काही दिवसापूर्वी छटपूजेच्या निमित्ताने काँग्रेसचे खा. संजय निरुपम,कृपाशंकर सिंह तसेच राजहंस सिंह मंगळवारी एकत्र आले होते.यावेळी उत्तर भारतीयांसमोर भाषण करताना कृपाशंकर सिंह यांनी संजय निरुपम यांनी मुबंईबद्द्ल काही वक्तव्य केले होते.उत्तर भारतीयांनी मनात आणले तर ते कधीही मुंबई बंद पाडू शकतात यावर तिघांचे एकमत होते. ‘ मुंबई हमरे बापकी है, यहाँ छाती ठोक के रहेंगे, कोई मारपीट करेगा तो वन बाय वन निपट लेंगे ’ अशा शब्दात समाजवादी नेता अबू आझमी याने शिवसेना आणि मनसेला उघड आव्हान दिले आहे. उद्धव आणि राजचे नाव न घेता हिंमत असेल तर बिहारच्या रस्त्यांवरुन फिरुन दाखवा. उत्तर प्रदेशमध्ये येऊन दाखवा. आम्ही जसे युपी-बिहारमध्ये राहतो तसेच मुंबईतही राहणार, असे वक्तव्य अबू आझमी याने केले. याआधी निरुपम यांनी उद्धव, राज आणि आदित्य या ठाकरे कुटुंबातील सदस्यांना संरक्षणाशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर फिरुन दाखवा, असे आव्हान दिले होते. मी मुंबई बंद करण्याची भाषा कधीच केलेली नाही. फक्त असंख्य उत्तर भारतीय मुंबईचाच एक भाग असल्याचे सांगितले. उत्तर भारतीयांनी काम बंद केले तर मुंबई बंद पडेल असे त्यानी नतंर सवरासावर केली.
राज ठाकरे म्हणाले,'संजय निरुपमला मोठं करू नका' हे मी फार पूर्वीपासून शिवसेनेला सांगत होतो. दोपहरका सामना ’ हे वृत्तपत्र कशाला सुरु केलं? हिंदी भाषिकांची मते मिळविण्यासाठी? संजय निरुपम हा एकेकाळी शिवसैनिक होता. त्याला शिवसेनेनंच पहिल्यांदा खासदार करून मोठं केले आहे. संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय नेत्यांनी वेडीवाकडे विधाने थांबविली नाहीत तर महाराष्ट्रात दंगली पेटतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
उद्धव,राज या दोघा नेत्यानी एकत्र येऊन मुबंईत अशी दहशत निर्माण करावी की कोणाताही नेता मुबंईबद्द्ल एकही शब्द काढला नाही पाहिजे.उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे,ही मुबंईकरांची व विषेशात: मराठीजणांची इच्छा आहे. दोन शत्रू एकत्र येऊ शकतात, तसेच एकमेकांचे शत्रू असलेले दोन राजकीय पक्षही एकत्र येऊ शकतात. उद्धव आणि राज यांचे रक्ताचे नाते असून एकमेकांना फोन करण्याइतपतचे संबंध आजही या दोघांमध्ये आहेत. या दोघांच्या वैरामुळे ही उत्तर भारतीय नेत्याना बळ आले आहे.मराठी सत्ता हाती घेण्य़ासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. नाही तर ही उत्तर भारतीय मडंळी डोईजड होणार.त्याना काँग्रेसचा पाठींबा कायम असणार आहे. उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ मतभेदामुळे वेगवेगळे झाले असून त्याना दुहीचा शाप म्हणता येणार आहे. दोघेही आपापल्या परीने पक्षाचे काम करत असून मराठी माणसाची सत्ता आणणे हेच या दोघांचे एकमेव ध्येय असावे.मराठी माणसांमध्ये एकजूट नाही.या दोघानी ती जर दाखवली तर सत्ता लांब नाही.
दोघांनी जुने हेवेदावे विसरुन एकत्र आल्यास मुबंईत मराठी जणांचे राज्य येऊ शकते.काँग्रेसने त्याना कितीही पाठिंबा दिला तरीही काहीच फरक पडणार नाही.मराठी भवितव्य या दोघांच्या हाती आहे.
1 comment:
marathi la duhicha shaap aahe .. he parat siddha hoat aahe .. "Marathe zale youwan bhakt.. maratyanchya talwarivar maryathanche rakat"
kiwa jyala English madhye mhantaat .. Ego works or business works .. ya donhi Thakare bandhuncha EGO maharashtra peksha motha aahe .. hech aapale durdaiv ..aani Sharad pawarana fakt Lavasa chich kalaji .. nahitar mag Sambhaji aani JIjawu B grade ...
Post a Comment