Saturday, February 9, 2013

सरकारचा व नेत्यांचा दिखाऊपणा



नवी देशव्यापी योजना १८ वर्षांपर्यंतच्या २७ कोटी मुलांना आरोग्याची हमी देत आहे.मुलांना होणाऱ्या ३० आजारांची काळजी या योजनेत घेतली जाईल.देशातल्या प्रत्येक मुलाची वर्षातून दोनदा सखोल आरोग्य तपासणी होईल. सोनियांनी या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी पालघर निवडण्याचे कारण महाराष्ट्राने ग्रामीण आरोग्यात मारलेली मजल, असे सांगितले जाते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी मोखाडा, जव्हार आणि मेळघाट या परिसरांत बालमृत्यू कमी झाल्याचे आवर्जून सांगितले. सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे कौतुक करताना इतर राज्यांनी याचे अनुकरण करावे, असाही सल्ला दिला. पण बालमृत्यूंबाबत महाराष्ट्राची कामगिरी खरोखरच देदीप्यमान आहे का, हे सोनिया गांधी यांनी डॉ. अभय बंग यांनी काही वर्षांपूर्वी सादर केलेला ' कोवळी पानगळ ' हा विस्तृत अहवाल डोळ्याखालून घातला असता, तर सहज कळले असते. हि एक बातमी.

पंतप्रधान,राष्ट्रपती व पक्षाचे अध्यक्ष याना योजनांचे उदधाटन करण्यास बोलवताना चांगल्या जागा शोधुन तेथे या  प्रतिष्ठाना तो सभारंभ साजरा करुन राज्य सरकार पाठ थोपटून घेतात.ज्या ठिकाणांतून चांगल्या गोष्टी दाखवल्या जाऊ शकतात व आपल्याला शेरे न मिळता शाबासकी मिळेल अशी ठिकाणे शोधली जातात.तेथील खरी बाजु लपवून  खोट्या बनवल्या जातात.


याच्या विरुध्द सरकार दुष्काळ किंवा अनाचक आलेल्या नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यास आलेल्या जेष्ट नेत्याना  जास्तीत जास्त वाईट गोष्टी दाखवून जास्तीत जास्त निधी व मदत पदरात पाडून घेतली  जाते.नुकसान व मनुष्यहानीची संख्या फुगवून दाखवली जाते.मोठ्या प्रमाणावर उपासमार,बहुसंख्य लोकांची कृशता व क्षीणता आणि लोकसंख्येच्या मृत्युमानात मोठ्या प्रमाणावर वृद्धी दाखवली जाते.मोठ्या पँकेजच्या अपेक्षने या गोष्टी सर्व राज्यातून केल्या जातात.

 असल्या खोट्या गोष्टीची माहीती दौ-यावर आलेल्याना व आयोजित केलेल्याना दोघानाही माहिती असते.आश्वासनांची खैरात होते.आश्वासनांतले सर्वच मिळत नाही याची कल्प्ना राज्य सरकारना असते.नेत्यांना काही दिवसात आश्वासनांचा विसर पडतो.दोन्हीकडून हा दिखाऊपणा केला जातो. या सर्व दिखाऊपणात मतांचे मोठे राजकारण लपलेले असते. 


राज्याच्या दुष्काळी भागात नेतेमडंळीचे पर्यटन दौरे मतांसाठी सुरु झाले आहेत.काय निष्पण होणार माहीत नाही पण दौ-यांत नेत्यांचा दिखाऊपण दिसत राहणार.
 

No comments: