Thursday, June 6, 2013

विसरणे

काल मी माझा मोबाईल घरी विसरलो.संर्पकाचे साधन जवळ नसल्यानतंर कोणती पंचाईत होते ते मी अनुभवले. मित्रानी शिव्या घातल्या.माझी कोणतीच कामे झाली नाहीत.

विसरण्य़ावर एक विनोद


रात्रीचे अडीच वाजलेले असतात . बायको नवऱ्याला झोपेतून गदागदा हलवून जागे करते .
    नवरा:( खडबडून )काय झालं?काय झालं ?
     बायको : अहो,काही नाही.तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात ना;आधी गोळी घ्या नि मग झोपा!





    विसरणे हा माणसाचा गुणधर्म आहे.पण जाणीवपूर्वक विसरणे ही सोय आहे.कोण कधी आणि काय आणि कसे विसरतील याचा नेम नाही.काही गोष्टी सहजासहजी विसरणे शक्य नसते. एखादी गोष्ट विसरणे ही अगदी सामान्य बाब आहे. काही गोष्टी विसरण्यासाठी आपण प्रयत्न करतो.पण त्या विसरता येत नाहीत. प्रत्येकाकडून अधूनमधून काही तरी विसरले जातेच. कधी किल्ली कुठे ठेवलीय आठवत नाही, कधी एखादा फोन नंबर आठवत नाही. कधी एखादे तोंडावर असलेले परिचयाचे नाव आठवत नाही.

धावपळीच्या आयुष्यात आपल्याकडून बर्‍याच गोष्टी विसरला जातात. या समस्येला आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सामोरे जाव लागत आहे. एखादी गोष्ट विसरण्या पाठीमागचे मुख्य कारण म्हणजे एकाग्रता कमी असणे

प्रेमी प्रेमभंगात आळवत  असतो." खुप विसरण्याचा प्रयत्न करतोय पण तिला विसरता येत नाही तिला आठवल्या शिवाय क्षण जातच नाही."

आठवण विसरणे ही निसर्गाची एक अप्रतिम देणगी असते. मनाच्या शांततेसाठी हे फार महत्याचे असते. मनुष्य ती घटना व त्याचा आशय विसरत असला, तरी म्हणतात की हे सारे त्याच्या दैवी खात्यात  नोंदविले जाते.

महत्वाच्या गोष्टी,घटना व व्यक्तीना विसरल्यास त्याचा त्रास विसरणा-याला व इतरानाही सहन करावा लागतो.ते शल्य त्याला बोचत राहते.कठीण समयी मदत करणा-याला मनुष्य बहुतेक विसरत नाही.तसाच त्रास देणा-यालाही विसरत नाही. काही आठवणी विसरता येत नाहीत.काही नाती तोडता येत नाहीत.जे विसरायला हवं ते विसरता येत नाही. जे आठवायला हवं ते आठवत नाही.

आपल्या आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी सहजासहजी कोणी विसरत नाही.पहिली शाळा,पहिली मैत्रीण,पहिली नोकरी,पहिला पगार इ.

विसरण्यावर खुप विनोद केले जातात.नाटकात कलाकार त्याचे संवाद विसरतो तेव्हा मोठी पंचाईत होते.पाठ केलेले भाषण विसरतो तेव्हाही अडचण येते.


माणुस एकादी वस्तू,काम व आठवण विसरतो.  

No comments: