.शौर्यगीत,भक्तीगीत,भावगीत व नंतर पिकनीकची गाणी झाली.मग गप्पा कधी रंगल्या ते कळलेच नाही.एका मित्राने ट्रेकमधले केलेल्या मोहिमांची साहसाची माहीती दिली. हिमालयातील मोहिमांची माहीती दिली व हिमालयातील मोहिमा आवर्जून करण्याची विंनती केली.दुसरा मित्र पहिल्यांदा ट्रेक आल्याने त्याने त्याच्या शालेय व कॉजेलच्या जीवनातील गमतीजमती सांगितल्या आम्ही खुप हसलो व त्याची टिंगलही केली. शेकोटीच्या उबेत गप्पाही रंगत होत्या.एका मित्रांनी कलाकारी केली. वेगवेगळ्या अभिनेत्र्यांचे आवाज काढले.डॉयलोग बोलला. एकपात्री प्रयोग साकारला.एका मित्रानी मोबाईल काढून त्यांनी वाचलेल्या काही पुस्तकातील त्याला आवडलेले प्रसंग वाचुन दाखवले.सर्वाना ते प्रसंग भावले. एका मित्रांनी राजकारणावर बोलण्यास सुरुवात करताच त्याला तेथेच थांबवले.या ठिकाणी राजकारणावर भाष्य नको,असे त्याला समजावले.मग त्याने शिवरायांच्या इतिहासातील विशेष व्यक्तींचा पराक्रम आमच्या समोर उभा केला. गप्पाची मैफल आता चांगलीच रंगली होती.रात्रभर शेकोटी पेटत ठेवत गप्पा मारण्याची सर्वाची तयारी झाली होती. कोणीही झोपण्यास तयार नव्हता.वेळ खुप झाली होती.एक मित्रांनी त्याच्या ऑफिसमधल्या मजामस्ती संगितली.बॉसची टिंगल टवाळी केली.मंडळी काय झोपायचे नाव घेत नव्हती,काय करायचे. मी एक युक्ती केली.माझ्यावर वेळ आल्यावर मी भुताच्या गोष्टीं व अनुभव सांगण्यास सुरुवात केली आणि लागलीच शांतता झाली.सगळे चीडीचुप झाले.मगच्या एका ट्रेकमध्ये एका मित्राने सांगितलेल्या भुताखेतांच्या गोष्टी शेकोटी समोर या सर्वांना आवाज काढून सांगत होतो.मला वाटले हे माझी चेष्ठा करतील पण झालं उलटच ते सगळे धाबरले होते.आजूबाजूला काळोख असल्याने भीती वाटत होती.एकजण थरथरत उठून स्पिपिंग बॅग मध्ये घुसला.तसा मी सांगायचा थांबलो.सुकलेल्या काट्या संपल्याने शेकोटीतील आग कमी झाली होती.शेकोटीसाठी काट्या आणाव्या लावतील म्हटल्यावर कोणीच येण्यास तयार नव्हता.माझे काम झाले होते.शेकोटीनेच आम्हाला आता झोपा असे सांगितले होते.
Thursday, January 2, 2020
आजीचा फोटो
आता चांगलेच तांबडे फुट्लं होतं.माझे फोटो टिपणे सुरु होते.तेवढ्यात बैलांच्या गळ्यातील घुंगुरांचा आवाज कानावर पडला.खिल्लारी बैलांची एक बैलगाडी माझ्या दिशेने येताना दिसली.चांगला फोटो काढण्याची नामी संधी माझ्याकडे धावून आल्याने माझी धावपळ सुरु ली. घुंगुरांचा आवाज जवळ येऊ लागल्यावर मी सरसावलो. बैल बैलगाडी एका लयीत ओढत असल्याने घुंगुरांचा आवाज लयबध्द होता. सफेद रंगाच्या खिल्लारी बैलांची बैलगाडी हाकलणारा मला पाहून हबकला व सावरून बसला.मला पाहिजे होत्या तशाच बैलगाडीचे मी वेगवेगळ्या कोनातून फोटो टिपत होतो. किती फोटो काढू असे झाले होते. बैलगाडी आता खुपच जवळ आली होती. तरीही माझे फोटो काढणे काही थांबत नव्हते.आता बैलगाडी माझ्या समोरून जात होती.मी गाडीत पाहिले तर एक आजीबाई टोपली घेऊन बसलेल्या दिसल्या.त्या शेतावर निघालेल्या दिसल्या.पहिल्या पासून माझी नजर बैलगाडीवर असल्याने गाडीत कोण बसले याकडे लक्ष नव्हते.आजीना पाहिल्याबरोबर माझा कॅमेरा पुन्हा सरसावला.आजीनी साडीचा पदर डोक्यावरुन घेऊन साडीत अंग झाकलेले होते.कपाळावर काळा टिळा होता.चेहरा हसरा होता.आजीनीही मला पाहिल्याबरोबर पोझ दिली व गालात हसल्या. मी पटकन फोटो काढून घेतला. मी नकळत त्यांना नमस्कार केला.कोणतरी आपला फोटो काढतोय याचा त्यांना आंनद झालेला दिसला.या वयात देखील शेतावर शेतीची कामे करण्यास निधालेल्या पाहून मन भरुन आले.Thursday, December 26, 2019
… तिची अदभूत केशरचना!
आपल्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे असे वाटत असेल तर केशरचना नीटनेटकी असणे आवश्यक आहे. स्त्रीपुरूष या दोहोंनाही केशभूषेचे आकर्षण असते.आपल्याला सुंदर बनविण्यात अनेक गोष्टींचा सहभाग असतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपले केस. केवळ सुंदर केस असूनही चालत नाही. त्यांची रचनाही तितकीच आकर्षक असावी लागते.आपली केशरचनाच आपल्या सौंदर्यात मोलाची भर घालत असते.
Tuesday, November 12, 2019
दानशुर शेतकरीमामा
Saturday, November 2, 2019
चिमणी व चिमणा
Wednesday, October 30, 2019
कदममामा
Saturday, August 26, 2017
फुगेवाला
रस्त्यांवरुन जाताना समोर एक फुगेवाला आला.सायकलच्या मागेलाल पिवळा, हिरवा, निळा रंगीत फुगे लावले होते व हॅन्डलवर छोट्य़ाशा बास्केट मध्ये एक छोटीशी मुलगी बसलेली दिसली.तो फुगेवाला सायकलवरुन उतरुन चालत चालला होता.मुलगी सायकलवर होती.
रंगीबेरंगी फुगे बालगोपाळांना फार आवडतात. हवेत तरंगणाऱ्या फुग्यांचे त्यांना भारी कौतुक वाटते. फुग्यांमागे धावणे हा त्यांचा आवडता छंद असतो.कोणाला लाल, तर कोणाला निळा, तर कोणाला एक सोडून दोन फुगे विकत देऊन तो या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत होता.फुगेवाला दुस-यांच्या मुलांसाठी फुग्याच्या रुपात आंनद विकत होता.पण स्वत:च्या मुलीला मात्र त्या आनंदापासून दूर ठेवत होता.हे करताना त्याला कीती दु:ख होत असेल.आपल्या फुग्यांवर दुस-याची मुलं खुश दिसतात.पण आपल्या मुलांना आपण खुश करु शकत नाही.याची त्याला खंत होत असेल.तिलाही वाटत असेल बाबांनी मलाही फुगा द्यावा.मी पण फुग्याबरोबर खेळावे.फुगे विकून मिळणा-या पैशावर त्यांचा चरितार्थ चालत असणार.
मी त्याला विचारले,आपल्या मुलीला फुगे आवडत नाही का?.त्यावर तो म्ह्णाला, कोणत्या
लहान मुलाला फुगे आवडत नाहीत? तीला पण खेळायला फुगे पाहिजे असतात.कोणते मुल आपल्या एवढ्या जवळ फुगे असूनही शांत बसेल?मला वाईट वाटले. मी त्यांच्याकडे उरलेले
सगळे फुगे विकत घेऊन त्या मुलीला दिले.त्या मुलीला खूप आंनद झालेला दिसला.पण सगळे फुगे लगेच संपून देखील तो फुगेवाला नाराज दिसला.ती मुलगी रोज फुगे विकून देणार नाही याची त्याला भिती वाटू लागली.
आपल्या मुलीला न देता दुस-यांच्या मुलांना आंनद देणारा फुगेवाला.
Saturday, August 6, 2016
सुंदर, साजिरा श्रावण आला!
हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला
निसर्गातील स्थित्यंतरांचे मनमोहक रुप दाखविणारा महिना. सारी सृष्टी आनंदोत्सव साजरा करते.



















