मुबंई या अफाट लोकसंख्या व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात दहशतवादी ह्ल्ले झाले तेव्हा त्याना आवरण्यासाठी दिल्लीतुन जवान मागवण्यात आले. अतिवृष्टीने शहरात पाणी साचल्यास लोकाना दिलासा देणारी यत्रंणा आपल्याकडे अस्तिवात नाही. अचानक विषारी वायुची गळती झाल्यास त्यावर नियत्रंण मिळवु शकु अशी आपल्याकडे यत्रंणा नाही.लोक़ांच्या व पोलिसांच्या प्रसंगावधानाने व जागरुकतेने अशा भयानक घटनेला सामना केला जातो.मुबंईजवळ दोन मालवाहु जहाजांची टक्कर झाल्यावर तेल गळती झाली. काही टन तेल चार ते पांच दिवस समुद्रांत वाहत होते पण जवळच्या दोन मोठ्या बदंर व्यवस्थापकाकडुन ते थांबवण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत.या तेलगळतीने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले ते थोपविण्यासाठी परदेशी कंपन्यांची मदत घ्यावी लागत आहे. दहशतवादी हल्ला झाला किंवा इतर काही आपत्ती आली तर मोबाईल फोन सेवेच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर उसळी येते. तेवढ्या कॉल्सना सेवा पुरविण्याची क्षमता नसल्यामुळे प्रचंड भाऊगर्दी होऊन ही सेवाच कोलमडते.सुरक्षा,यंत्रणा,आपत्ती व्यवस्थापन यात अशी भगदाडे आहेत म्ह्टल्यावर या शहराचे वाटोळे करण्यासाठी टपलेल्या मडंळीचे काम सोपे होऊ शकते.वेगेवेगळ्या दुर्घटनेप्रमाणे त्या आटोक्यात ठेवणा-या अद्ययावत यत्रंणा आपल्याकडे असल्या तरच मनुष्यहानी व नुकसान कमी होईल.येणा-या संकटांने मुबंईतले नागरी जीवन उदध्वस्त होण्याआधीच त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मुबंईत सुसज्ज व सक्षम यत्रंणा असणे गरजेचे झाले आहे.
No comments:
Post a Comment