Friday, May 18, 2012

राजा ला दिलेला मान

जगातील मोठ्या घोट्याळ्यांपैकी दोन नबंरच्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना पंधरा महिन्यांनंतर पहिल्यांदाच मोकळे आकाश दिसले म्हणून जो आनंद झाला असेल,त्याहीपेक्षा त्यांच्या सुटकेने त्यांच्या अनुयायांना झालेला हर्षवायू अधिक केविलवाणा होता.काल वृतपत्रातून ए.राजा याना ओवाळल्याचा फोटो प्रसिध्द  झाला आहे.जसे काय हे मोठी लढाई जिंकून आल्याने त्याची ओवाळणी केली वाटते.जामिनावर सुटुन आलेल्या व्यक्तीला एकढा मान कसा मिळतो?तिहार कारागृहातून सुटका झाल्याच्या दुस-याच दिवशी "टू जी स्पेक्‍ट्रम'गैरव्यवहार प्रकरणातील माजी दूरसंचारमंत्री ए.राजा संसदेमध्ये परतले.शक्तिप्रदर्शनाचा हेतू ठेवूनच राजा यांच्या सुटकेनंतर त्यांच्या अनुयायांनी जल्लोष व दिवाळी साजरी केली.या पुढा-याला लाज नाही पण या अनुयायांनाही नाही.ह्या गोष्टी नेत्याना शोभतात का?
कि या गोष्टीने यांची शोभा वाढत आहे.

आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची रांगडी पद्धत समाजात नव्याने रुजत आहे.जगात आपण एकटेच निर्दोष असल्याचा आविर्भाव चेह-यावर ठेवण्याएवढा निबरपणा पुढा-यांमध्ये येऊ लागला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इतके दिवस तुरुंगात असलेल्या व्यक्तीला परत समाजात येताना एखाद्या राजासारखी वागणूक मिळणे,ही भारतीय समाजाची आधुनिक काळातील मानसिकता झालेली आहे.

आपल्या न्यायव्यवस्थेत आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही गुन्हेगार नसतो तसेच आरोपीही गुन्हेगार नसतो,या न्यायाने आरोपी निर्दोष असतो,असेही सिद्ध होत नसते.स्वत:पाप न करणारे पण पापी व्यक्तीला पाठीशी घालणारे लोकच जास्त असतात.

जर एखाद्या व्यक्तीने तीन दिवसापेक्षा जास्त दिवस तुरुंगवास भोगला असेल तर तो सरकारी नोकरीसाठी पात्र असत नाही. मग या खासदार लोकासाठी काय? कायदा असे लोक बनवतात व समंत करतात. किती दुर्देव आहे या देशाचे आता कुठे गेली संसदेची प्रतिष्ठा ? १ लाख ७० हजार करोड साठी फक्त १ वर्षाची सजा मग या हिशोबाने छोटे चोर दरोडेखोर यांना तर सजा वायालाच नाही पाहिजे आपल्या देशात.खरच किती शरमेची बाब आहे राजा,कलमाडी,मधु, यांचा सारखे लोक उजळ माथ्याने फिरतात,संसदेत जातात अभिमानाने आपण त्यांचे काहीच करू शकत नाही.

राजकारणी बदलत आहेत याला कारण सगळेच राजकारणी कोणत्यातरी घोटाळ्यात गुंतलेले आहेत.त्यामुळे त्याना यात नवीन वाटत नाही.उलट मोठे घोटाळे करणा-या पुढा-याला त्यांच्यात मोठा मान असतो.असे हे नेते देशाला कोणत्या दिशेने नेत आहेत.

No comments: