Thursday, February 23, 2012

काँपी

  शालेयजीवनात 'काँपी' ह्या शब्दाची ओळख होते.तेथेच'काँपी'हा शब्द वापरायला सुरुवात होते.    नकल हा मराठी शब्द आहे तरीही काँपी हा शब्द व्यवहारात जास्त वापरला जातो.   विद्यार्थी परिक्षेत काँपी करतात तो गुन्हा होतो.पण अभ्यास करताना खुप गोष्टी काँपी केल्या जातात.  विद्यार्थी शिक्षकांची नकल करतात.   झेरॉक्स मशिनमुळे दाखल्याच्या नकल काढणे सोयीचे झाले आहे.पुर्वी कार्बन पेपरचा  वापर काँपी काढण्यासाठी केला जायचा. 

संगणक क्षेत्रात 'काँपी' ही महत्वाची संज्ञा ,सारखी वापरली जाते.डेटा एका फाईल मघुन काँपी करुन दुस-या फाईलमघ्ये पेस्ट करुन घेता येतो.काँपी ही सोय नसती तर कामे खुप वाढ्ली असती म्हणुनच ही सोय खुप गरजेची आहे.हे काँपी करण्याचे काम संगणकाच्या माउस किंवा बटनाच्या सहाय्याने काही क्षणात करता येते.'काँपी-पेस्ट' हे नेहमीचेच काम असते व ते करावेच लागते.संगणकात काँपी बिनधास्त करता येते पण विद्यार्थी परिक्षेत काँपी करतात तो गुन्हा होतो.  
लहान मुले व्यक्ती वा प्राण्याची हुबेहुब नकल वठवतात.नकलाकार नकल करीत टाळ्या घेतात. 
 काही काही वेळेस फेसबुक वरील माझे स्टेटस आवडतात त्या वेळेस ते माझ्याकडे ते त्यांच्या भीँतीवर काँपी करण्याची परवानगी मागतात अन काँपी करतात ते सुद्धा माझ्या नावाशिवाय काँपी करतात आणि नंतर विचारतात तुम्हाला राग तर आला नाही ना?

आपण नवीन पिढीतल्या काही संगीतकारांना म्हणतो अरे काय चाली चोरतात ...सेम गाणी काँपी करतात.

काँपी करायला तसे सोपे नसते.असे काँपी करणारे बहादरांचे म्हणणे आहे.मोठी जबाबदारीचे व धाडसाचे काम असते.

पकडला तर शिक्षेस पात्र झाला पण काँपी करण्यात यशस्वी झाला तर त्याच्या कामात फत्ते झाले.हेच काँपी करणारे मग काँपी पारंगत होतात.काँपी करण्याच्या नविन शक्कल काढली जाते.

प्रत्येक जण आयुष्यात नेहमीच कोणत्यातरी गोष्टीची काँपी करीत असतो.अनुकरण करण्या-यालाही काँपी करणे म्हणतात.  

जसे त्या तसे उतरवणे म्हणजेच काँपी. माणसाला नक्कल करणे आवडते.

परदेशातून प्रसिद्ध होणाऱ्या मेडिकल सायन्सच्या पुस्तकांची नक्कल करून त्यांची विक्री करणा-या टोळी कार्यरत  आहेत. देशद्रोह्यांच्या सहकार्यामुळेच पाकिस्तानने भारतीय नोटांच्या साच्यांची नक्कल तयार केली आणि मोठ्या प्रमाणावर बनावट भारतीय नोटा छापल्या जातात.जाहिरातींची काँपी होत असते.  स्वाक्षरीची नकल करुन बँकात चो-या होतात.







No comments: