Saturday, April 23, 2011

'कॅप्टन फॅन्टास्टिक'

भारताला क्रिकेट खेळातले दोन स्पर्धेत विजेतेपद मिळवून देत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग ढोणी ने भारतीयांचे स्वप्न साकार केले.सर्वानी थरातुन ढोणीची वाहवा झाली.सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्डकप जिंकायचाय ही भारतीय संघाची भूमिका खरी केली आहे.


भारतीयांचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकार करणारा ‘ कॅप्टन कूल ’ महेंद्रसिंग ढोणी आणि विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकर या जोडगोळीला प्रतिष्ठेच्या ‘ सुखोई ’ ची सैर घडविण्यात येणार आहे.ही सैर आतापर्यत फक्त राष्ट्रपतीनीच केली आहे.

‘ मी आत्तापर्यंत अनेक कर्णधारांसोबत खेळलोय , त्यात ढोणी सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे. ढोणी इज द बेस्ट! ’, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कॅप्टन कूल महेंद्रसिंग ढोणीला शाबासकी दिली आहे.

   
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याने 'टाइम' नियतकालिकात जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळविले आहे. ढोणीला फुटबॉल स्टार लिओनेल मेसी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा वरचे स्थान मिळाले आहे.या १०० खेळाडूंमध्ये ढोणी ५२व्या क्रमांकावर आहे. या यादीत भारतीयांमध्ये ढोणी अग्रस्थानी असून ढोणीच्या रूपात भारताचा एकमेव खेळाडू आहे. २९ वषीर्य ढोणीने भारताला तब्बल २८ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकून दिला. त्याने ५४ कसोटीत २९२५ धावा केल्या असून १८६ वनडेत त्याने ६०४९ धावा जमविल्या आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने टी-२०चा र्वल्डकपही जिंकला होता.या नियतकालिकाने ढोणीला 'कॅप्टन फॅन्टास्टिक' अशी उपमा दिली आहे.


भरपूर आत्मविश्वास आणि कायम पाय जमिनीवरच ठेवण्याची त्याची शांत राहण्याची वृत्तीने तो सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.तो अत्यंत चतूर,चाणाक्ष आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. अत्यंत शांत डोक्यानं तो विचार करतो,प्रत्येकाचं मत ऐकून घेतो,सीनिअर्सची विचारविनिमय करतो आणि परिस्थिती पाहून निर्णय घेतो.कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणा-या ढोणीकडे नेतृत्व करण्याचे कौशल्य आहे.या कौशल्यामुळेच टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्यात आणि वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात तो
यशस्वी झाला. 
 

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंगचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याचा सर्वाधिक रकमेचा म्हणजे ३४ कोटी रूपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. क्रिकेट जगतात ढोणी हा सर्वाधिक श्रीमंत खेळाडू आहे असे सांगितले जाते. गेल्या वर्षी ढोणीच्या विम्याची रक्कम अवघी दहा कोटी रूपये होती. यावरून ढोणी हा किती मौल्यवान खेळाडू आहे हे दिसते असे विमा कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले. ह्या विम्याचा हप्ताच १६ लाख रूपये आहे

ढोणीच्या नेतृत्वामधली प्रयोगशीलता, नाविन्य आणि जोखीम घेण्याची वृत्ती हे गुण अनेकांना भावले आहेत. त्यातून त्याची संघाला हाताळण्याची एक शैली दिसून येते, असे मत व्यक्त होत आहे. ढोणी लक्ष्य निश्चित करतो आणि संघाकडून उत्तम कामगिरी करून घेऊन, ठोस पावले उचलून ते साध्य करतो,यामुळेच विविध क्षेत्रांतील नेतृत्वाला मॅनेजमेंटचे धडे देणारे आहे.

ढोणी हल्ली करोडो रुपयांच्या जाहिराती करीत आहे.मार्केटमघ्ये ब्रँन्ड व्हँल्यु वाढत आहे.ढोणीचा आलेख उंचावत आहे 

महेंद्रसिंग ढोणी ने विश्वचषक जिकंल्यानतंर बालाजीसाठी केस कापले हि देखील मोठी बातमी होती.

वरच्या सर्व घटना महेंद्रसिंग ढोणीच्या संदर्भात घडल्या आहे.तो ग्रेट आहे.

No comments: