Wednesday, April 20, 2011

दु:ख आणि सुख

साखरी नाटे येथील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधातील मच्छिमार आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तबरेज ठार झाला. दंडाधिका-यांनी दिल्यानंतर अखेर या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तबरेज सागवेकर (सायेकर) याचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. त्यानंतर सायंकाळी त्याच्यावर नाटे येथील दफनभूमीत शोकाकुळ परिस्थीती ग्रामस्थासह अंत्यसंस्कार झाले आणि गेल्या दोन दिवसांपासून धुमसणारे रत्नागिरी शांत झाले.या घटनेत आईला मुलगा कायमचा सोडुन गेला आहे.आता आई मुलाला परत पाहणार नव्ह्ती.तो तीला कधीच भेटणार नव्हता हे तीचे मोठे दु:ख होते.वयाने मोठ्या असलेला मुलगा मघ्येच सोडुन जातो हे त्या कुटुबांचे न सहन होणारे दु:ख असते. समाजाच्या  प्रश्नाने त्याचा  बळी घेतला होता.पोलिसाना दिलेल्या गोळीबाराच्या आदेशाने त्याचा  बळी घेतला होता.
 


कांदिवलीतून ६ एप्रिलला ६ कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या कर्नित शहाची अखेर बुधवारी पहाटे उत्तर प्रदेशातील एका जंगलातून सुटका करण्यात आली व आईवडीलांकडे सुपुर्द केले.मुंबई पोलिसांच्या या धडक कारवाईचे चहूबाजूंनी कौतुक होत असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे. कटाचा सूत्रधार कर्नित राहत असलेल्या परिसरातील केक शॉपचा मालक असून त्याच्याच दुकानात हा अपहरणाचा कट शिजल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. या घटतने आईची व मुलाची परत भेट झाली.कर्नित शहाची आई मुलाशी परत भेट कधी होते याने व्याकुळ झाली होती. मुलगा लहान असल्याने तिला त्याची काळ्जी होती.समाजाने प्रश्नाने याचे अपहरण झाले होते.या घटनेत पोलिसानीच  मुलाची आईशी भेट घडवुन आणली आहे.

आई व मुलांच्या भेटीच्या संदर्भात या दोन्ही घटना पोलिसानी  घडविल्या आहेत.

 कालच्या दिवसात परस्पर विरुध्द दोन घटना घडल्या.एका घटनेत मोठे दु:ख तर दुस-या घटनेत मोठे सुख आहे. सुखदु:खाच्या घटना घडतच असतात.ज्या क़ुटुंबात घडतात त्याला त्या कुटुंबाला स्विकाराव्या लागतात.

1 comment:

Anonymous said...

तुमचे ब्लॉग आणि फोटो कलेक्शन सुंदर आहे. आम्हाला ते ग्लोबलमराठी.कॉम वर वाचायला व बघायला आवडेल, तुमचे ब्लॉग व फोटो www.globalmarathi.com post kara