Monday, April 8, 2013

कँम्प फायर

       शेकोटीलाच कँम्प फायर म्हणतात. दिवसभराचा   क्षीण   घालवण्यासाठी  रात्री  कँम्प फायर  व्हावेच लागते. ट्रेकला,सहलीला किंवा शिबिरात गेल्यावर कँम्प फायर मघ्ये सर्वजण सहभागी होतात.चार लाकडं गोळा करुन  ती पेटवून मस्त पैकी फायर कँम्प करु शकतो.लाकडे पेटवून त्याभोवती गोलाकार बसून जमलेल्यांबरोबर मौजमस्ती करीत घमाल केली जाते


.कँम्प फायरसाठी संपुर्ण ग्रुप एकत्र आल्यानतंर खरी मजा येते.नवी मडंळी जमली असेल तर त्याच्याशी मैत्री होतेच.ट्रेकला गेल्यावर कँम्प फायर खरी घमाल येते.दिवसभराच्या घडलेल्या घटनांचा आढावा व पूर्वी केलेल्या ट्रेकच्या घटनांची देवाणघेवाण होते.कँम्प फायरमघ्ये ज्यानी ज्यानी घमाल केली त्यानाच कँम्प फायरचे महत्व कळ्ते. 



     कँम्प फायरची सुरुवात लाकडे जमवण्य़ास पासून होते.रात्रीच्या पेटपूजेनंतर कॅम्प फायर होता.कॅम्प फायरच्या वेळी कोणी गाणी,जोक्स सांगितले,कोणी नाचून दाखवतात.सगळी टाळकी जमल्यानतंर काही नवीन टाळकी असतील तर त्याची पहीली ओळ्ख केली जाते.



सुरुवात गाण्यानी होते.ट्रेकमधली खास मराठी गाणी "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती , जयोस्तुते , जय जय महाराष्ट्र माझा" होतात.सगळी गाणी कोरस मघ्ये गायली जातात.काही टाळकी डुलकी काढायला लागली की मग गाण्य़ाच्या भेंड्या खेळल्या  जातात्त.सर्वजणाचा सहभाग असतो.न गाणारी मडंळी गायला लागतात.सगळ्याना कंठ फुटतात.वेगवेग्ळ्य़ा सुरात तालात पण जास्त बेसुरे असतात. वाजावयला एखादे वाद्य असेल तर मग कँम्प फायर मजा औरच असते.नकला,कविता,गाणी,विनोद असे मनोरंजनाचे वेगवेगळ्या प्रकार सादर केले जातात.वेळ कसा जातो ते कळत नाही.जोक्स रंगवून सांग़णारे काही विषेश असतात.






       काहीवेळा कँम्प फायरमघ्ये हैदोस घातला जातो.जुगलबंदी रगंते.काही ग्रुपमघ्ये हा कँम्प फायरमघ्ये विचारांची देवाणघेवाण होते.विचार मांडत गप्पा होतात.माहीती सांगितली जाते.एखाद्या विषयावर चर्चा रंगते.

    कँम्प फायरची खरी मजा भुताच्या गोष्टीं सुरु झाक्यावर येते.भुतांबद्द्ल आपापले अनुभव सांगातत.एकणारे शांत व थोडेसे धाबरलेले असतात.गोष्टी सांगण्यात तरबेज तो तर आवाज काढून सगळ्याना धाबरतो.आजूबाजूला काळोख असल्याने भीती वाटते.


            एका दिवसापेक्षा जास्त दिवसाचा ट्रेक असेल तर कँम्प फायर असतोच.



           कँम्प फायर मजेत करायचा.पण शेवटी झोपायला जाण्यापूर्वी शेकोटी विझवण्याचे विसरायचे नसते.







No comments: