Sunday, January 15, 2012

तिहारमघ्ये कैद्यांना जागा नाही.

टेलिकॉम कंपन्यांचे उद्योगपती, माजी मंत्री, खासदार अशा अनेक नामवंतांनी सध्या तिहार तुरुंग भरला आहे. वातावरणात विचित्र विषाद ठायीठायी भरलेला आहे. राष्ट्रकुल खेळांचे पदाधिकारी ललित भानोत, व्ही. के. वर्मांसारखे जुने सवंगडी सुरेश कलमाडींच्या सोबत आहेत. अन्य काही घोटाळेबाज राजकारणी तसेच उद्योगपती असे १९ व्हीआयपी कैदी सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत .

व्हीआयपी कैद्यांमुळे चर्चेत असलेल्या तिहार तुरुंगातील कैद्यांची संख्या आता क्षमतेपेक्षा दुप्पट झाली आहे . दक्षिण आशियातील सर्वात मोठा अशी ख्याती असलेल्या या तुरुंगातील कैद्यांची संख्या १२ हजारांवर पोहचली आहे . प्रत्यक्षात तिहारची एकावेळी ६,२५० कैदी एवढीच क्षमता आहे .

देशात गैरव्यवहार वाढले आहेत.गुन्हे वाढले आहेत.छोट्या गुन्ह्यांसह मोठेही गुन्हे जास्त वाढत आहेत.त्या गुन्ह्यातले दोषीना कैद ही शिक्षा होत आहे तुरुंग कमी पडत आहेत.काय देशाची परिस्थिती आहेत. या तुरुंगात मंत्रीही शिक्षा भोगत  आहेत.


माजी मंत्री राजा, टिम कलमाडीचे राष्ट्रकुल खेळाडू, शाहिद बलवांसह टेलिकॉम कंपन्यांचे सीईओ असलेले पाच दिग्गज, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा, तंदूर हत्याकांडातले सुशील शर्मा, जेसिका लाल खटल्यातले मनु शर्मा, शिवानी भटनागर खून प्रकरणातले आर. के. शर्मा, असे अनेकजण अगोदरच इथे होते. त्यात कनिमोळी आणि शरद कुमारांची नव्याने भर पडली आहे. नेते आणि उद्योगपती यांचे नवे तारांगणच तिहारमधे अवतरले आहे. व्हीआयपी कैद्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची सर्वांनाच चिंता आहे.

या कैद्यांसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानाही भ्रष्टाचार विरोधात आंदोलन केल्याने या तुरुंगात चार दिवस ठेवले होते.तेव्हा पासुन हा तुरुंगा जास्त प्रसिध्द झाला आहे.

यातील सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काँगेस नेत्यांमुळे तिहार जेल भरला आहे. बाकीची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आल्यास तिहार जेलचे नाव 'काँगेस भवन' होईल की काय?  

कोर्टांत प्रलंबित खटले, तपासातील विलंब आणि वाढती गुन्हेगारी या गोष्टींनी देशातील १३७५ तुरुंगांत जवळपास ४ लाख कैदी अक्षरश: कोंबले गेल्याचे चित्र आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या या आकडेवारीमुळे केंद्रीय गृहखातेही चिंतेत पडले असून यामागील नेमक्या कारणांचा शोध घेतानाच त्यावरील उपाययोजनांचा अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, तीन लाख कैद्यांची क्षमता असलेल्या १३७५ तुरुंगात जवळपास चार लाख कैदी सध्या कैद आहेत.या सगळ्या आकड्यांमुळे चिंतेत सापडलेल्या केंदीय गृहखात्याने पोलिस संशोधन व विकास विभागामार्फत अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, तुरुंगांतील सध्याची परिस्थिती, क्षमतेपेक्षा अधिक कैदी असण्याची कारणे शोधली जातील, तसेच हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर स्वरुपाच्या उपाययोजनांबाबतही निर्णय घेण्यात येईल.

देशांतील कोर्टांत प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे कैद्यांचे प्रमाण वाढल्याचे म्हटले जात असले तरी तिहार तुरुंगाला वेगळाच अनुभव येत आहे. तिहारमधील कैद्यांचे खटले लवकर निकालात काढण्यासाठी कारागृहाच्या आवारात १२७ विशेष कोर्ट उभारण्यात आली. या कोर्टांतून ५१५० खटले निकाली काढल्यानंतरही कैद्यांची संख्या वाढतच असल्याचे तिहार तुरुंगातील अधिका-यांचे म्हणणे आहे.

वाढत्या गुन्हेगारी व भ्रष्टाचारामुळे  सरकारला तिहार तुरुंगासारखा नवीन तुरुंग बांधावा लागेल.

No comments: