Sunday, December 26, 2010

'जन गण मन' राष्ट्रगीताची शताब्दी

कोलकत्यातील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी सर्वप्रथम हे गीत गायिले गेले.सन १९०५ मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. देशव्यापी आंदोलनानंतर १२ डिसेंबर १९११ रोजी दिल्लीत भरलेल्या दरबारात ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज यांनी फाळणी रद्द केली. याच महिन्यात २६ व २७ तारखेला भरणा-या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात रवींदनाथांनी रचलेले हे 'जन गण मन'गीत गायिले गेले.स्वातंत्र्यानंतर घटनासमिती स्थापन झाली आणि अनेक बुद्धिमंतांनी चर्चा केल्यानंतर गुरुदेव रवींदनाथ टागोर यांच्या  'जन गण मन' ची 'राष्ट्रगीत' म्हणून घोषणा झाली.भारतभूमीच्या सार्वभौमिकतेचे , विविधतेचे आणि एकतेचे गुणगान करणा-या गीताला तितकाच श्रेष्ठ असा सूरसाज देणारे संगीतकार स्वातंत्रसैनिक रामसिंग ठाकूर होते.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघ्या भारतवर्षाला एका सूत्रात बांधून ठेवणा-या काही गोष्टींमध्ये 'जन गण मन'चा समावेश आहे.या गीताची शताब्दी २७ डिसेंबर २०१० पासुन सुरू होत आहे.राष्ट्रगीत हे देशाचे गर्वगीत असते, राष्ट्रीय अस्मितेचे यशोगान असते, देशभक्तीची आरती असते. भारताच्या 'जन, गण, मन...' या राष्ट्रगीतातही ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. देशाची एकात्मता अधोरेखित करण्यासाठी त्याच्या विविधतेचे वर्णन करताना विविध प्रांतांची नावे या गीतात गुंफण्यात आलेली आहेत.

कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत हा त्या देशाचा मानबिंदू असतो. त्या राष्ट्रगीतातून देशाची संस्कृती, परंपरा, इतिहास आणि वर्तमान यांचे दर्शन होत असते. अत्यंत कमी शब्दांत आणि मोजक्‍या तपशीलात देशाचे वर्णन करणा-या, देशाची अस्मिता जागविणा-या गीताला "राष्ट्रगीत' म्हणून मानाचे स्थान मिळते. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार आज आपले राष्ट्रगीत असणा-या कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या "जन गण मन' या राष्ट्रगीताच्या रचनेला 99 वर्ष पूर्ण होऊन शंभरावे वर्षे लागत आहे.

राष्ट्रगीताच्या गायनाने राष्ट्रप्रेमाची, राष्ट्र भक्तीची प्रेरणा, स्फूर्ती प्रत्येक नागरिकाला मिळल्याने राष्ट्रगीताचा आपण मान राखला पाहीजे.


राष्ट्र्गीत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करणे.
http://www.youtube.com/watch?v=hee_lhwlpns&feature=player_detailpage












1 comment:

मराठीग्रिटींग्ज.नेट said...

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!