Wednesday, March 6, 2013

स्कार्फ नको.



  हल्ली मुली सर्रास स्कार्फ वापरत आहेत.काही मुली फँशन तर काही धूळ , धूर आणि उन्हापासून बचावासाठी व मित्रांपासून लपण्यासाठी मुली चेहऱ्यावर स्कार्फ बांधतात. मुली चेहऱ्यावर स्कार्फ बांधतात त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते. बगिच्यांमध्ये किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स,मॉलमध्ये फिरताना स्कार्फ कशाला? मुलींनी सार्वजनिक ठिकाणी स्कार्फ न वापरण्याचे आवाहन राज्यातील काही शहरातील पोलिसांनी केले आहे . 



   थंडीपासून संरक्षण म्हणून तरुणाईने गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळण्यास सुरुवात केली. मुलींबरोबरच मुलंही यात मागे नाहीत.थंडी कमी होऊ लागली तरी स्कार्फ मात्र जाण्याचं नाव घेत नाहीये.हवा तापायला लागल्यावर स्कार्फ थोडे सैल झालेत. पण स्टाइल म्हणून आवडू लागलेले स्कार्फ उन्हाळ्यातही त्यांच्या गळ्याला असेच घट्ट बिलगून राहतील असं दिसतंय.

कॉलेजची तमाम तरूणाई ही 'एक्स्ट्रा अॅक्सेसरी' कॅरी करत आहेत. कुठल्याही टी-शर्ट, कुतीर्, शर्ट किंवा अगदी ओढणीवाल्या पंजाबी ड्रेसवरही मुली आपल्याकडेचे वेगवगेळे स्कार्फ ट्राय करत राहतात.या स्कार्फचा मुलींना मात्र दुहेरी उपयोग करता येतो असं आढळतं.बाईकवर बॉयफ्रेण्डसोबत फिरताना डोक्याला स्कार्फ घट्ट गुंडाळला की कुणीही बाजूने गेलं तरी ओळखायचे नाहीत हे या मुलींनी पक्क ताडलंय. बाइकवरच्या लाँग ड्राइव्हला तर स्कार्फ पाहिजेच, पण गजबजलेल्या ट्रेनमध्येही सध्या मुली स्कार्फ गुंडाळून बसतात.नुसता स्कार्फच नाही तर, डोळ्यांवर भलाथोरला गॉगलही लावून ठेवलेला असतो. उन्हातून ट्रेनमध्ये येऊन विसावल्यावरही त्यांना स्कार्फ काढायचा नसतो. 

     एरवी फॅशन म्हणून इन असलेला स्कार्फ आता यूथचा गरजेचा ट्रेण्ड झालाय.






      स्कार्फ घालत असाल तर गळ्यात इतर कुठले दागिने नाही घातले तरी चालतात.हा एक स्कार्फचा फायदा आहे.आमची संस्कृती बुरखा (स्कार्फ)धारण करायची नाही तर डोक़्यावर पदर घेण्याची आहे. परंतू आता डोक्यावरच्या  पदराची जागा स्कार्फने घेतली आहे ही निंदनीय बाब आहे.


    एखादं मस्त गिफ्ट द्यायचं असेल तर एखादा मस्त स्कार्फ खरेदी केले जाते. म्हणजे पेस्टल शेड, सिल्क, कॉटन अशा गोष्टींचा जरा विचार करून खरेदी करता येते.

   स्कार्फ हे फॅशन स्टेटमेण्ट बनलंय. जीन्स आणि कुतीर्जवर स्कार्फ गुडाळणे सगळ्यांनाच पसंत पडते आहे. अगदी कॉलेजच्या कॅम्पसपासून फाइव्ह स्टारी ग्लॅमरस सोशालाइटपर्यंत सगळ्यांनाच स्कार्फ हे स्टायलो वाटायला लागलंय. 

     स्कार्फ बांधण्याचा फायदा जसा चांगल्या गोष्टींसाठी केला जातो. तसाच त्याचा वापर वाईट मार्गांचा अवलंब करण्यासाठीही होतो. अनेकदा कुटुंबीयांच्या डोळ्यात धूळ झोकून तरुणी अभ्यास सोडून इतरत्र फिरण्यात वेळ वाया घालवतात. यासाठीही स्कार्फचाच आधार घेतात.
   
   पण चेहरा झाकून वाहन चालविण्याचा फायदा गुन्हेगार किंवा दहशतवादी घेऊ शकतात.बॉम्बस्फोटामुळे शहरातील दुचाकीस्वारांच्या चेहऱ्यावरील स्कार्फ आणि रुमाल हटले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून महिलांनी स्कार्फ आणि पुरुषांनी रुमाल तोंडाला बांधून वाहने चालवू नयेत असे आवाहन केले गेले आहे.

 सदासर्वकाळ घरातूनच स्कार्फ परिधान करत आपली ओळख लपवणा-या महिला व मुली याच अत्याचारांच्या शिकार बनत चालल्या आहेत.


एकेकाळी स्कार्फचा वापर हिवाळ्यात कान आणि डोके झाकण्यापुरता केला जात होता. पण आता हा प्रत्येक मोसमात घातलेला पहायला मिळतो. स्कार्फ मुस्लिम महिला धार्मिक कारणामुळे घालतात, तर ख्रिश्चन स्त्रिया स्टोलच्या स्वरूपात घालतात. पायलट आणि एअरहोस्टेस यांना व्यवसायामुळे स्कार्फ घालावा लागतो. हाच स्कार्फ आता फॅशन जगतात महत्त्वपूर्ण मानला गेला आहे.

     महिलांचा वापर विघातक कारवायासाठी केला जाऊ शकतो. स्कार्फ बांधल्याने समस्या अधिक जटिल होते. ओळख पटणे कठीण होते. त्यामुळे अनेक राज्यात स्कार्फ बांधण्यावर बंदी घातली आहे, परंतु शहरातील तरुणी त्वचेच्या संरक्षणासाठी तसेच छेडछाडीपासून बचाव व्हावा यासाठी स्कार्फ बांधून स्वत:चे संरक्षण करीत असल्याचे मत मुलींचे केले.

1 comment:

Anonymous said...

मी तुमच्या ब्लोग शी सहमत नाही...