Saturday, December 18, 2010

फोन टॅपिंग सरकारसाठी गरजेचे.

सध्या 'फोन टॅपिंग' हा एक राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे.काही वर्षापासुन फोन टॅपिंगवर सरकार व विरोधक यांच्यात आरोप व प्रत्यारोप होत आहे.देशातील गुप्तचर संस्था आणि अन्य संरक्षण दले आवश्यकता भासल्यास कायदेशीर तरतूदींचे पालन करुन फोन टॅपिंग करतात.फोन टँपिंगला खासदार,आमदार व कॉपोर्रेट जगतातील लोकाचा कायम विरोध आहे.पण सरकारला त्यांची गुपिते माहीती होण्यासाठी फोन टँपिंग करावेच लागते.ह्या मडंळी सामाजिक कामे करीत असतील तर फोनदेशहितासाठी तसेच भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी फोन टॅपिंगही महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग ह्ल्लीच स्पष्ट केले आहे.    राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता     फोन टॅपिंग      सरकारसाठी गरजेचे आहे.  मात्र, या अधिकारांचा गैरवापर होणार नाही,याची खात्री बाळगली जाइल. टॅप संभाषण सरकारकडेच सुरक्षित राहील ते मीडियाकडे जाणार नाही याची खात्री सरकार घेणार आहे.आधुनिक फोन टॅपिंग तंत्रज्ञानाच्या अनिर्बंध वापरावर खिळ लावण्यासाठी आणि नागरिकांच्या खासगी आयुष्याचे रक्षण करण्यासाठी आता स्वतंत्र कायद्याची आवश्यकताही त्यांनी बोलली जात आहे.
टँपिंगची भिती का वाटते? ह्यांचे मेल हँक होतात व फोन टँपिंग होत असल्याने ही मडंळी नविन पर्याय शोधत आहेत.
राष्ट्रहितासाठी अपवादात्मक परिस्थितीत फोन टॅपिंगचे अधिकार सरकारला आहेत,पण त्यासाठी काटेकोर पद्धत आखून देण्यात आली आहे. तरीही विरोधकच नव्हेत,पक्षांतर्गत स्पर्धकांवरही नजर ठेवण्यासाठी फोन टॅपिंगचा गैरवापर सत्ताधा-यांकडून केला जातो,हे उघडे गुपित आहे.त्याचे पुरावे मिळाल्यास,सत्ता गमावावी लागण्याची उदाहरणेही घडली आहेत.माहितीच्या अधिकाराखाली एखाद्या प्रकरणात फोन टॅपिंगची माहिती मागितली तरी ती देण्यास सरकार बंधनकारक नाही असे कोर्टाने जाहीर केले आहे.
अधिकाराचा गैरफायदा, भ्रष्टाचार यासारख्या देशविघातक कारवायांवर नजर ठेवण्यासाठी कॉपोर्रेट जगतात फोन टॅप होण्याचे प्रकार घडतात व त्याची गरजही आहे.

No comments: