Friday, March 26, 2010

आयपीएलमघ्ये तरुण खेळाडु असावेत.



कसोटी व मर्यादित षटकांच्या सामन्यांपेक्षा वीस षटक़ांच्या सामन्यातील खेळाच्या वेगामुळे खेळातील थरार पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमीनी हे सामने लोकप्रिय केले आहेत.या स्पर्घेतील आतापर्यतच्या सामन्यातून थरार पाहण्यास मिळाला नाही.या स्पर्घेच्या प्रसिध्दीसाठी व प्रेक्षकानी गर्दी करण्यासाठी आयोजकानी प्रसिध्द पण दमलेल्या खेळाडुचा भरणा केली आहे.हे प्रसिध्द खेळाडु क्रिकेट खेळातून निवृत झालेले आहेत तर काही निवृत होण्याच्या मार्गावर आहेत. चार पांच सामन्यांतून एखाद्या सामन्यात आपल्या अनुभवावर खेळ करतात. युसुफ, पठाण, रैना,रोहीत, बोपारा, तिवारी,गंभीर, रायडु,मलिंगा,विनय याच्यासारखे तरुण व नवोदित खेळाडुंचा भरणा केल्यास वेगावान खेळाचा थर अनुभवायला मिळेल.बुजुर्ग व क्रिकेट कारर्कीदीच्या शेवटाला पोहचलेल्या खेळाडुना त्याच्या अनुभवानुसार जास्त पैसे देउन प्रयोजकानी यास्पर्घेत उतरविले आहेत.त्या खेळाडुंमघील काही महान खेळाडु आपल्या खेळाने तग घरुन आहेत.या वेगवान खेळाला जुळवून घेण्यास हे खेळाडु कमी पडल्याने त्याचा खेळ अपेक्षेप्रमाणे होत नाही.जास्तीत जास्त तरुण व ताज्या दमाच्या खेळाडुंचा या स्पर्घेत समावेश केल्यास सामने चुरशीचे होतील व खेळाचा खरा आनंद क्रिकेटप्रेमीना लुटता येईल.



माझी ही प्रतिक्रिया आजच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मघ्ये प्रसिध्द झाली आहे.

No comments: