Saturday, May 12, 2012

मातृदिनापासुन आईचे नाव लावा.

            !!       जगातील प्रत्येक मातेस जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा         !!

    मे महिन्याचा दुसरा रविवार हा भारतामध्ये मातृदिन म्हणुन साजरा केला जातो.फक्त एक दिवस आईसाठी देतो म्हणून हा दिवस साजरा करतो ....हा समज पूर्णपणे चुकीचा आहे,आयुष्याचा प्रत्येक दिवस हा तिचाच असतो पण एक खास दिवस ....मातृदिन 


        या मातृदिनापासुन आपल्या नावात जन्मदाती आईचे नाव वापरण्यास सुरुवात करावी.
        
         
         "  एकदा जरासं कुठे खरचटलो
               आई, किती तू कळवळली होतीस
                  एक धपाटा घालून पाठीत
                      जख्मेवर फुंकर घातली होतीस

               जख्मं ती पुर्ण बुजली आता
                  हरवून गेली त्यावरची खपली
                      तो धपाटा, ती फुंकर, ती माया
                          ती हरेक आठवण मनात जपली "


                                                                                                               खरोखर आई हा शब्द किती महान आहे. या हाकेत जितकी गोडी,  वात्सल्यता, प्रेम आहे तितके अन्य कशातच नाही. आई असेल तर  जगात सर्वकाही सुख आहे. आई या शब्दातच ममता भरली आहे. 



   भारतात नावाचा असा कोणताही कायदा नाही.कोणी कसे नाव लावावे हे सांगणारा कायदा भारतात नाही.
   कायदा होईल तेव्हा होईल पण आपण प्रत्येकाने आईचे नाव आपल्या नावात वापरण्यास सुरुवात करावी.
   व आईचा सन्मान करावा.पालक म्हणून आईचे नाव वडिलांच्या नावासोबत लावण्यास सुरुवात करावी.


वैविध्याने नटलेल्या भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांत नावांतही विविधता आढळते . उत्तर भारतात मुलं वडिलांचे नाव लावतच नाहीत . खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावात वडिलांचे नाव नाही . केवळ महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत प्रामुख्याने वडिलांचे नाव लावण्याची पद्घत आहे.

             छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव    :   शिवाजीराजे जिजाबाई शहाजीराजे भोसले.




                                !!   स्वामी तिन्ही जागांचा आई विना भिकारी    !!

No comments: