Thursday, October 28, 2010

आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर अविश्वास

अमेरिकेचे  अध्यक्ष बराक ओबामा भारत दौ-यावर येताना मुबंईला भेट देणार आहेत.मुंबई ही देशाची आथिर्क राजधानी असून त्यांनी मुद्दामच दौ-यातील पहिल्या मुक्कामासाठी मुंबईला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे.
          मुंबईचे 'आयकॉन' म्हणून प्रसिद्ध असलेले ताजमहाल हॉटेलवरील हल्ल्याच्या दुस-या स्मृतिदिनाला अवघे काही दिवस उरले असताना, येणा-या या शाही स्वा-याचा मुक्कामही त्याच ताजमहाल हॉटेलात राहणार आहे.त्यामुळे अर्थातच या सा-या परिसरात मुंगीलाही शिरता येणार नाही, इतका कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. ओबामांच्या आगमनास किमान दोन आठवडे बाकी असतानाच या हॉटेलभोवती बॅरीकेड्स उभारले असून त्यांच्या मुक्कामाच्या काळात 'गेट वे ऑफ इंडिया'च्या त्या सुप्रसिद्ध परिसरात सामान्य मुंबईकर तसेच अन्य विदेशी पर्यटकांना पाऊलही टाकू दिले जाणार नाही.६ नोव्हेंबरच्या पहाटे ओबामांच्या विमानांचा ताफा मुंबई विमानतळावर उतरल्यापासुन त्याचा दौरा मोठ्या लवाजमा असलेल्या त्यांच्या सुरक्षेव्यवस्थेच्या कवचाखाली सुरु होणार आहे.बराक ओबामा आपल्या सुरक्षेसाठी त्यांची स्वत:ची सुरक्षाव्यवस्था वापरत असल्याने आपल्या देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर अविश्वास दाखवला आहे.इतर देशातील अध्यक्ष व नेते भारतात आल्यावर आपल्या देशाची सुरक्षाव्यवस्थाच वापरतात.त्याची सुरक्षा आपल्या सुरक्षाव्यवस्थेने कडेकोट बंदोबस्तात ठेवल्याने आतापर्यत त्यांना कधीच व कसलाच त्रास झालेला नाही. त्यांची सुरक्षा करणे हे प्रतिष्ठेचे असते त्यामुळे कोठेच निष्काळजीपणा दाखवला जात नाही. ओबामांची त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर गाढा विश्वास आहे तर मग त्यांच्या टाँवरवर कसे दहशती ह्ल्ले कसे झाले? का परतवु शकले नाहीत? आमची सुरक्षाव्य्वस्था देशाच्या करोडो जनतेची सुरक्षा करीत आहे.आपल्या सुरक्षाव्यवस्थेने दिल्लीत झालेल्या राष्ट्र्कुल स्पर्धेसाठी आलेल्या हजारो खेळांडु व परदेशी पाहुण्यांना दहशतवादी ह्ल्ल्यापासुन सुरक्षित ठेवले हे जगाने पाहिले व सुरक्षाव्यवस्थेची प्रशंसा केली आहे. आमचे पंतप्रधान व राष्ट्रपती परदेशी दौ-यावर जाताना आपली सुरक्षाव्यवस्था नेत नाहीत.त्या देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर विश्वास ठेवुन त्यांचीच सुरक्षाव्यवस्था वापरतात. अमेरिका सरकारने पाकिस्तानला दिलेली मदत पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटनाना देत असल्याचे पाकिस्तानचे माजी अध्यक्षानी जाहीर केले आहे.त्यापासुन ओबामाना जास्त भिती वाटु लागली नाही ना? एवढी मोठी सुरक्षाव्यवस्था अभेध्य आहे याची त्याना खात्री आहे का?


3 comments:

Some Little Greens said...

its not un-trust or something. But no country will rely on any other country's security system when it comes to high level profiles like president.

..राहुल टकले said...

Tynachi suraksha vyavastha bhedali jau shakte he siddh karayala changla chance aahe,
aaplya deshache nav kharab hoil nahitar...

VishWaaS- KoYoTe said...

true said ... when any POTUS(president of the united states)
goes to any country...he is always preotected by secret service agency....