Thursday, April 19, 2012

राष्ट्रगीताचा ध्यास

शिव थापाने लंडन ऑलिम्पिक मधील प्रवेश निश्चित करण्यासाठी परवाच आशियाई ऑलिम्पिकपूर्व स्पर्धेची फायनल जिंकली तरीही त्याचे एवढ्यावरच समाधान होणार नव्हते.१८ वर्षीय शिव थापाचे वेगेळेच स्वप्न होते.त्याला भारत देशाचे राष्ट्रगीत भरलेल्या सभागृहात ऐकायचे होते.याचे त्याला उत्सुकता लागून राहीली होती.राष्ट्रगीताचा ध्यास घेतला होता.पोडियमवर सर्वात उंचावर उभे राहण्याचा मान सुवर्णपदक विजेत्याला मिळतो.

सुवर्णपदक पटकावणा-या खेळाडूच्या देशाचे राष्ट्रगीत मैदानात लावण्यात येते.म्हणुनच त्याने सुवर्णपदकाचे ध्येय ठेवले होते.त्याने सुवर्णपदक मिळविल्यानतंर पदकप्रदान सोहळ्यात राष्ट्रगीत ऐकले.

आपले राष्ट्रगीत हे देशाचे गर्वगीत असते, राष्ट्रीय अस्मितेचे यशोगान असते, देशभक्तीची आरती असते. भारताच्या 'जन, गण, मन...' या राष्ट्रगीतातही ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. देशाची एकात्मता अधोरेखित करण्यासाठी त्याच्या विविधतेचे वर्णन करताना विविध प्रांतांची नावे या गीतात गुंफण्यात आली आहेत.


ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करणा-या असामच्या १८ वर्षांचा बॉक्सरने केवढी मोठी महत्वकाक्षा ठेवली होती.आपल्या राष्ट्रगीताचा मान राखणे हे सर्वानी जपले पाहिजे.जगातील देशांसमोर आपल्या देशाचा मान उंचावयाचा त्याचा मानस योग्य वाटला.शिव थापा प्रमाणे प्रत्येक भारतीयांनी राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी प्रयत्न केला  पाहिजेत.हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.आपले राष्ट्रगीत ऐकताना प्रत्येक भारतीयाला आनंद वाटतोच. 


राष्ट्रगीतावरचे प्रेम म्हणजे राष्ट्रावर प्रेम.राष्ट्रावरील प्रेमानेच शिव थापा राष्ट्रगीतासाठी लढला.आताचे नेते व पुढा-यांना असे राष्ट्रावर प्रेम आहे का? याबद्द्ल शंका आहे.या मडंळीने आपला देशातला पैसा परदेशात लपविला आहे.रोज नवीन घोटाळे उघकीस येत आहेत.राजकारण करीत स्वत:ची मालमत्ता वाढवत आहेत.असे यांचे राष्ट्रप्रेम? या मडंळीने या युवा खेळांडुकडून राष्ट्रावर कसे प्रेम करायचे ते शिकले पाहिजे.


राष्ट्रावर प्रेम करणा-या शिव थापाने लंडन आँलिम्पिकमघ्ये सुवर्णपदक मिळावावे,ही इच्छा. 

No comments: